पाऊस पडत असताना…
चमकणाऱ्या विजा अन ते सळसळणारे वारे
मातीचा सुगंध अन थेंबांचे मंद नाद न्यारे
मला भिजायला बोलवायचे तुझे इशारे हे सारे
पाऊस पडत असताना…
अजून हव तरी काय
खमंग तळलेली भजी
अन एक कटिंग चाय
मी तुझ्याकडे पाहील्यावर
सावलीसारख वाटत दाहक ऊन
तु समोर नसताना मात्र
उगाचच होतो बैचेन…..

मी तुझ्याकडे पाहील्यावर
आठवायची धुंद गाणी
आता ती आठवली कि
डोळ्यात येते पाणी…

(छायाचित्र नेटवरून साभार )
*पहिले चार भाग इथे वाचू शकता .