निफ्टी ५००० ++ …


_nsei

गेल्या ऑक्टोबर महिन्यात जो निफ्टी निर्देशांक २५०० च्या आसपास घुटमळात होता.त्याने आज तब्बल १६ महिन्यानी परत एकदा ५००० चा जादुई आकडा  गाठला आहे .इतक्या लवकर अशी रिकवरी येइल असे कोणत्याही मार्केट वेत्त्याला  स्वप्नात सुद्धा वाटले न्वहते.पण हा बाजार नेहमीच अस ‘एक्स्पेक्ट दि अन एक्सपेक्टेड’ अस काहीतरी दाखवत असतो.असो तर मंदीच्या खोल गर्तेतुन आता कुठे बरयाच कंपन्या मोकळा श्वास घेऊ लागल्या आहेत .कारण मंदीच वादळ  जेव्हा पूर्णत: जोरावर होत तेव्हा मोठ्या मोठ्या कंपन्यांची जी परिस्थिति झाली होती ती काही तुम्हाला सांगायला नकोच ते कोस्ट कटिंग,पिंक स्लिप्स,लोसेस फारच भयावह परिस्थिति निर्माण झाली होती.त्या काळात टीसीएस,इंफोसिस ,रिलायंस  सारख्या कंपन्यांनी  सुद्धा कितीतरी जणाना पिंक स्लिप्स दिल्या होत्या.यूनिटेक,टाटा मोटर्स,डीएलएफ सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या सुद्धा क्रेडिट क्रंच  मुळे डबघाइला आल्या होत्या.त्यात जानेवारी मध्ये आलेल ‘सत्यम’च वादळ.या सगळ्या बाबींवर मात करून शेवटी निफ्टीने ५००० चा माइल स्टोन गाठ्लाच.

जगात सगळ्याच मार्केट्स मध्ये सध्या तेजीचेच वातावरण आहे.रोज नवे नवे उच्चांक तयार होत आहेत.पण मला स्वत:ला तरी बाजारातील ही प्रचंड वाढ़ पटत नाही.कारण जानेवारी २००८ मध्ये सुद्धा फुगा असाच फुगला होता आणी त्याच नंतर काय झाल ते आपल्याला माहिती आहेच . मला तरी वाटते सध्या शेअर्स विकून आपला नफ़ा पक्का करावा.कारण बाजारात सध्या जी भरघोस वाढ़ झाली आहे तिच्या मागे एक कर्रेक्शन जरुर येइल तेव्हा खालच्या पातळिवर पुन्हा खरेदी करता येइल.ज्यांनी मार्केट वर विश्वास ठेउन खालाच्या पातळिवर गुंतवणुक केलि त्याना आज चांगलाच नफ़ा होत आहे .अनेक छोटे-मोठे शेअर्स कितीतरी पटीने वाढले आहेत.तर फ्रंट लाइन ब्लुचिप स्टॉक ही काही मागे नाहित.जो टाटा मोटर्स १२२ ला कोणी घ्यायला तयार नवहत तो आता ६१० वर ट्रेड करत आहे.अशी अनेक उदाहरण आहेत.

काही ब्लू चिप  कंपन्यांच्या या वर्षातील खालचा स्तर( कंसात)  आणी सध्याचा भाव खाली देतो आहे .

रिलायंस- २१०७ ( ९३०)
इंफोसिस-२३५५  (१०४०)
भारतीय स्टेट बँक-२१०५  (८९४ )
आईसीआईसीआई  बैंक- ८८०  ( २५२)
लार्सेन- १६३५ ( ५५७)
मारुती  सुजुकी-१५५८  ( ४२८)
टाटा स्टील-५४०  ( १४६)
टाटा मोटर्स-६१० ( १२२)
हिंदाल्को- १३७  ( ३६ )
जयप्रकाश  अस्सो. -२४५ ( ४७ )
रिलायंस  इन्फ्रा – ११७९  (३५४ )
लान्को  इन्फ्राटेक -४५५   (८३ )
महिंद्रा  सत्यम- १२०  (६ )
बजाज  ऑटो -१४०७ ( २९४)
यूनिटेक-११४ (२१ )
JSW  स्टील -८००  (  १६१)

p313198-New_York_NY-Bull_Market

Advertisements

3 thoughts on “निफ्टी ५००० ++ …

    • आता काय सांगायच तुम्हाला माझ्यामध्ये तेवढे पेशंस नाही कारण मार्केट बोटम ला असताना बरेच शेअर्स मी घेतलेही होते
      पण थोड्याश्या फायाद्याताच मी बाहेर पडलो .खर तर इतकी वाढ मला अपेक्षितच न्वहति.बाकि तो नफाही माझे २००८ मध्ये
      झालेल नुकसान भरून काढाण्यासाठी पुरेसा नाही…..

  1. पिंगबॅक एमएलएम… « दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.