‘सत्यम’ एव जयते …!!!


satyam
सत्यम
mahindra-satyam-300x214
आता महिंद्रा सत्यम…
 • आय. टी. क्षेत्रात देशात चौथा क्रमांक…
 • फॉर्च्युन ५०० कंपन्यांतील तब्बल १८५ कंपन्यांचा ग्राहकवर्गात समावेश…
 • तब्बल ५० मोठया  देशात विस्तार…
 • ५० हजारांहून अधिक कर्मचारी ….
 • कोर्पोरेट गर्व्हनंस चे कित्येक पुरस्कार हातात …

असा लौकिक  असतांना ….

 • सात हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा,
 • सप्टेंबरच्या ताळेबंदात फुगवून सांगितलेली शिल्लक.
 • त्या शिल्लकीवरचं खोटं व्याज.
 • बाराशे कोटी रुपयांची न सांगितलेली तूट.
 • दोन हजार कोटींची न येणारी वसुली.
 • गुंतवणुकीवर चढवून फुगवून लिहिलेला परतावा. परतावा २४ टक्के असल्याचा दावा. पण प्रत्यक्षात ३ ते ४ टक्के
 • ही परिस्थिती नवीन नसून गेली कित्येक वर्षे हेच करत असल्याची कबुली.
 • मेटास कंपनी खरेदी करणे, हा पण एक सत्य लपवण्याचा प्रयत्न वगैरे वगैरे
 • सहाशे रुपयांचा शेअर सहा रुपयांच्या नीचांकापर्यंत आपटलेलाlp12

विसरला तर नाही ना …
हो तर ही सत्यम कंपनी आता बरयापैकी सावरली आहे बर का..राजू यांनी सत्यमला ज्या
खोल दरीत लोटले होते तेथून महिन्द्रान्च्या मदतीने हळुहळू का होईना ती बाहेर येत आहे .म्हणुनच तर ज्या विलबर रॉसने (अमेरिकेतील मोठा गुतंवणुकदार) बिडिंग प्रोसेसमध्ये सत्यमच्या शेअर खरेदीसाठी केवळ रु. २० इतकीच किंमत देण्याची तयारी दर्शवली होती.तोच विलबर रॉस आता महिंद्रा सत्यमचे लाखो शेअर्स ओपन मार्केट मध्ये १२० रुपयांना विकत घेत आहे.

ऑल क्रेडिट गोज़ टू मिस्टर आनंद महिंद्रा …

23slide1

सत्यमच्या राजू यांनी हां घोटाळा  जाहीर करतांना फक्त सत्यम कंपनीचीच  नाही तर  सेबी,ऑडीटर्स  ऐकूणात संबध भारताची इज्जत वेशीवर टांगली होती.परकीय गुतंवणुकदारांचा भारतीय कंपन्यांवर असलेल्या विश्वसालाच तडा गेला होता या घटनेमुळे. ही बाब भारताच्या ऐकूण विकासाला खुपच घातक होती. आज अनेक उद्योग धंद्यात आपण अग्रेसर होत असलो तरी भांडवलासाठी आपल्याला ह्याच लोकांकडे पाहावे लागते.कारण आजही या मंदीच्या काळात जगातील बराच पैसा हा हया परदेशातील गुतंवणुकदारांकड़े ऐकवटलेला आहे.(भारतातील राजकीय नेत्यां कडील पैसा वगळता).रामलिंगम राजू यानीच १९८७ साली सत्यमची स्थापना केली होती आणी तिला गेल्या २२ वर्षात जगभरात एक नाव मिळवुन दिले होते पण त्यांची २२ वर्षाची मेहनत आता या प्रकारणामूळे पार धुळिस मिळाली आहे.(तस आंध्रप्रदेशात लोक अजुनही राजुना वाय.एस.आर इतकेच  मानतात ही गोष्ट वेगळी)जागतिक पातळीवर मंदीचा परिणाम आय. टी. क्षेत्रावरही झालेला असल्याने, या स्थितीत सत्यमबाबतचा निर्णय लांबणीवर पडला असता त्याचे खोल परिणाम  सगळ्याच उद्योग जगताला भोगावे लागले असते.

bearded-raju-313
फिल दि डिफरेंस …

07satyam-the-letter-raju-wrote
हेच ते राजू यांचे कंफेशन लेटर…


07satyam-the-letter-raju-wrote1

‘आर्थिक’ आणि ‘तांत्रिक’ महत्त्व नाही तर, भारतासारखा देशातही कितीही गुंतागुंतीचे महाघोटाळे दिग्गज, दूरदर्शी उद्योगपती आणि तज्ज्ञ सोडवू शकतात, याचे महत्त्व जगाला पटवून दिले आहे.तर हा पोस्ट लिहण्याचे कारण हेच की परदेशात बरयाच छोट्या मोठ्या कंपन्या (वर्ल्डकोम, एनरोन)अश्या प्रकारच्या घोट्याळ्यांमूळे नामशेष झाल्या असतांना आपल्या देशात ज्या प्रकारे हे प्रकरण  हाताळले  गेले ते निश्चित:च कौतुकास्पद आहे.आनंद महिंद्रा यांनी जी हिम्मत आणी विश्वास दाखवला तो वाखाखण्याजोगा आहे.एल एंड टी सारखी  मोठी  कंपनी जे करू शकली नाही ते त्यांनी करून दाखवले.त्याना लाख लाख सलाम…एखादी कंपनी संकटात सापडल्यानंतर तिचे नियंत्रण सशक्त कंपनीकडे यशस्वीरीत्या देण्याची प्रक्रिया केवळ १०० दिवसांत पूर्ण करून अमेरिकेसारख्या  व्यावसायिक कौशल्यात आघाडीवरील प्रगत देशांसमोर भारताने एक उदाहरण प्रस्थापित केले आहे.

z
सत्यमच्या समभागाची गेल्या एका वर्षातील कामगिरी …

कधिकाळी ६ रुपये गेलेला हा शेअर आता तब्बल १२० रुपये झाला आहे.ज्या गुतंवणुकदारांने सत्यम वर विश्वास ठेउन त्यावेळी शेअर्स घेतले असतिल त्यांचा नफ़ा आता तुम्हीच हिशोब करून पहा.मी सुद्धा २७-२८ रुपये असताना सत्यमचे काही समभाग घेतले होते पण ५५ रुपयांना विकून टाकले.असो सत्यमची खरी किंमत आताही कळणे शक्य नाही.‘सत्यम’च्या वित्तीय हिशेबात प्रवर्तकांनी मोठे घोटाळे करून बनावट हिशेब तयार केलेले असल्याने नव्याने हिशेब तयार करण्याचे काम (रिस्टेटमेंट ऑफ फिनॅन्शिअल अकाऊंट) पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार आहेत. (डिसेंबर मध्ये रिस्टेटमेंट अपेक्षित आहे)कारण, मागील पाच ते सहा वर्षांचे अकाऊंट्स नव्याने लिहावे लागणार शिवाय ‘रिस्क’ आहे ती निरनिराळ्या कोर्ट केसेसची, केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही ‘सत्यम’ विरुद्ध केसेस चालू आहेत. अमेरिकेतल्या यूपेड इन कॉर्पोरेशन यांनी एका पेटन्ट केसमध्ये फ्रॉडसंबंधी सत्यमविरुद्ध ५००० कोटीं रु. चा दावा दाखल केलेला आहे. ( ही केस जानेवारी २०१० मध्ये सुरु होणार आहे.)

ही सगळी आव्हाने पेलुन आनंद महिंद्रा ‘महिंद्रा सत्यम’ला एका नविन उंचीवर नेउन ठेवतील अशी
आशा आपण करुया …महिंद्रा सत्यम समुहाला पुढील प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा ….!!!

Advertisements