‘कणा’..


‘कणा’ नेत्यांचा
(कुसुमाग्रजांची माफ़ी मागुन )

ओळखलंत का मतदाराहो मला,गल्लीत आला कोणी
कपडे होते खादीचे, केसांवरती गांधीवाली टोपी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला खाली पाहून
‘कही भूले तो नही’,मागे दिल होत तुम्ही मला निवडून

आश्वासने देता देता पाच वर्षे पटकन सरली
आमची स्विज़ बैंकमधील शिल्लक तेवढी वाढली

अतिरेकी हल्ले,भ्रष्टाचार,बेकारी-महागाईसुद्धा वाढली
शेतकरयानी तर प्राणही दिले पण खुर्ची मात्र वाचली

कार्यकार्त्याना घेऊन  दौरे आता  काढतो आहे
तुमच्या या गलिच्छ वस्त्यात फिरतो आहे

मागील आश्वासनांचा विषय निघताच,हसत हसत म्हटला
पुन्हा एकदा निवडून दया हा कालावधि ज़रा कमी पडला

काही आमदार जरी फुटले,  तरी मोडला नाही कणा
आम्हाला फ़क्त तुमची मते देऊन,वोट फॉर… म्हणा

556

Advertisements

12 thoughts on “‘कणा’..

 1. हा..हा…हा…!!! एकदम झकास….! खुप आवडली ही व्यंगात्मक कविता, अन तसं पाहिलं तर या नेते मंडळींना कणा असतो कुठे…?
  फक्त त्यांची ’ढेरी’चं दिसते…!!!!!!!!!!!

 2. अरे वाह.. मस्तंच जमली आहे. ही कविता वाचली आहे कां होयबा प्रशस्ती पाडगांवकरांची?? अगदी त्याच लेव्हलची झाली आहे..

 3. धन्यवाद महेन्द्रजी ….
  सध्या प्रसारमाध्यमात निवडणुकिच्या बातम्यांचा जो भडिमार चालला आहे ना ते पाहुन ही कविता सुचली.
  त्या पाडगांवकरांच्या कवितेची लिंक पाठवा.

 4. होयबा प्रशस्ती
  मुर्ख होयबा मेळवावे,
  आपुले भोवती खेळवावे,
  बुध्दीमंतासी दूर टःएवावे
  दहा मैल.

  होयबांनी मिळता निष्ठा,
  सत्ताकारणी वाढे प्रतिष्ठा,
  हा नेत्रूत्व गुण श्रेष्ठां
  पाहिजेल.

  ढूंगणासी फोड जाला,
  नेता अवघडुन चालला,
  अनुयायांनी धडा घेतला
  तैसेची चालण्या.

  होयबा अनुयायी असता
  सभेशी गर्दीची नकॊ चिंता,
  लॉऱ्या भरोनी जनता
  ओतती मैदानी.

  होयबा गल्लीत असावे
  होयबा दिल्लीत असावे
  होयबा किल्लीत असावे
  गुप्त धनाच्या.

  ऐसे टिपुन कार्यकर्ते
  निवडणुकित त्यांनाची द्यावी तिकिटे
  त्यांच्या खिशातिल पाकिटे
  जाड करावी.

  त्यांचे खांद्यावरी पाय
  ठेवोनि चढणे हाचि उपाय
  तेणे सत्तेची दाट साय
  सदा मिळे.

  होयबासी गाजर दाखवावे
  कधी सत्ता मद्य चाखवावे,
  मग कोणावरीही भुंकवावे,
  कौशल्य ऐसे.

  आपण धावता ते धावती,
  आपण चिडता ते चावती,
  देणगी देउनही पावती
  कधी न देती.

  नेत्याने भरवावा दरबार,
  होयबा गर्दी रस्त्यापर्यंत फार;
  लोकप्रियतेचे हे दार
  ऐसे उघडावे.

  एका नेत्याचे होयबा सोळा,
  त्यांनी प्रचंड गल्ला केला गोळा,
  मग साजरा केला पोळा,
  नेत्यासी सजवोनि.

  जो होयबांबरू विसंबला
  त्या नेत्याचा कार्यभाग साधला,
  नेत जरी का पादला
  होयबा सुगंधु म्हणे.

  इती श्री उदासबोधे कविजनसंवादे होयबा प्रशस्ती नाम समाप्त.

टिप्पण्या बंद आहेत.