विलक्षण योगायोग …


कधीकधी योगायोग असे जुळून येतात की विश्वासच बसत नाही.आपल्या रोजच्या दैनदिन जीवनातही छोटे मोठे योगायोग होतच असतात.बरयाच वेळा अशा काही घटना घडतात की आपण त्यांच्याकडे पाहून फारतर ‘हे कस शक्य आहे’ एवढच म्हणु शकतो.मी जी माहिती खाली शेअर केली आहे त्याला योगायोग म्हणावे की दुसर काय हेच कळत नाही.तर ही माहिती आहे अब्राहम लिंकन आणी जॉन एफ केनेडी या अमेरिकेतील दोन महान नेत्यांच्या जिवनातील समान घटनांची.खरतर ही माहिती एक मेल मधून मिळाली.सर्वप्रथम माझा  विश्वासच बसला नाही,मग लगेच मी आपल गुगलास्त्र (आजकाल काहीही डाउट असला की आपण हे अस्त्र वापरतो लगेच) काढल आणी सर्च केल दोघांची नाव टाकुन तर कितीतरी लिंक्स मिळाल्या  ह्या माहितीला दुजोरा देणारया .मग ठरवल ही माहिती ब्लोग्वर शेअर करायची.

* खालील माहिती मी मराठीत अनुवादित केली आहे त्यामुळे त्यात काही चुकीचे असल्यास कळवावे.

3562lincolnkennedy

अब्राहम लिंकन १८४६ मध्ये अमेरिकन कांग्रेसमध्ये  निवडून आले.
जॉन एफ केनेडी १९४६ मध्ये अमेरिकन कांग्रेसमध्ये  निवडून आले.

अब्राहम लिंकन यांनी  १८६०  मध्ये अमेरीकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
जॉन एफ केनेडी यांनी १९६०  मध्ये अमेरीकेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.

लिंकन यांच्या सचिवाच नाव केनेडी होत.
केनेडी यांच्या सचिवाच नाव  लिंकन होत.

दोघांना नागरिकांच्या अधिकाराबद्दल विशेष रस होता.
दोघांच्या बायकांनी व्हाइट हाउस मध्ये असताना एक पुत्र गमावला.

दोघांचा मृत्यु शुक्रवारी झाला .
दोघांच्या डोक्यात गोळी मारली गेली होती.

दोघांची हत्या दक्षिण अमेरिकेतील माणसाने केली.
दोघांचा उत्तराधिकारी दक्षिणेतिलाच जॉन्सन नावाचा होता.

लिंकनचे उत्तराधिकारी एंड्रू जॉन्सन  यांचा जन्म १८०८ साली झाला होता.
केनेडीचे  उत्तराधिकारी लंदन जॉन्सन  यांचा जन्म १९०८  साली झाला होता.

लिंकनाचा मारेकरी जॉन विल्किस बूथ याचा  जन्म १८३९  साली झाला होता.
केनेडिचा  मारेकरी  ली हार्वे ओसवाल्ड याचा  जन्म १९३९  साली झाला होता.

लिंकन यांना ‘फोर्ड’ या सिनेमागृहात गोळी मारण्यात आली.
केनेडी यांना फोर्ड कंपनीच्या ‘लिंकन’ नावाच्या गाडीत गोळी मारण्यात आली.

जॉन बूथ लिंकनची  हत्या करून सिनेमाग्रुहातून मालागोदामाकडे पळाला होता.
ओसवाल्ड केनेडीची  हत्या करून मालागोदामातून सिनेमाग्रुहाकडे पळाला होता.

बूथ आणी ओसवाल्ड दोघांचीही न्यायालयीन कारवाईच्या आधीच हत्या करण्यात आली.

हत्येच्या  एक आठवडा आधी लिंकन Monroe (मेरीलैंड) या ठिकाणी होते.
हत्येच्या  एक आठवडा आधी केनेडी Marilyn Monroe या अभिनेत्रिबरोबर होते.

आहे ना विलक्षण योगायोग…!!!

Advertisements