एक प्रवास कविता…


२००७ च्या पावसाळ्यात सातारयाला मित्राच्या लग्नासाठी गेलो होतो.खुप धमाल केली होती तिथे आम्ही. तेव्हा माझ्या ऑरकुट मधल्या एक फ्रेंड़ने मला ट्रीपवर कविता करण्यास सांगितली.आणी मी सुद्धा ते आव्हान स्वीकारून ही कविता केली होती पण हिला शीर्षक काही सुचले नाही मला म्हणून सरळ एक प्रवास कविता नाव देऊन टाकल.खरच पाऊसाळ्यात  महाबळेश्वरला जी मजा येते ती वेगळिच.मला तर वाटते प्रत्येक निसर्गप्रेमिने पावसाळ्यात तिथे भेट देऊन ओल्याचिंब निसर्गाचा पुरेपुर आस्वाद लुटावा….

एक प्रवास कविता…

आपल्या रोजच्या दिनक्रमात मग्न होतो मी
अचानक आली मित्राच्या लग्नाची पत्रिका ती
आमच मित्रांच ठरल जायच लग्नाला संगती
वाट्ल करावी सातारयाला एकत्र भट्कंती……

आज आम्ही सातारयाला जाणार
या पाउसात आमच कस निभावणार25
तरीही आम्ही बेधुंद गाणार
पाउसाआधी आम्हीच बरसणार……

होता आमचा रात्रीचा प्रवास
भोवती झोपलेले जग उदास
गाडी चालली होती झकास
लवकर जायचे होते मुक्कामास

सकाळ सकाळ तिथे पोहोचलो
रात्रभर आम्ही न्वहतो झोपलो
तरीही लग्नात चिक्कार नाचलो
थकल्यावर मग पोट्भरुन जेवलो

लग्न उरकल्यावर स्वारी निघाली महाबळेश्वरला
गाडीने पुरता घाट झोकात पालथा घातला
हिरवागार निसर्ग पाहुन माझा आनंद द्विगुणीत झाला
मला तसा पाहुन मग निसर्गही अधिकच खुलला……

महाबळेश्वरला पोहोचलो अशा मोहक सांजवेळी27
सगळी जागाच वाटत होती निराळी
चक्क जमीनीवर होती घनांची जाळी
आणी हवेतल्या गारव्याची तर्‍हाच वेगळी

हिरवागार निसर्ग आणी तो ढगांचा फवारा
त्यात शोधत होतो आम्ही सहारा
सोबतीला नाजुक पावसाच्या सरींचा पहारा
वाटल स्वर्गही असेल का याहुन न्यारा

ओफसिझनच्या नावे खोलीही घेतली आलीशान
खरतर हाच सीझन भागवतो निसर्गप्रेंमीची तहान
फ्रेश झालो तरी मी विसरलो होतो भान
त्यात गरमागरम सुप आणी जेवणही छान

जेवणानंतर आमची शतपाउलीही खुप रंगली
फिरतांना गरमागरम मक्याची कणस खाली
रात्री उशीरापर्यत गप्पांची मैफल सजली
मग निद्राराणी आमच्यावर प्रसन्न झाली……

26

Advertisements

One thought on “एक प्रवास कविता…

  1. पिंगबॅक स्ट्रॉबेरीच्या दुनियेत… « दवबिंदू

टिप्पण्या बंद आहेत.