‘वि दी लिविंग’


150px-Wetheliving100

आजच आयन रैंड हीच ‘वि दी लिविंग’ हे पुस्तक वाचून झाले. खुप आवडल मनापासून.खरतर एक मित्राने सुचवल होत वाचून बघ एकदा म्हणून आणी जस वाचायला घेतल तसा पूर्णत: समरस होउन गेलो ह्या पुस्तकात. वाचल्यावर गूगल वर सहज सर्च केल पुस्तकाबाबत तर अस ध्यानात आल की हे  खुप गाजलेल पुस्तक असून ह्यावर तीन चित्रपट सुद्धा निघाले आहेत.
तर पुस्तक हे रशियात जेव्हा कम्युनिस्ट लोकांच्या लाल क्रांतीने जेव्हा जोर धरला होता त्या काळातिल किरा आर्गुनोव्हा ह्या एक स्वतंत्र विचारशैलिच्या मुलीभोवती फिरते. मलाही  कधी कधी साम्यवाद बरोबर वाटायचा सर्व लोकांचे  एक समान जीवन, कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही आणी अस बराच काही.पण ह्या पुस्तकातून Ayn Rand यानी साम्यवादाची एक दुसरी बाजु अतिशय प्रभावीपणे मांडली आहे.खरच ह्यामुळे कामचुकार ,आळशि लोकांच चांगलाच फावेल.तर बरयाच कर्त्या लोकांच कर्तुत्व दडपून जाईल.जर अश्या प्रकारे दगडाना आणी हिरयाना एकत्र केल तर त्यात ह्या समाजाचाच नुकसान आहे. ह्यावर तुम्ही म्हणाल त्या थोड्या लोकांकरता पूर्ण समाजाच विभाजन का कराव.पण लक्षात ठेवा ह्या थोड्या लोकांच्या महत्वकान्शेमुळेच आज समाजाची प्रगति होत आहे.तस पाहील गेल तर  ह्या साम्यवादाच्या नावाखाली मोठ राजकारण चालत.हे पुस्तक वाचल्यावर तुम्हालाही जाणवेल कम्युनिस्ट लोकांचा खरा हेतु काय होता आणी नंतर त्याच्या नावाखाली जी प्रणाली अस्तित्वात आली ती समाजासाठी कशाप्रकारे घातक आहे.

तर ह्या पुस्तकात नायिका किरा व तिचे कुटुंब हे  लाल क्रांतीचे वादळ शमल्यावर आपल्या स्वगृही पेट्रोगाड येथे परत राहिला आल्यावर साम्यवादी समाजरचनेचे त्यांच्या सारख्या व्यापारी तसेच सर्वसाधारण लोकांवर काय परिणाम झाले हे सांगितल आहे.तर किरा ही एक खुप महत्वकांशी व स्वतंत्र विचारशैलिची मुलगी असते पण ह्या बदललेल्या समाजरचनेने  तिच्या सिविल इंजिनियर बनण्याच्या स्वप्नाचा कसा चुराडा होतो तसेच तिला व तिचा   प्रियकर लिवो कोवेल्हान्सकी यांना जगण्यासाठी काय काय कराव लागत आणी शेवटी त्याचा काय परिणाम होतो हे अगदी प्रभावीपणे मांडल आहे ह्या पुस्तकात.मला हया पुस्तकात सर्वात आवड्लेल पात्र म्हणजे आंद्रेय टागोनोव्ह आता हा कोण ह्याच उत्तर मी देत नाही ते  तुम्हाला पुस्तक वाचल्यावर कळेलच.जमल तर हे पुस्तक जरुर वाचा …धन्यवाद.

टिप :साम्यवाद ही एक अशी राज्यव्यवस्था / समाजव्यवस्था आहे जिच्यात उत्पादनाचे मुख्य साधने व स्रोत समाजाच्या (कुणा एका व्यक्तीच्या ऐवजी) मालकीचे असतात. कामाची समान विभागणी, योग्यतेनुसार आणि सर्व फायदे, गरजेनुसार हे कम्युनिस्ट विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत. कार्ल मार्क्स आणी लेनिन हे ह्या साम्यवादी विचारांचे प्रणेते होते.भांडवलवादाच्या प्रसारामुळे कम्युनिस्ट विचारसरणी मागे पडत गेली व आज केवळ चार देशात कम्युनिस्ट राज्यव्यवस्था आहे- (उत्तर कोरिया, व्हियेतनाम, चीन व क्युबा).

साम्यवादाचे चिन्ह- कोयता व हातोडा

साम्यवादाचे चिन्ह- कोयता व हातोडा

Advertisements

2 thoughts on “‘वि दी लिविंग’

  1. आयन रॅंडचं फाउंटन हेड वाचलं कां? नसेल तर जरुर वाचा. खुपच सुंदर आहे पुस्तकं. मी शाळेत असतांना वाचलं होतं.
    तसेच एक ऍटलास श्राउड नावाचं पण पुस्तक आहे. बघा मिळेल तर. पण ते फाउंटन हेड तर अप्रतिम!

  2. मी आयन रैंड च नाव टाकुन जेव्हा सर्च कल होत तेव्हा तुम्ही सांगितलेली पुस्तकाची नाव पहिली होती.आता तुमच्या फीडबैकनुसार लवकरात लवकर ती वाचायचा प्रयत्न करीन.

टिप्पण्या बंद आहेत.