‘ट्राय’ ला जेव्हा जाग येते ….

अन्न,वस्त्र आणी निवारा या बरोबरच मोबाइल ही आजच्या काळाची  मूलभूत गरज बनत चालली आहे हे कोणीही अमान्य करणार नाही.आज भाजीवाल्यापासून भिकारयापर्यंत ,शाळेतील लहान मुलांपासून खेड्यातील वृद्ध आजींकडेही हा सरास दिसतो.धड खायला नाही, रहायला घर नाही पण मोबाइल मिरवणारे  महाभागही आहेत.अस असताना गेल्या एक दोन महिन्यात ट्राय (टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया)  ग्राहकांच्या हितसंबधांकडे लक्ष देण्याची चांगलीच ट्राय करत आहे.जवळ जवळ सर्वच क्षेत्रात महागाईचा भस्मासुर सर्व सामान्यांना वाकुल्या दाखवत असतांना ट्राय ने  मोबाइल सेवा स्वस्त केल्या आहेत.पाच सहा महिन्या आधी पर्यंत अनियंत्रित असलेल्या मोबाइल सेवा देणारया कंपन्याना त्यांनी बरयापैकी   नियंत्रणाखाली आणले आहे.टाटा डोकोमो ने पर सेकंड बिलिंग योजना आणल्यावर  ट्राय ने इतर मोबाइल सेवा देणारया कंपन्यानानाही पर सेकंड बिल आकारण्यास  सांगितले.याला कंपन्यांचा विरोध झालाच पण ट्राय आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

मोबाइल कंपन्यांचे शेअर्स कोसळले पण सर्वसामान्य जनतेला महागाईने जगण मुश्किल केलेल असतांना   एकतरी सेवा स्वस्त झाली. (खासकरून एस . टी . डी . सेवा )त्यानंतर त्यांनी एसएमएस चे दर ही कमी करण्यास सांगितले.परवाच प्रेस रिलीज़ मध्ये त्यांनी जानेवारी २०१० मध्ये फ़क्त १९ रुपये भरून  मोबाइल कंपनी बदला पण मोबाइल नंबर तोच राखा असे जाहिर केले. मोबाइल कंपनीची सेवा वाइट असून सुद्धा सगळ्या नातेवाईकाना,मित्राना,व्यावहारिक संपर्कासाठी तो क्रमांक दिलेला असल्याने तो बदलणे जीवावर येत होते, त्यांच्यासाठी खुपच चांगली सोय आहे ही.एकदा मोबाईल नंबर कार्यरत झाल्यानंतर ९० दिवसानंतरच अशाप्रकारे मोबाईल कंपनी बदलता येईल.बर झाल स्विचिंग साठी फ़क्त १९ रुपये दर ठरवला ते कारण तो ठरवला नसता तर हया मोबाइल सेवा देणारया कंपन्यानी तो जास्त ठेउन ग्राहकांकडून यासाठीही चांगलाच पैसा उकळला असता आणी ग्राहकाला  क्रमांक बदलताना थोड़ा विचार करायला लागला असता.

शिवाय मोबाइल कंपनी बदलायची सोय  असल्यामुळे पुढे ह्या कंपन्यांही आपले ग्राहक राखण्यासाठी चांगल्यात  चांगली   सुविधा देण्याचे प्रयत्न करतील.आणी जेवढी हया कंपन्यांची स्पर्धा जास्त होइल तितकाच फ़ायदा ग्राहकांना होइल यात वाद नाही. ट्राय ची ही पाउले महागाईने पिडलेल्या जनतेला थोड़ा का होईना दिलासा देत आहेत.इतर रेगुलेटरी बोर्डानी सुद्धा या पासून बोध घेत सामान्य जनतेचे हित संबंध जपण्यासाठी पाउले   उचलावीत हीच अपेक्षा आपण ठेउ….

वाचाकाना एक सूचना :

३० नोव्हेंबरला ज्या मोबाईल हॅंडसेटचा “आयएमईआय’ (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटी) क्रमांक योग्य नसेल त्यांची सेवा संबंधित कंपन्यांकडून आपोआप बंद करण्यात येइल. त्यासाठी आपला “आयएमईआय’ क्रमांक वैध आहे का हे तपासून पहायचे आहे. आपला तो क्रमांक ५३२३२ किंवा ५७८८६ वर  “एसएमएस’ करायचा आहे.(*#०६# दाबुन तुम्हाला तुमचा आयएमईआय क्रमांक पाहता येइल) जर आपला तो क्रमांक अवैध असेल, तर तो वैध करून घेण्यासाठी ‘जीआयआय’ सेंटरवर जाऊन १९९ रुपये भरून तो वैध करून मिळणार आहे.याबद्दल अधिक माहिती  इथे भेट दया.

मुंबई सगळ्यांची…?

सर्वप्रथम सचिनचे  आंतरराष्ट्रीय कारकीदीर्ला  वीस वर्षे पूर्ण  झाल्याबद्दल  अभिनंदन …

sachin-tendulkar_1208999c

तर मुंबई कुणाची,या अटीतटीच्या सामन्यात शुक्रवारी थेट मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘मुंबई ही सर्व देशवासीयांची आहे’ अस म्हणत प्रांतिकतेच्या भिंतीवरून एकात्मकतेचा षटकार ठोकला.अशी बातमी मटात आज वाचली.खरतर माझ्या मते तेंडुलकरने हा चेंडू षटकार न मारता सोडून द्यायला हवा होता.कारण ‘मुंबई हम सबकी है’ अस  म्हणत इथे जे राजकारण आणी घुसखोरी होत आहे त्याची किंचितशी झळ ही सचिनला पोहोचत नाही, म्हणुनच तो वरील उदगार काढू शकला.जर तो आज एखादा  सर्वसामान्य मनुष्य असता तर नक्कीच अस म्हणु शकला नसता.कारण  या सगळ्या गोष्टींचा त्रास सर्वसामान्य जनतेलाच (फ़क्त मराठीच नाही तर इतरही स्थायीक लोक ) होतो .मतांसाठी लाचार झालेल्या राजकारण्यांच्या तोंडून अशी वाक़ये  सरास ऐकायला मिळतात.त्याच काही वाटत ही नाही कारण हया लोकांची सगळी नाटक आम्ही पुरेपुर ओळखुन आहोत.पण सचिनसारख्या कडून  अस हे डिप्लोमेटिक   वाक्य नक्कीच  आवडल नाही मला. 

महाराष्ट्रातलाच मराठी माणूस नोकरीसाठी वणवण भटकत असताना मुंबईतल्या रेल्वेच्या जागा भरण्यासाठी येथील मराठी वृत्तपत्रात जाहिरात ना देता बिहारमधील स्थानिक वृत्तपत्रात ती जाहिरात येते.वाह…मग इथल्या लोकांनी काय करायचे…?पहिला आम्ही सहिष्णुतेने तिथे उद्योग धंदा नाही म्हणून आलेत बिचारे पोट भरण्यासाठी’ म्हणत  हया लोकांना इथे राहू दिल.आमच्यापैकिच एक मानल पण हळु  हळु  हे लोक आपल्याच खांद्यावर बसून उद्दामपणाने  आपल्याच कानात मुतायला लागलेत.एकेक नातेवाईकाला इथे बोलवून एका नविन झोपडीला जन्म दिला.कोणत्याही गोष्टीला काही मर्यादा असते, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच हे कळत नाही का हया लोकांना, की आपल उठल आणी पकडली मुंबई ची  ट्रेन. खरतर ही तिथल्या राजकारण्यांची आणी पर्यायाने त्यांना निवडून देणारया हयाच लोकांची हार आहे .कारण जे लोक स्वत:च्या राज्यात रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही त्यांना हे लोक पुन्हा पुन्हा  मते तरी का  देतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बरयाच रोजगाराच्या संधी असतानाही हया राजकारण्यांनी तिथे हया क्षेत्राला  उत्तेजना का दिली  नाही ही विचार करण्यासारखी बाब आहे.

आता तर उत्तर प्रदेशातील राजकारण्यांची (उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था यांचे पूर्ण बारा वाजवून)  इथे उत्तर प्रदेश स्थापना दिवस साजरा करण्या पर्यंत मजल गेली आहे.इथे कोणी मराठी ची बाजू घ्यायला गेल की हया लोकांच् देशप्रेम उफ़ाळुन येत आणी मराठीची बाजू घेणारा  गुंड आणी राष्ट्रीय एकात्मतेचे तुकडे करणारा होतो. हयाच लोकांतील एका बैलाचा राष्ट्रगीत सुरु असतांना बसून राहिलेला फोटो मघाशीच भाग्यश्री ताइंच्या ब्लॉग वर पाहिला.आणी वर हे लोक देश्प्रेमाच्या गोष्टी करतात. इथे राहतात तर इथल्या संस्कृतीशी जुळवुन घ्यायला नको का.हीच लोक पश्चिम बंगाल किंवा  दक्षिणेतील एखाद्या राज्यात उत्तर प्रदेश स्थापना दिवस साजरा करायची हिम्मत दाखवू शकतात का. नक्कीच नाही कारण तेथील लोकांची तेथील  संस्कृति विषयक जी अस्मिता आहे ती हयाना तसा विचार देखिल करू देणार नाही.आणी  आपण मराठी लोक मात्र  मराठी अस्मितेची गळचेपी चुपचाप पाहत आहोत.अश्या परिस्थितीत सचिनने हया विषयाचा गांभीर्याने  नीट अभ्यास करुनच प्रतिक्रया द्यायला हवी होती.कारण मुंबई सगळ्यांची अस म्हणत सगळे अशेच इथे येत राहिले तर आपण कुठे  जायचे…?उद्या सचिनच्या घराच्या आवारात कोणी युपी वरून येउन झोपडी बांधून राहिला तर सचिन असच  विधान करेल का.?

असो  सचिन अशीच यशाची नवनवी शिखरे गाठत आणखी बरीच वर्षे खेळत राहावा … हीच माझी शुभेच्छा…!!!

मी तुझ्याकडे पाहील्यावर……(५)

मी तुझ्याकडे पाहील्यावर
सावलीसारख वाटत दाहक ऊन
तु समोर नसताना मात्र
उगाचच होतो बैचेन…..

7a2a7_Engagement-Pictures-Sun-Flare03 copy

मी तुझ्याकडे पाहील्यावर
आठवतात धुंद गाणी
आठवण तुझी येता
डोळ्यात येते पाणी…

man_thinking copy