गटारी


गटारी.. नाही हो हे काही गटाराच अनेकवचन नाही.तरआषाढी अमावस्येला गटारी अमावस्या असेही म्हणतात. आषाढानंतर येणारा श्रावण पाळला जातो. म्हणजे या महीन्यात मांसाहार वर्ज्य असतो. आणि म्हणुन मांसाहार लोक गटारी अमावस्येला मासे-मटण खाउन घेतात.खरे तर याला एक सायंटिफिक कारण ही आहे ते असे की हा काळ मास्यांच्या प्रजनानासाठी महत्वाचा असतो.यावेळी तर रविवारी म्हणजे आजच गटारी करायला लोकाना मस्त मुहूर्त मिळाला आहे कारण अमावस्या बुधवारी पहाटेच संपतेय आणि श्रावण लागतोय. त्यामुळे श्रावण पाळणाऱ्यांना बुधवारी गटारीचा बेत नाही करता येणार.गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सारे प्रेमानं गटारी साजरी करताना दिसतात. मद्यपीसाठी तर हा दिवस म्हणजे एक पर्वणीच.तस पिणारयाना काहीही बहाणा पाहिजे असतो बस.आता या दिवसाला गटारी का म्हणतात ते मला कधीच कळले नाही कोणाला माहिती असल्यास जरुर कळवावे.की याचा जो शब्दश: अर्थ निघतो की मद्य पिउन गटारात लोळायच तोच खरा.

27072008264

तोन्डाला पाणी सुटले ना!फोटो बघून

चला तर आपण येणारया श्रावण महिन्याचे स्वागत बालाकविंच्या खालील ओळी म्हणून करू

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे….

4555

Advertisements

7 thoughts on “गटारी

 1. भारताचा राष्ट्रीय सण गटारीच्या हार्दीक शुभेच्चा !

  Purvichya kaali jevha aashad amavasyela lok madya prshan karayache tevha tyanche praman adhik pramanat asayache aani mag hi mandali ghari pohachayachya aivaji chalata chalata gatarat padayachi , hya divashi madya pinaryanche praman jast asate aani gatarat padanyache hi mhanun ha divas GATARI mhanun olakhatat . 🙂 ENJOY 🙂

 2. पिंगबॅक कांदे नवमी « काय वाटेल ते….

 3. “पिने वालोंको – पिने का बहाना चाहिए!”…

  गटारीचा एकच अर्थ आपणास ज्ञात आहे – “गटारीत लुडकेपर्यंत पिणे..”

  … पण आजकाल गटारीही – एक – दोन पेगवरच मनवावी लागते 😉

 4. तुमच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद …

 5. महालक्ष्मी कॅलेंडर प्रमाणे, आज दि. २१ जुलै… गटारी आहे – तेंव्हा आजच जय गटारी!

टिप्पण्या बंद आहेत.