ढॅण टॅ णॅण………


एखादा ७०-८० च्या दशकातला हिंदी सिनेमा घ्या.सिनेमाचा क्लायमॅ़क्स जवळ येत आहे. सिनेमातील खलनायक नायकाच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला (भाऊ ,मित्र ,प्रेयसी ,बायको,आई. वैगेरे )मारण्यासाठी मोठ्या दिमाखात पुढे सरसावतो आणी इतक्यात नायकाची एंट्री होते आणी त्यावेळी बॅकग्राउंडला आवाज येतो तो ढॅण टॅ णॅण…. कितीतरी  चित्रपटात कथानक एका वेगळ्या दिशेला वळण घेताना अथवा बरयाचश्या हाणामारी च्या दृश्यामध्ये आपल्याला  म्यूजिक ऐकायला मिळते ती ढॅण टॅ णॅण..लहानपणी आम्ही चोरपोलीस-लपा छूपी सारखे खेळ खेळताना नेहमी आमच्या तोंडात ढॅण टॅ णॅण हा शब्द यायचा .आज हे आठवायच कारण विशाल भारद्वाज चा आगामी चित्रपट कमीने. ह्या चित्रपटाचे ट्रेलर  पाहिल तर वाटते हा काहीतरी हटके चित्रपट आहे प्रत्येक बाबतीत आता चित्रपटाच नावच बघा ना कमीने…

kaminey-wallpaper3

तर या चित्रपटात एक गाण आहे  ‘ढॅण टॅ णॅण’ जे सध्या खुपच लोकप्रिय झाल आहे.आणी बहुतेक चार्ट बसटर्स वर पहिल्या क्रमांकावर आहे.गुलजार साहेबांचे शब्द,दिग्दर्शक विशाल भारद्वाजचे संगीत, सुखविंदर सिंग आणी विशाल दादलानी  यांचा आवाज,शाहिदची ज़बरदस्त अदाकारी यांचा सुरेख  संगम आपल्याला ह्या गाण्यात पहायला मिळतो.आता हेच बघा ना  ऑरकुट वर  ह्या गाण्याची Dhan Te Nan म्हणून एक कम्युनिटी पण निर्माण केली गेली आहे आणी तेरा दिवसात तेरा हजारा पेक्षा जास्त लोकानी ती जोइन केलि आहे म्हणजे आतापर्यंत सिनेमा प्रर्दशित व्हायच्या आधीच  दिवसाला सरासरी हजार लोक ही कम्युनिटी जोइन करत आहेत.ह्यातच सगळ आल.

तशी यातील इतर गाणीही छान आहेत. मोहित चौहान ने गायलेल ‘पहली बार मोहब्बत की है’ छान जमुन आल आहे.’फटॅक’  या गाण्यात सुखविंदर सिंग आणी कैलाश खेर यांची सुरेख जुगलबंदी अनुभवायला मिळाते.विशालने स्वत: गायलेल टाइटल सोंग ‘कमीने’ मस्त आहे.शिवाय ‘रात के ढाई बजे’ मधून बरयाच दिवसानी सुरेश वाडकरचा आवाज ऐकायला मिळतो.एकुणच छान कलेक्शन आहे.हाणामारीच्या दृश्यातील  ‘ढॅण टॅ णॅण’ या संगीताचे आवाजात रूपांतर करायची कल्पना विशाल  भारद्वाजचीच.त्याची ही कल्पना निश्चितच त्याला खुप लाभदायक ठरणार आहे यात वाद नाही.खरतर विशालला कमिनेच्या प्रमोशन साठी अजुन काही वेगळ करायची गरज नाही.ह्या एका गाण्याने त्याच बरच काम केल आहे.केवळ या गाण्याच्या प्रभावानेच त्याला एक  ख़ास प्रेक्षकवर्ग मिळनार आहे तसही सिनेमाचे प्रोमोज ही एकदम ढासू आहेत बाकी विशालकडे मकबूल,ओमकारा ची पुण्याई  आहेच.त्याला कमिनेसाठी खुप शुभेच्छा.

ह्या गाण्याची सध्या स्पर्धा आहे ती ‘लव आज कल’ मधील ‘ट्विस्ट’ ह्या गाण्याशी. ‘ट्विस्ट’ हेही ऐकायला आणी नाचायला मस्त गाण आहे पण गुणगुणताना सारख  ‘ट्विस्ट  ट्विस्ट’ करून आपल्या जिभेवरच ट्विस्ट’ व्हायची पाळी येते, याउलट ‘ढॅण टॅ णॅण’ पटकन ओठावर रुळते.एक वेग़ळाच क्रेज़ आहे या गाण्यात.मी तर सध्या बरयाच वेळा कोणाशी बोलतानाही सहजपणे बोलून जातो……

‘ढॅण टॅ णॅण’

Advertisements