हे करून पहा एकदा…


गूगल आता ‘गूगल क्रोम’ ही त्यांची पहिली ऑपरेटिंग सिस्टम बाजारात आणत  आहे.मायक्रोसोफ्टचीही विंडोज-७ ही नविन ऑपरेटिंग सिस्टम लवकरच लोकांना वापरायला मिळनार आहे.हे आता सगळ्याना माहिती आहेच.गूगल क्रोम बद्दल तर बरीच उत्सुकता आहे.याआधी मायक्रोसोफ्टची मोनोपोली होती ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत,जगातील ९०%संगणकामध्ये विंडोजच वापरले जाते.कारण तोडीचा स्पर्धकच त्यांना न्वहता या क्षेत्रात.पण आता गूगलने या क्षेत्रात पदार्पण करून मायक्रोसोफ्ट समोर मोठे आव्हान उभे केले आहे. दोघांचे हे युद्ध निश्चीतच रोमांचक होणार यात वाद नाही.

हे एक अर्थाने चांगलेच आहे आपल्यासारख्या उपभोक्त्यांसाठी कारण बाजारात स्पर्धा जितकी तगडी असते तेवढाच आपल्यासारख्या उपभोक्त्यांचा फायदा असतो.असो तर मी इथे सध्याच्या विंडोजमधिल  काही बग्स बद्दल  माहिती देणार आहे.तस बरयाच लोकांना हे माहिती असणार पण हा लेख ज्यांना ही माहिती नाही त्यांच्यासाठी.

१.तुमच्या संगणकामध्ये मध्ये कोठेही “CON”  नावाचे फोल्डर तयार करा आणि तयार झाल्यावर मला कळवा.

२.आता एक नविन Notepad ओपन करा त्यात लिहा “Bush hid the facts”  आणी तुम्हाला वाटेल तिथे वाटेल त्या नावाने  Notepad सेव करा.आता तो क्लोज़ करून  परत तो ओपन करा आणी गंमत पहा.

३. आता मायक्रोसोफ्ट ऑफिसमधील एक नविन वर्ड डॉक्युमेंट ओपन करा.त्यात लिहा

=rand (200,99) आणी enter  दाबा पहा काय होते ते.

Advertisements

7 thoughts on “हे करून पहा एकदा…

  1. @देवेंद्र,प्रशांत
    धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल

  2. आय.टी. हा माझा प्रांत नाही, त्यामुळे हे बग्स शोधण मला जमणार नाही अस वाटते.
    तस अपघाताने शोधुही शकतो. (सकारात्मक विचार :-)) खर तर ही माहिती मला न्वहति
    तेव्हा वाटल माझ्यासारखे जे अज्ञानी लोक आहेत याबाबतीत त्यानाही ही माहिती कळावी म्हणून टाकल ब्लोगवर.
    असो तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ….!

टिप्पण्या बंद आहेत.