राखी चे स्वयंवर


rakhi-ka-swayamvar

‘राखी सावंत’नाव ऐकून काय चित्र उभ राहत तुमच्या समोर…? आयटम गर्ल, भांडकुदळ, सदासर्वदा कसल्यातरी चचेर्त असणारी राखी सावंत . प्रसिद्धीसाठी काहीही करायला मागंपुढं न पाहणारी राखी सावंत .जिच नाव ऐकून तमाम मराठी लोकांच्या भुवया उंचावतात ती राखी सावंत. तर २९  जून  पासून हया राखीचा ‘राखी सावंत का स्वयंवर’ हा रिऍलिटी शो एनडीटीव्ही इमॅजिन या वाहिनीवर प्रदर्शित झाला आहे.या कार्यक्रमासाठी इच्छित  वरांच्या बारा हजारांहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. एकूण प्रवेशिकांमधून केवळ १६ स्पर्धकांचीच निवड प्रत्यक्ष कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. त्यांच्यातील एकाच्या गळ्यात  राखी वरमाला टाकणार आहे.

मला तरी वाटते तिने हा जो काही तमाशा चालवला आहे ना तो म्हणजे एकदम फालतू आहे.मला तर  हा सगळा पब्लिसिटी स्टंट आणी  टी. आर. पी. चा खेळ वाटतो आहे. तिचे विचित्र हावभाव आणी बोलण्यातील नाटकिपणा अगदी डोक्यात जातो.असो पुढे जावून राखीने तिचा वर ठरवण्यासाठी आपल्याकडून एस एम एस नाही मागविले की झाल.तो अभिषेक अवस्थी आणी राखी हे दोघे गेल्या चार वर्षांपासून एकत्र राहत होते.आता त्यांच फाटल त्यातही राखीने मात्र या ब्रेकअपचं कारण वैयक्तीक दिलं नसून राजकीय दिलं आहे. राज ठाकरे आणि लालू प्रसाद यादव यांच्या मराठी-अमराठी वादामुळे मुळचा युपीचा असलेल्या अभिषेक अवस्थीने मला सोडलं असा आरोप राखीने आपल्या खास शैलीत केला होता.

rakhi-4

शंकर महादेवन ,ऐश्वर्या राय यांच्यासारखी अमराठी लोक मराठी बोलण आपल्याला आवडत अस म्हणत असताना हीच राखी “मराठीत बोलताना लोकांवर “इंप्रेशन” पडत नाही, मुझे हिंदीमें बोलना ज्यादा आसान लगता है” अस विधान करते.आता कोणत्या तोंडानी हिला मराठी  म्हणायच.अशी वादग्रस्त विधाने करण्यात तिचा हातखंडा आहे.राखीने मागे एकदा सांगितले होते की सख्ख्या आईनेही मला वापरलं.आईने माझ्या आयुष्याचं काय केलं हे सांगितलं, तर लोकांचा ‘आई’ या नात्यावरचा विश्वास उडेल. काय म्हणाव आता या बयेला..!

आधुनिक द्रौपदी बनण्याची इच्छा बाळगणारया या राखीचा  उदया ‘राखी चे वस्त्रहरण’ हा कार्यक्रम टीवी वर प्रर्दशित नाही झाला की मिळवल.शेवटी मेल मधून आलेली राखीवरील एक कविता येथे जोडाविशी वाटते…

“भरुन आले आसमंत,
रडू लागले संत,
महाराष्ट्राची खंत,
राखी सावंत.”

राखी आणि मिका,
दोघांची एकच भूमिका,
राखी म्हणते, “मिका नको.”
मिका म्हणतो, “मी का नको??”

मिका म्हणाला राखीला:

र र राखी
म म मका
मी तुझा मिका
दे मला मुका

मी मराठी, तू मराठी, झी मराठी, अरेरे आणि राखी पण मराठी….!!!

Advertisements

5 thoughts on “राखी चे स्वयंवर

  1. @ चंद्रेश,विजय, अमोल
    खुप खुप धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल…

  2. जे अपेक्षित होत त्याप्रमाणेच आज वर्तमानपत्रात वाचायला मिळाले राखी भावी पति निवडण्यासाठी लोकांची मते घेणार…

टिप्पण्या बंद आहेत.