काल रात्री जेवतांना नेहमीप्रमाणे इडीयट बॉक्ससमोर बसलो होतो.कारण त्याच्याशी बहुतांशी जेवतांनाच संबध येतो.तर सोनी वर एंटरटेंमेंट के लिये कुछ भी करेगा लागल होत.अधुन मधुन पाहत असतो मी हा कार्यक्रम,तसा छान आहे.काल फ़रहाच्या जागी सिद्धु आला होता.म्हणजेच भारताच्या इतिहासातील दोन महान (? ) पकाउ शायर परीक्षणासाठी एकत्र बसले होते.तर झाल अस काल एक नवरा बायको त्यात आले होते.त्यात बायको कॉमेंट्री करत होती व नवरा त्याप्रमाणे वेगवेगळ्या हालचाली करत होता.म्हणजे आता परत मी विडियोत पाहिल्यावर कळल त्या किती कठिण हालचाली होत्या ते.तर हया परफ़ोर्मन्सला अनु मलिकने मध्येच उभ राहुन फ़ुल स्टॉप करुन टाकल.तेव्हा त्या बाइने समजावल कि हे खरच सोप नाहिये,माइंड पॉवर कंट्रोल लागते हे करायला.पण मलिक साहेब आणि सिद्धु साहेब काही ऐकायला तयार होइनात.
(हयात ०२:२० पासुन पुढे बघा.नीट बघितल्यावर कळते त्याने केलेल खरच खुप कठिण आहे …)
मग त्या बाईने अनु मलिक आणि तिथल्या जनतेला पाय एकाच दिशेला फ़िरवत हाताने हवेत आठचा आकडा काढुन दाखवा असे चॅलेंज दिले .तिच्या पतिने तेव्हा तसे करुनही दाखवले.बघा तुम्ही प्रयत्न करुन खरच आपल्यासाठी अशक्य आहे ते.तिच्या हया चॅलेंजवर मलिक साहेबांनी उभ राहुन पाय फ़िरवत दोन्ही हातांनी हवेत पोहायची स्टाईल करुन त्या दांपत्याची खिल्ली उडवली.अनु मलिकच्या हया माकडचाळ्यांवर जनता ही खदखदुन हसली. अरे ते तुमचे अकरा हजार एकशे बारा रुपये नाही द्यायचे कोणाला तर ठिक पण त्यांच्या भावनांचा आदर तरी ठेवा. तिथे हे लोक फ़क्त त्या तुटपुंज्या रकमेसाठी येतात अस मला वाटत नाही ,ते येतात त्यांच टॅलेंट दाखवायला. ते थोड समजुन घ्यायला हव ना.त्यावेळी त्या दोघांचा झालेला तो अपमान पाहुन खरच खुप वाईट वाटत होत.हयात कधी कधी नुसत्या विचित्रपणाला किंवा प्रादेशिकतेच्या नावावर उगाच खुप वाहवा दिली जाते .याआधीचाच एक पंजाबी गाण्यावरचा नाच मला उगाच खुप डोक्यावर घेतल्यासारखा वाटला होता.असो मी नेहमी बघत नाही, पण काल तरी असच चित्र मला दिसल.आणि मला ते बिलकुल आवडल नाही, तेच मांडण्यासाठी ही छोटेखानी पोस्ट…तुम्हाला काय वाटते…