बजेट-२००९-१०


photo.cms

प्रणवना मिळाली होती २५ वर्षानी परत संधी
पण यावेळी समोर होती ती जागतिक मंदी
सरकारकडून लोकाना होत्या अपेक्षा फार
प्रणवच्या डोक्यावर होता खुप मोठा भार

कृषी विकासदराचे लक्ष्य ठेवले ४ टक्के
९ टक्के जी.डी.पि.आणण्याचे इरादे पक्के
दहा हजारानी वाढविली आय.टी. ची हद्द
एफ.बी.टी. व  सी.टी टी केले गेले  रद्द

सरकारी योजनांचा केंद्रबिंदु आम आदमी
उद्योग धंद्यासाठी तरतूद फारच कमी
१ कोटी २० लाख नव्या रोजगारांची हमी
एलसीडी,मोबाईलची किमंत झाली कमी

शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने कर्ज
सोपा ‘सरल’ होणार इन्कम टॅक्सचा अर्ज
लवकरच आणणार स्पर्धात्मक शिक्षणपद्धती
पेट्रोलियम पदार्थांच्या भावासाठी नवी समिती

विशेष स्टीमुलस पैकेजची घोषणा नाही
निर्गुंतवणूक सुध्दा  आता नाही
मग सेन्सेक्सने दिला चांगलाच झटका
गुंतवणूकदारांच्या खिशाला बसला फटका

जागतिक मंदीचा पसरलेला पेटता निखारा
त्यात अर्थव्यवस्थेवर वित्तीय तुटिचा बोजवारा
अशा वेळी प्रणवनी उघडला बजेटचा पेटारा
म्हणुनच शांतपणे त्याचा स्वीकार करा…

-देवेंद्र चुरी

Advertisements

3 thoughts on “बजेट-२००९-१०

  1. वाटल खरडाव आपणही बजेट वर काही म्हणून … 🙂

टिप्पण्या बंद आहेत.