५० फर्स्ट डेटस विथ गोजिरी…


आताच हेमंत आठल्ये यांची ‘ऑस्करचा झाला धोबी पछाड़’ ही पोस्ट वाचली आणी लगेच आठवण झाली ती गोजिरी या मराठी सिनेमाची कारण मला तो पाहिला तेव्हा खुप खुप आवडला होता. तेव्हा असा वेगळा विषय हाताळल्याबद्दल मी मनोमन या चित्रपटाचे खुप कौतुक केले होते.(त्यावेळी ब्लॉगवर  वैगेरे लिहत न्वहतो ना ) नंतर एके दिवशी ’50 फर्स्ट  डेटस’ हा इंग्लिश चित्रपट माझ्या पाहण्यात आला. तो पाहिल्यावर कळल ‘गोजिरी’ ही तर या चित्रपटाची मराठी आवृति आहे म्हणून.

असो पण दोन्ही चित्रपट खुपच छान आहेत.तसे पण बरेच चित्रपट आपण कॉपी करत असतो हॉलीवुड मधून पण त्यातले मोजकेच चांगले होतात. गोजिरी पण अगदी सुरेख आणी पुन्हा पुन्हा पाहण्या सारखा झाला आहे.सुनील बर्वे, मधुरा वेलणकर यांच्या यांत प्रमुख भूमिका  आहेत.दोघनिही त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे .विजू मानेंच प्रामाणिक दिग्दर्शन, मिलिंद इंगळेंचे सहज सुंदर संगीत, ,कोकणातील रम्य निसर्गाची साथ या ह्या चित्रपटाच्या जमेच्या बाजु. ५० फर्स्ट डेटस मधील नायकाच्या सुंदर मत्सालयाची कमतरता कोकणातील निसर्ग आपल्याला इथे भासु देत नाही.

untitled

50_first_dates

चित्रपट सुरु होतो तो कोकणात आपला वडिलोपार्जित बंगला विकायला आलेल्या सुनील बर्वे पासून. त्याला डील फायनल करण्यासाठी पोहोंचण्यास उशीर होतो अन प्रोपर्टी विकत घेत असलेली पार्टी निघून जाते. नाईलाजास्तव त्याला गावात काही दिवस राहाव लागते.गावातल्याच एका छोटेखानी होटेलात त्याची भेट गोजिरी(मधुरा) या तरुणिशि होते.नेहमीप्रमाणेच सुरुवातीला थोडा वाद वैगेरे आटपून तो तिच्या प्रेमात पडतो.इथपर्यंत तर सर्व ठीक पण जेव्हा सुनील गोजिरिच्या वडिलांकडे (श्वास मधील आजोबा -अरुण नलावडे ) तिच्याबरोबर लग्न करण्याची मागणी घालतो  तेव्हा सुनीलला कळते की एका अपघाता मुळे गोजिरीला फक्त एक दिवसच आठवतो.(गज़निमधिल आमिर खानचा ‘शोर्ट टर्म मेमोरी लॉस’ कसा तसाच)आणी ती रोज तो एकच दिवस जगते.  कालची एकही आठवण नाही.रोज लहान बहिणिचा वाढदिवस साजरा करायचा.बस…(५० फर्स्ट डेटस मध्ये नायिका आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करते ).इथेच चित्रपट वेगळ वळण घेतो मग पुढे नायक  रोज एक नविन रुपात तिला कसा भेटतो. या आगळ्या वेगळ्या प्रेमकथेचा शेवट काय होतो हे चित्रपटात पहाणेच योग्य .

ही तर झाली हया चित्रपटाची कथा पण खरच ज्याना अस आयुष्य  जगाव लागत असेल त्यांच्याबद्दल विचार केल्यास खुप वाईट वाटते.५० फर्स्ट डेटस मध्ये तर जेव्हा नायिका उपचारासाठी एका हॉस्पिटल मध्ये जाते तिथे एक व्यक्ती भेटते ज्याची स्मरणशक्ति  तर केवळ १० सेकंद टिकते त्याच्याबरोबर बोलताना प्रत्येक १० सेकंदानी ती व्यक्ति एखाद यंत्राला रिसेट कराव त्याप्रमाणे “हाय आय एम टॉम” अस म्हणत सुरुवातीपासून  संभाषण सुरु करते.काय हे जीवन … या चित्रपटात तरी नायिका रोज लहान बहिणीचा वाढदिवस साजरा करते म्हणजे एक आनंदी दिवस जगते पण कोणाला जर रोज एखादा दुखाचा दिवास जगावा लागत असेल तर… शिवाय अश्या व्यक्तीला जपायाच म्हणजे घरातील इतराना  तारेवरची कसरत करावी लागते.या मेमोरी लॉस बद्दल तुम्हाला इथे माहिती मिळेल.

मराठी चित्रपट आवडणारयानी नक्कीच पाहिला असेल हा चित्रपट पण जर कोणी पाहिला नसेल तर त्यानी अवश्य पाहावा हा चित्रपट अगदी सहकुटुंब आणी सहपारिवार …

Advertisements

9 thoughts on “५० फर्स्ट डेटस विथ गोजिरी…

 1. yaa me jevhaa haa gojiri pahat hoto tevhaa kaahich velaat kalal kee 50 first dates varoon dhaapalaay. chaangalaa aahe but 50 FD itakaa naahee. u remember in 50 FD there was a character in hospital when Drew visits , 1o second Tom, he used to forget the things just in 10 secs and always used to introduce him with others ” Hi I am Tom ” that was funny…. anyways nice artical.

 2. मी आधी गोजिरी पाहिला आणी त्यानंतर 50FD.
  आणी हो त्या टॉम बद्दल लिहल आहे पोस्टमध्ये फक्त त्याच नाव आणि त्याच विसरायाची वेळ आठवत न्वहति.तुमच्या प्रतिक्रियेतुन ती मिळाली आता एडिट करतो पोस्ट.
  आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…!

 3. या लोकांमधली सृजनशिलता ( शब्द बरोबर असावा) संपली आहे कां असं वाटतंय..कमित कमी कुठुन कॉपी केलाय ते तरी सांगायला हवं लोकांना, उगिच फुकटचं क्रेडीट खाण्यापेक्षा.

 4. हो ना सृजनशिलता संपली आहे या लोकांची ..

  कथा,पटकथा,दिग्दर्शक —->विजू माने

  अस दिल आहे चित्रपटाच्या नामावलित. कथा कशावर आधारीत आहे त्याचा उल्लेख तरी करायला हवा ना ….

 5. मी हा ५० फर्स्ट डेट्स आधीच पाहीला होता…..
  एकदा ड्रू बॅरीमोर साठी मग ऍडम सॅंडलरसाठी…..

  त्यामूळे गोजिरी सरळ सरळ बोअर झाला!

 6. मला वाटलं होतं, हा चित्रपट ’याद रखेगी दुनिया’ या हिंदी चित्रपटावरून घेतला आहे की काय? ’यारदु’ मधे नायिकेला कॅन्सर असतो पण ती हसतमुखाने एक एक दिवस आनंदात जगत असते. (’यारदु’ एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे.) मी गोजीरी पाहिला नाही तो या कारणामुळे. आता पाहते. ’फिफडे’ पाहिला आहे.

  • नक्की पाहा.मधुरा वेलणकरन छान काम केल आहे.ऐकुणात चोरी चांगली झाली आहे.
   🙂
   (मला वाटते तुम्ही जि कथा सांगितली आहे ’यारदु’ ची तसा ’मुस्कुराहट’ नावाचा सिनेमा आहे बहुतेक… निटसे आठवत नाही.पण गोजिरी १००% ’फिफडे’ ची कॉपी आहे याबाबत काही शंका नाही)

 7. copy aahe pan tari tu lihileys tyawarun ha marathi chitrapat pahawa lagel…Khara tar aata je hatake navakhali marathi cinemas yetahet tyatle bahutek ase copych aahet..For example, Aga bai arechha, de dhakka etc…fakt changli copy kartat asa mhatala pahije…

  • मागे अस बर्याच मराठी सिनेमांबद्दल कळल…असो ऍटलिस्ट त्यामुळे लोक मराठी चित्रपट पाहु तर लागलेत ना…बाकी गोजिरी बघ ग एकदा..छान जमला आहे..

टिप्पण्या बंद आहेत.