उलट सुलट


१.चीमा काय कामाची.

२.भाउ तळ्यात उभा.

३.तो कवी डालडा विकतो.

४.ती होडी जाडी होती.

५.रामाला भाला मारा.

६.सर जाता जाता प्या ताजा ताजा रस.

वाचलीत का  वरील वाकये ..काय म्हणता काय विशेष म्हणून तर आता वरील सगळी वाकये उलट दिशेने  शेवटुन सुरवात करून वाचा.आहे ना गम्मत.वरील वाकये दोन्ही बाजूने वाचली तरी सारखीच येतात आणी ही  मराठी भाषेतील मृदबंध अलंकाराची उदाहरणे आहेत.खरच ज्याप्रमाणे अलंकार आपली शोभा   वाढवतात त्याचप्रमाणे हे भाषेतील अलंकार भाषेच सौन्दर्य अधिकच खुलवतात.आपल्या  मराठी भाषेतील इतर अलंकाराबाबत जाणुन घेण्यासाठी इथे भेट दया.इंग्रजी मध्ये मृदबंध अलंकारालाच palindromincs असे म्हणतात.इंग्लिश मधील अशेच शब्द आणी वाक्य वाचण्यासाठी येथे भेट दया.

gff

5 thoughts on “उलट सुलट

  1. अरे व्वा! हे सहावं वाक्य नवीन होतं की!!

  2. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद …

Comments are closed.