मै तो दिवाना दिवाना दिवाना……!


Mukesh

“इक दिन बिक जायेगा माती के मोल
जगमें रह जायेंगे प्यारे तेरे बोल
दूजे के ओठोको देकर अपने गीत
कोई निशानी छोड़ फिर दुनिया से बोल…”

हे आणी अशी अनेक अविस्मरणीय गाणी आपल्या संगीतस्रुष्टिला  देऊन मुकेशने  खरच त्याचे ते ‘प्यारे बोल’ आजही जिवंत ठेवले आहेत.भारतातील जुन्या गाण्यांचे कानसेन रफी आणी किशोरकुमार यांच्या बरोबरच एक नाव कधीच विसरु शकत नाहीत ते म्हणजे मुकेश.मुकेश म्हटल की दर्दभरा स्वर आणी थेट हृदयाला भिडणारा आणी मदहोश करणारा आवाज.त्यांची आठवण करण्याच कारण हे की काल २२ जुलै हा मुकेश यांचा वाढदिवस होता.तशी मुकेशच्या गाण्याला काही लोक नावही ठेवतात रडकी गाणी,नाकातून गायलेली गाणी  वैगेरे  पण मला पर्सनली  त्यांची  गाणी आवडतात,म्हणुनच आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्याबद्दल हे थोडस…

२२ जुलै १९२३ साली त्यांचा जन्म पंजाब  मध्ये एक साध्या मध्यमवर्गीय घरात झाला.मुकेशचं नाव खंर तर मुकेशचंद माथुर पण त्याच्या घराण्याने आता माथुर हे आडनाव टाकून त्याचं नाव हेच आडनाव म्हणून धारण केलं.याहून मोठा काय गौरव त्यांचा.त्याना लहानपणापसुनच गाणी आणी अभिनयाची आवड होती.एल. सैगल हे त्यांचे आदर्श होते या बाबतीत. दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून मुकेश दिल्लीत पी.डबल्यू .डी. त कामाला लागले.पण नियतीला काही वेगळच मंजूर होत.मोतीलाल या त्याकाळाच्या  अभिनेत्याने मुकेश यांना त्यांच्या बहिणीच्या लग्नात गाताना ऐकले.त्यांनीच मुकेशला मुंबईला  येण्यास सांगितले आणी त्यांनी मुकेशला स्वत:च्या घरात ठेवले होते.सुरुवातीच्या त्या काळात मोतीलाल यांची खुप मदत झाली मुकेशला.

१९४१ साली त्यांनी ‘निर्दोष’ या चित्रपटाद्वारे अभिनेता-गायक म्हणून या क्षेत्रात पदार्पण केल.पण खरया अर्थाने त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली ती १९४५  ला  ‘पहली नजर’ या चित्रपटातील ‘दिल जलता है..’ ह्या गाण्यापासून. योगायोगाने  हे गाण  त्यांनी मोतीलाल यांच्यासाठी गायल होत.हे लोकांना खुप आवडल आणी मुकेश रातोरात स्टार झाला त्यानंतर त्याने कधी मागे वळुन पाहिले नाही.त्यांनी आपल्या तीन दशाकाच्या कारकिर्दीत २०० पेक्षा जास्त चित्रपटात पार्श्वगायन केल.त्याना चार वेळा फिल्मफेअरचा  सर्वश्रेष्ठ पा‌र्श्वगायक हा पुरस्कार मिळाला.निर्माता म्हणूनही  त्यांनी १९५१ साली मल्हार आणी १९५६ मध्ये आक्रमण या सिनेमांची निर्मिती केली.त्यांच्या आयुष्यातील एक टर्नींग पॉइंट म्हणजे त्यांची राज कपूर यांच्याशी झालेली भेट.कारण पुढे या द्वयीने ‘आवारा’, ‘बरसात’, ‘श्री ४२०’, ‘अनाड़ी’, ‘जिस देश में गंगा बहती है’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’ यांसारख्या सिनेमाद्वारे काय इतिहास रचला ते आपल्या सगळ्याना माहिती आहेच.राज कपूर यांच्या यशात काही वाटा मुकेश यांच्या गाण्याचाहि होता हे कोणीही अमान्य करणार नाही.म्हणुनच तर जेव्हा मुकेश यांच निधन झाल तेव्हा राज कपूर यांनी ‘मी आज माझा आवाज गमावला’ असे उदगार काढले होते .

खरतर त्यांच स्वप्न गायकाबरोबराच अभिनेता होण्याचही होत.त्यांनी दुख-सुख, आदाब अर्ज, माशूका, आह, आक्रमण, दुल्हन यांसारख्या सिनेमातून अभिनेता म्हणून कामही केले.पण ते या अभिनेता म्हणून काही विशेष चमक दाखवू शकले नाही. त्यानी अभिनायासाठी काही काळ गायन ही बाजूला ठेवले होते पण योग्य वेळीच ते सावरले आणि पुन्हा गायनावर लक्ष केन्द्रित केले.१९७४  मध्ये प्रदर्शित झालेल्या रजनीगंधा मधील  गाणे ‘कई बार यू हीं देखा…’ साठी मुकेश यांना राष्ट्रिय पुरस्कार मिळाला.आज त्यांचा नातू नील म्हणुनच की काय अभिनय क्षेत्रात उतरला असून त्याने जोंनी  गद्दार आणी न्यूयार्क सारखे चांगले चित्रपट केले आहेत.चांगला अभिनय करतो नील आजोबांचा अपूर्ण  स्वप्न तो जरुर पुर करेल अस वाटते.त्यासाठी त्याला शुभेच्छा.

त्यांच्या सर्व गाण्यांच्या माहितीसाठी येथे भेट दया.मला त्यांची खालील गाणी खुप आवडतात.
* जीना यहाँ मरना यहाँ          *दुनियासे जानेवाले        *अहसान तेरा होगा मुझपे
*इक दिन बिक जायेगा          *ज्योत से ज्योत            *कभी कभी मेरे दिलमे
*चंदन सा बदन                  *मै तो दीवाना               *मै पल दो पल का शायर
* किसी की मुस्कुरहटोपे        *सुहाना सफ़र                *आजा रे अब मेरा दिल पुकारा
*दोस्त दोस्त ना रहा            *दुनिया बनाने वाले         *मैंने तेरे लिए ही सात रंग के

२७ ऑगस्ट १९७६ रोजी अमेरिकेत या अवलियाचे ह्रुदयविकाराच्या झटकयाने निधन झाले.
पण  मागे राहिला  त्यांचा तो अजरामर आवाज …

” कल खेलमे हम हो ना हो
गर्दिशमे तारे रहेंगे सदा
भूलोगे तुम भूलेंगे वो
पर हम तुम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यही अपने निशान………”

Advertisements

3 thoughts on “मै तो दिवाना दिवाना दिवाना……!

  1. खरच स्वर्गीय आवाज आहे मुकेशचा. के एल सैगलचा बराच प्रभाव होता त्यांच्या गाण्यावर, नाही ? तसा तो अर्थातच बरयाच गायकांवर होता. अगदी किशोर कुमार वर सुध्हा. छान लिहिलयस …

    http://asachkahitari.wordpress.com/

  2. या पोस्ट बद्दल धन्यवाद. मुकेश माझा ही आवडता गायक आहे. मुकेश विरुद्ध कोणी काही बोलले तर मे मारामारी करायला एका पायावर तयार असतो 🙂

टिप्पण्या बंद आहेत.