०९/०९/०९


digitalrain240x320

०९/०९/०९ आहे की नाही झक्कास  तारीख आजची.तर या तारखेच वैशिष्ट्य हेच की ही  या शतकातील शेवटची एक अंकी तारीख आहे.यानंतर एक अंकी तारीख येइल ती १ जानेवारी २१०१ (जवळ जवळ १०० वर्षानी).असो आपल्याला काही ख़ास देणेघेण नाही तस या दिवसाच पण बरयाच देशात आजचा दिवस खुप महत्वाचा मानला जातो आहे.चीन सारख्या देशात जिथे ९ हा शुभ आकडा मनाला जातो तिथे आज उत्साहाच वातावरण आहे. तर जापान सारख्या देशात जिथे ९ आकडा अपशकुनी मानला जातो तिथे आज थोड भीतीच वातावरण आहे .योगायोग असा की याच  थोडस  प्रत्यंतर त्या देशातील शेअर मार्केट निर्देशांकाताही आज  दिसतो आहे चीनचा शांघाय इंडेक्स वाढतो आहे तर जपानचा निक्की इंडेक्स पडतो आहे.

नेहमी प्रमाणेच याही दिवसाच्या दिन वैशिष्ट्या च्या तव्यावर जगभरात बरेच उद्योजक,भविष्यवेत्ते आणी प्रसारमाध्यम (माझ्यासारखा एक सामान्य माणुस सुद्धा हा लेख लिहून ) आपली पोळी खरपूस भाजून घेत आहेत.एप्पल ने सुद्धा या दिवसाच्या निमित्ताने आज बुधवार असून सुद्धा सन फ्रांसिस्को मध्ये एका मोठ्या मुजिक इवेंट्चे  आयोजन केले आहे.(आजवर एप्पल नेहमीच अश्या इवेंट्स साठी त्यांच्या आवडत्या मंगळवारा ची निवड करतात)फोकस फीचर्स आज त्यांचा बहुचर्चित ‘‘ हा चित्रपट आज प्रर्दशित करत आहेत.बरीच लग्नोत्सुक लोक सुद्धा या अविस्मरणीय   तारखेचा फायदा उचलून शुभ  मंगल सावधान करत आहेत.जर तुम्ही पुण्यात रहत असलात तर तुमच्या साठी सुद्धा आज ही एक ऑफर आहे बर का.

खालील  योगायोग  पहा…

सप्टेबंर हा वर्षातील नववा महिना
९ सप्टेबंर हा वर्षातील २५२ वा दिवस (२+५+२=९)
september आणी wednesday  हया शब्दातीएल अक्षरांची बेरीज …?

आता आकड्या च्या थोड्या गमती पाहू ….

  • ९ ने एखाद्या एक अंकी संख्येने गुनाल्यावर येणारया संख्येतील अंकांची बेरीज ९ येते
  • magic9-3 कोण त्याही दोन अंकी संख्येच्या अंकांची अदलाबदल करून मोठ्या संख्येतुन लहान संख्या वजा करून येणारया संख्येतील अंकांची बेरीज ९ येते.
  • magic9-6९ च्या पाढ्यातिल  संख्या उलट करून पहा..magic9-4

    कोणत्याही एका अंकी संख्येला ९ ने गुणाण्या साठी आपल्या हाताचे calculator:

    डाव्या हाताच्या अंगा ठ्याला एक याप्रमाणे इतर बोटाना क्रमाने नंबर दया उजव्या हाताची करंगळी  सहा आणी अंगठा १० नंबर येइल.आता ९ ने ज्या संख्येने गुणायाचे असेल त्या संख्येच्या नंबरचे बोट खाली दुमडावे आता त्या बोटाच्या डावी कडील बोटांची बेरीज दशक स्थानी आणी उजवी बोटांची बेरीज एकक स्थानी लिहा हेच तुमच्या गुणाकाराच उत्तर.जमत का पाहा ट्राय करून ….

 

Advertisements

2 thoughts on “०९/०९/०९

टिप्पण्या बंद आहेत.