“स्वामी”


कालच ‘स्वामी’ च पारायण आटपल.ही कादंबरी मी किती वेळा वाचली आहे ते मला सुद्धा आठवत नाही.पण कधीतरी ही परत वाचाविशी वाटते आणी मग ती वाचून काढल्या शिवाय चैन पडत नाही.असो आहेच या कादंबरीची जादू अशी.मला जर सर्वात जास्त आवडणारी १० पुस्तकांची नाव लिहायला सांगितल तर ह्या पुस्तकाच  नाव जरुर असेल त्यात.जर कोणी अजुनही वाचल नसेल ‘स्वामी’ तर अवश्य वाचाव,अजिबात निराशा करणार नाही हे पुस्तक याची १०० % खात्री….

तर  थोरल्या माधवरावांच्या जीवनावर आधारलेली ही कादंबरी.मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली,बरयाच पुरस्कारानी सन्मानित, रणजित देसाई यांची ही कादंबरी.थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन,कर्तव्यदक्षता, कर्तुत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय  प्रभावी चित्रण स्वामीत केले आहे.रणजीत देसाई यांच्या लेखन कौशल्याबाबत तर वादच नाही.माधवराव,रघुनाथराव,सखाराम बापू ,नाना ,रमाबाई ही सगळी चरित्र त्यानी जिवंत केलि आहेत.म्हणुनच तर स्वामी वाचतांना कधी माधवरावांचे कर्तुत्व पाहून गर्वाने मान ताठ होते तर काही प्रसंगी त्यांची असहाय्यता पाहून (रघुनाथराव यांच्या संबंधित) मन भरून येते.

पानिपतच्या पराभवानंतर मराठेशाही सावरून धरण्याची जबाबदारी तरुण पेशवे माधवराव यांच्यावर येऊन पडली.माधवराव पेशवे यांच्यावर लहानपणातच पडलेली ही प्रचंड जबाबदारी निभावण्याचे यथायोग्य कौशल्याही होते पण घरचे भेदी रघुनाथराव याना सांभाळण्याताच त्यांच्या वाट्याला आलेल्या छोट्याश्या कारकिर्दीतील तब्बल ७ वर्षे वाया गेली.खरतर ज्यावेळी माधवराव पेशवे झाले त्यावेळी पानिपतावारिल मोठा विध्वंस आणी त्याचे पडसाद ,प्रचंड कर्जबाजारी,ऐकसंघतेचा अभाव,मराठ्यांची एकुण परिस्थिति पाहून निजाम व हैदर यांनी केलेले उठाव यामुळे जवळ्जवळ मराठेशाहिचा अस्तच दिसत होता,आणी असल्या परिस्थितीत ज्यांच्याकडे आधार म्हणून पाहावे असे काका राघोबादादा यांच्याशिच करावा लागलेला संघर्ष अशी एकुण परिस्थिति होती पण तरीही न डगमगता “स्वामी”नी परत एकदा मराठेशाहिचा दरारा प्रस्थापित करून दाखवला.निजामाला त्यानी  दोनदा धूळिला मीळवले,नागपूरकर भोसले आणी हैदरचाही पुरेपुर बंदोबस्त केला होता .उत्तरेताही त्यानी नेमलेल्या रामचंद्र गणेश आणी महादजी शिंदे (यांच्यावरील महायोद्धा हे पुस्तक सध्या वाचत आहे मी ) यानी दिल्लीवर पुन्हा एकदा भगवा फडकवला होता.त्यांनी मराठेशाहिला जुने वैभव परत मिळवुन दिले.

स्वामी

इंग्रजांचा डावही माधवरावांनी ओळखला होता म्हणुनच जेव्हा इंग्रजांनी त्यांच्याकडे वसईच्या किल्ल्याची मागणी  केलि तेव्हा त्याबदल्यात इंग्लैंडमधील व्यापारी बेटाची मागणी करून माधवरावांनी त्यांना गप्प केले होते.निजामाच्या मदतीने राघोबानी त्याना नजरकैदेत केल्यावर त्यांनी काढलेले दिवस,मामांना केलेल्या शिक्षेमुळे आईशी निर्माण झालेला दुरावा,शेवटच्या दिवसात आजारामुळे त्यांची झालेली अवस्था ह्याविषयी वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.तर अश्या हया स्वामीचे अतिश्रमामुळे (क्षय झाल्याने ) वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी निधन झाले नाहीतर आज इतिहास काही वेगळाच असता हे काही सांगायला नको म्हणुनच तर त्यावेळी एका इंग्लिश प्रवासवर्णनकार ग्रॅंट धफ याने माधवरावांबद्दल खालील वाकय लिहले आहे …

“या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव, त्यापुढे पानपतचा आघात काहीच नव्हे”

Advertisements

13 thoughts on ““स्वामी”

 1. खरच कादंबरी खूप छान आहे. आजच सकाळी आणली वाचनालयातून आणि २०० च्या वर पाने भराभरा वाचून काढली. उरलेली उद्या वाचेन.
  माधवरावांच्या स्वभावाचे खूप पैलू दाखवले आहे. पण राघोबांबद्दल तर काय बोलावे.. हाच तो माणूस ज्याने नारायणराव पेशवेंना मारताना पाहिले पण ‘काका मला वाचवा’ या आर्त हाकेने सुद्धा त्याच्या हृदयाला पाझर फुटला नाही.

  • खरच खुपच वाचनीय आहे हे पुस्तक…आणि हे पुस्तक वाचतांना का माहित नाही पण मी माधवरांवाबद्दल खुप सेंटी होतो….

 2. “स्वामी” ही कादंबरी छान आहेच… पण विश्वास पाटील यांची “पानीपत” ही देखील तीतकीच छान आहे.. खरं तर मला स्वामी पेक्षा पानीपत ही कादंबरी आवडली.. ती वाचल्यानंतर सगळे गैरसमज दूर झाले आणि मराठी असण्याचा अभीमान आणखी वाढला.. पानीपत ला स्वामी एवढी प्रसिद्धी का मिळाली नाही हे कळत नाही..

  • निलेशजी दवबिंदुवर आपल स्वागत…
   मला वाटते स्वामी आणि पानिपत दोन्ही कादंबरया आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत त्यांची तुलना करता येणार नाही कारण त्या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आणि घटनांवर लिहल्या गेल्या आहेत.पानीपत वाचुन जसा अंगावर काटा येतो तसच स्वामी वाचल्यावर माधवरावांबद्दल वाईट वाटुन गहिवरल्यासारखे होते.विश्वास पाटील आणि रणजीत देसाई दोघांचीही लेखनशैली उत्तमच आहे.माझ्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत ही दोन्ही पुस्तके खुप वर आहेत…आपल्या प्रतिक्रियेबद्दल खरच धन्यवाद..अशीच भेट देत रहा…

 3. मराठी मानसान ही कांदबरी वाचावी मी मराठा jay maharashtra

 4. पिंगबॅक पानिपत… « दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.