दि ग्रेट मराठा


mahayodha

आताच सुरेश देसाई यांच महादजी शिंदे यांच्यावरच ‘महायोद्धा’ वाचून झाल.मस्तच आहे पुस्तक.पानिपतच्या लढाई नंतर ते महादजीच्या मृत्युपर्यन्ताचा इतिहास ह्या पुस्तकात सुरेख मांडला आहे .पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकानी महादाजिंबद्दल लिहले आहे की शिवाजी महाराजानंतर राजा म्हणावा असे कर्तुत्व असलेले असे ते महादजी शिंदे.हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कदाचित हे पटेल ही .पुस्तकात मला वाटलेली त्रुट म्हणजे पानिपतच्या आधी महादाजिनी केलेल्या कामगिरीवर फारसा प्रकाश इथे टाकलेला नाही शिवाय एखाद्या चित्रपटात शोभावी अशी महादजी आणी लालनच्या प्रसिद्ध प्रेमकहाणीचा इथे उल्लेख सुद्धा  केलेला नाही.

इंग्रजांनी सुद्धा आदराने ज्यांना ‘द् ग्रेट मराठा’  म्हटले असे ते  महादजी शिंदे. यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, बाजीराव यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते.महादजी शिंदे यांनी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती.पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर  फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेत यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे महत्वाचे काम केले.त्यांनी उत्तरेतील जयपुर ,जोधपुर,आग्रा, मथुरा,कुम्हेर,बीकानेर अशी जवळ जवळ सगळीच राज्ये (भारतपुर आणी विजयनगर सोडून) जिंकली.पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.केवळ महाराष्ट्राताच नाही तर उत्तरेतील राज्यांत आजही वीर महादजी सिंधिया तसेच पाटिल बाबा  म्हणून महादजी प्रसिद्ध आहेत.म्हणुनच की काय संजय खानला सुद्धा महादजी वर  ‘दि ग्रेट मराठा’ ही मालिका काढाण्याचा मोह आवरला नाही .छान होती पण ती मालिका मला खुप आवडायची शाहबाज़ खान,मुकेश खन्ना,परीक्षित साहानी यांनी या मालिकेत चांगले काम केले होते.या संपूर्ण मालिकेच्या २४ विसीडी केवळ ९९९ रु. ना मार्केट मध्ये उपलब्ध आहेत.

lb_TheGreatMaratha

पानीपत वरील मराठ्यांच्या नाशाला करणीभुत असलेल्या  नाजिबाचे पूर्ण पारिपत्य करायचा चंग महादाजिनी बांधला होता पण नजीब महादाजिंच्या हाती यायच्या  आत विकाराने दगावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा झाबिता ह्याचाही महादाजिनी चांगलाच पीछा पुरवला पण तो जाटाच्या मदतीने उत्तरेला पळुन गेला .नाजिबाचा नातू गुलाम कादिर मात्र नाजिबापेक्षा कैक पतीने हलकट निघाला.त्याने इस्माईल बेग या सरदाराच्या साथीने  दिल्लीवर हल्ला करून तिथे जी वाईट कृत्या केलि त्यात त्याने शैतानालाही लाजवले होते.शाह आलम जो तमाम हिन्दुस्थानाचा बादशाह  होता त्याचे डोळे फोडले.शाही स्त्रियांची बेअब्रु करून अतोनात छळ केले.तेव्हा बाद्शाहने महादाजिना मदतीसाठी कळकळिचे पत्र लिहले.महादाजिंचे सैन्य त्यावेळी उत्तरेतील इतर आघाड्यांवर कामगिरी करून पार थकून गेल होत आणी गुलाम कादिर व इस्माइल बेग यांच्या सैन्याची संख्याही खुप मोठी होती.

महादाजिनी मग नानाना मदतीसाठी पत्र लिहले पण मुत्सदी नानानी महादाजिंचे वाढते महत्त्व पाहून तुकोजिना फ़क्त नावासाठी त्यांच्या मदतीसाठी पाठवले.ते महादाजिपर्यंत पोहोचलेच नाहीत उलट जाटाकड़े जाउन महादाजिना कोंडीत पकडा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सल्ले देऊ लागले.तरीही न डगमगाता महादाजिनी सैन्याला ही लढाई जिंकण्याचे आव्हान केले आणी शर्थिने लढून त्यांनी गुलाम कादरला हरवून यमसदनास पाठवले.वरील घटनेचा सडेतोड  जाब पुढे नानाना पेशाव्यांच्या दरबारात महादाजिनी विचारला.पण पुढे मराठेशाहिच्या हितासाठी दोघे एकत्र आले.पुढे बादशाहानी महादाजिंची अनेक मुस्लिम सरदारान्च्या विरोधाला ना जुमानता दिल्लीचा म्हणजेच अवघ्या हिन्दुस्थानाचा  सरसेनापती म्हणुन नेमणूक केली.शिवाय महादाजिनी बाद्शाहकडून पेशव्यासाठी वकील-अल -मुतालक ही पदविही मिळवुन घेतली.

जानेवारी १७७९ मध्ये  ब्रिटीश सैन्य कर्नल एगर्टन च्या नेतृत्वाखाली मुंबईवरुन पुण्याच्या दिशेने चाल करुन आले. वाटेत रघुनाथरावाचे काही हजार सैन्यही येउन मिळाले. मराठा सैन्याचे नेतृत्व महादजींकडे होते.महादजींनी ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व ब्रिटीशानी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करुन टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करुन वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. इस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजराथ पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटीशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले.

mahadji

आता शेवटी थोड महादाजिंच्या प्रेम कहाणी विषयी,महादजी पाणी पिण्यासाठी ओढ्यावर जातात , लालनकडे पाणी मागतात आणि ओंजळीने पाणी पिता पिता नजरानजर होऊन दोघे ‘लव ऐट फर्स्ट साईट’ मध्ये पडतात. महादजी निघून जातात पण लालन भान हरपल्याप्रमाणे झपाटल्याप्रमाणे वागू लागते .वडील तिच्या लग्नाचे बेत करतात ,पण लालन बैरागीण बनून घर सोडते .महादजीचा शोध सुरू करते. उत्तर हिंदुस्थान , दौलताबाद , मालेगाव , सुरत , बडोदा नंतर उदयपूर , इंदूर , कोटा , जयपूर अशी फ़िरत राहते. शेवटी पानिपत येथे पडलेला मराठ्यांच्या तळामध्ये तिचा  प्रियकर  भेटतो . महादजी  शिंदे  ओळख पटताच तिचा स्वीकार  करतात. पुढे पानिपतच्या लढाईत मराठे हरतात.महादजी शिंदे वार लागून घायाळ होतात.मूच्छिर्त  होऊन  पडले  इतक्यात कोणीतरी त्यांना त्यांच्या बिजली घोडीवर घालते.महादजी शुद्धीवर येऊन पाहतात तो ती लालन असते.एवढ्यात लुतुफखान सैतान , जो लालनच्या रुपावर भाळला होता तो लालनला पळविण्यासाठी मागे लागतो .बिजलीला टाच बसताच ती वाऱ्यासारखी पळू लागते.खुप थकल्यामुळे तिच्या  तोंडाला फेस येतो. त्याही परिस्थितीत धन्याला आणि त्याच्या प्रेयसीला पाठीवर घेऊन दौडत राहते .

शेवटी प्रसंग ओळखून आपले प्राण गेले तरी चालतील , पण धन्याचे प्राण वाचले पाहिजेत म्हणून लालन बिजलीवरून उडी मारून जमिनीवर लोळण घेते . मागे सैतान असतोच,तो लालनला पळवून नेतो .दोघांच्या झटापटीत लुतुफखानची कट्यार पडते तीच लालन उचलते स्वत : च्या पोटात खुपसते .वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून अगणित लढाया लढणारया महादजीच्या युद्धात झालेल्या जखमा बऱ्या झाल्या तरी ही विरहाची जखम शेवटपर्यंत बरी झाली नाही .

Advertisements

9 thoughts on “दि ग्रेट मराठा

  1. वर्डप्रेस मध्ये फॉण्टसाइज़ कशी वाढवायची ते मला माहिती नाहीये जर तुम्हाला किंवा हा ब्लॉग वाचणारया इतर कोणाला माहीती असल्यास कळवा.

  2. @ Shrikant,Savannah
    का माहिती नाही पण तुमच्या दोघांच्या प्रतिक्रिया स्पैम मेसेज मध्ये होत्या.आज सहज चेक केले स्पेम मेसेज तेव्हा त्या पाहिल्या.धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल …
    आणी हो Savannah करा तुम्ही ब्लॉग सुरु कारण मी सुद्धा तुमच्या सारखा आळशिच आहे …

  3. पिंगबॅक पानिपत… « दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.