‘जब वी मेट’


jab

love-aaj-kal

आज टीवीवर  ‘लव आज कल’ या सैफ-दीपिका यांच्या  सिनेमाच ट्रेलर पहिल .तस आधीही पाहिल होत पण मी दिग्दर्शकाच्या नावाकडे लक्ष दिल न्वहत.तर आज पाहिल नाव इम्तियाज अली ..हे नाव पाहून लगेच आठवण झाली ‘जब वी मेट’ या त्याच्या २००७ साली आलेल्या चित्रपटाची.तो  चित्रपट मला खुप आवडतो आणी मी तो बरयाच वेळा पाहून सुध्हा कधीही बोअर वाटला नाही रिपीट बघायला असे फार थोड़े चित्रपट असतात.मग वाटल लिहूया या चित्रपटाबद्दल थोडस आपल्या ब्लोग्वर म्हणून हा उपद्व्याप…

‘जब वी मेट’ हा एक छान, हलकाफुलका सिनेमा आहे.दोघांची केमिस्ट्री मस्त. प्रसंगानुरूप विनोदही मस्त आहेत. शाहिदला ती संयत भूमिका खूपच सूट झाली आहे.खरतर करिना मला अजिबात आवडत नाही  डोक्यात जाते  ती तिच्या ओव्हरक्टींगमुळे.पण या चित्रपटात हाच तिचा प्लस पॉइंट ठरला आहे.कारण तिची भूमिकाच आहे तशी या चित्रपटात.करीनाने एक अल्लड, मोकळी, थोडी निरागस अशी मुलगी खरच छान उभी केली आहे. तिची स्वतःची अशी एक philosophy आहे, त्याप्रमाणे ती मनापासून जगते या चित्रपटात .पहिल्यांदाच ती माझ्या डोक्यात गेली नाही हे विशेष.

तर या इम्तियाज अलिने या दोघंकडून सुरेख अभिनय करवून घेतला आहे आणी दोघे एकत्र असताना कधी हिट चित्रपट देऊ शकले न्वहते ते या चित्रपटाने शक्य झाले.कथा संवाद आणी दिग्दर्शन या तिन्ही आघाडयावर तो कुठेही कमी पडलेला नाही.त्याने हा चित्रपट शक्य तेवढा सहज आणी हल्काफुल्का ठेवला आहे.हेच कथानक जर चोप्रा,जोहर कंपनीने बनविला असता तर तुम्ही समजू शकता त्याचे काय झाले असते.कदाचित त्याने ह्या चित्रपटापेक्षाही जास्त बिजनेस केला असता.पण अशी सहजता त्यात दिसली नसती.शिवाय प्रितमच  उत्तम संगीत ही  या चित्रपटाच्या जमेची बाजु.ह्यातील ‘तुमसे ही दिन होता है ‘ आणी ‘आओगे जब तुम’ ही गाणी मला खुप आवडतात.मौजाही मौजा,नगाडा नगाडा,हम जो चलने लगे ही गाणीही छान जमुन आली आहेत.

( चित्रपटातील काही मनोरंजक क्षण )

या चित्रपटाच्या यशात सिंहाचा वाटा होता तो यातील संवादांचा.खाली मी मला या चित्रपटातील काही आवडलेले संवाद लिहत आहे.

*मै अपनी फेवरिट हु..

*”तुम हमेशा ऐसी बकबक करती हो या आज कोई स्पेशल ऑकेजन है…”

*तुम ओरिजनल पिस हो…मालूम है तुम्हे…तुम्हे ना उठाके मुजियम में रखना चाहिए टिकेट  लगाना चाहिए तुम्हे देखने  के लिए ..

*बस् बाबाजी  अब ईस रात मे और कोई excitement मत देना , बोरिंग बना दो जी इस रात को  बस

*अब तो मेरा हाथ छोडो इतनी भी सुन्दर  नहीं हु मै….

*ये क्या हम लोग ही बोले  जा रहे है.आप लोग भी बोल सकते हो कोई punishment नहीं है….

*तैनू की फरक पेंदा है .. ?

*तुमने कभी किसी psychiatrist को कंसल्ट  किया है??

*कोई DOUBT मत रखना अपने दिल में…सीखनी हु मै भटिंडा की

*तुम्हे क्या लगा तुम मुझे छोड़ दोगे तो में तडपती रहूंगी,तडपेगा तू  कमीने ,कीडे पड़ेंगे तेरे ऊपर, कुत्ते की मौत मरेगा तू और मरने के बाद हमेशा हमेशा के लिए नरक में जायेगा तेरे माँ की ….

*लेकिन मै तुम्हारे साथ भाग जाऊ , फिर भी तो ये ऑफर  valid  है. ……

*तुम कभी  सीरियस  नहीं हो सकती.

*मुझे बचपनसे शादी करने का बड़ा Craze है बाय god.

*पता चल जाता है ..

एकुण इम्तियाजच्या नावामुळे माझी तरी ‘लव आज कल’ कडून चांगली  अपेक्षा आहे.३१ जुलैला प्रदर्शित होत आहे तो बघुया कितपत  यशस्वी  होतो  ते. असो इम्तियाजला या चित्रपटासाठी शुभेच्छा…

Advertisements

3 thoughts on “‘जब वी मेट’

  1. धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल …
    आता आताच लिहण सुरु केल आहे हळू हळू क्रिस्प आणायचा जरुर प्रयत्न करेन .

टिप्पण्या बंद आहेत.