कुलवधुचे कुंकू…


इडीअट बॉक्स समोर मी तसा जास्त बसत नाही.घरी असल्यावर माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या संगणकासोबतच जातो. (हा पण एक इडीअट बॉक्सच पण त्या इडीअट बॉक्सपेक्षा बराच शहाणा आहे बर हा)  तर हे सांगायचे होते की आमच्याकडे संध्याकाळपासून मालिकांचे बैक टू बैक शो चालु असतात या इडीअट बॉक्स वर.त्यातल्या त्यात एक आनंदाची गोष्ट अशी की एक ‘पवित्र रिश्ता’ ही हिंदी मालिका सोडली तर बाकी सगळ्या मालिका मराठीच असतात.हया मालिकाबद्दल एक सांगायच म्हणजे बहुसंख्या मालिका हया स्त्री केन्द्रित असतात.हया चैनेलवाल्यांनी घराघरातील संध्याकाळच्या वातावरणाचा चांगलाच अभ्यास केलेला दिसतो .त्यांना माहीत आहे बहुसंख्य घरात हुकुम चालतो स्त्री चाच.एरवी आपापसात भांडणारया सासू सुनाही या मालिका बघण्याच्या बाबतीत नवरयामुला विरुद्ध युति करून  बहुमत मिळवतात.

खर तर मला त्यातली एकही मालिका आवडत नाही.पण आश्चर्याची गोष्ट अशी की मला त्यातील काही मालिकांची शीर्षक गीते  खुप आवडतात. एवढी की ती चालू झाली की मी आपल्या मधल्या खोलीतून बाहेर येतो हॉल मध्ये जिथे आमचा इडीअट बॉक्स मोठ्या दिमाखात विराजमान आहे, आणि ते गाण संपल की परत बेक टू पैवेलियन आपल्या संगणकाच्या खोलीत गच्छन्ति.तुम्हाला ज़रा विचित्र वाटत असेल ना पण आहे ते अस आहे.मला कळत नकळत,या सुखानो या ,वादळवाट,अवघाची हा संसार ,राजा शिव छत्रपति अश्या अनेक मालिकांची शीर्षक गीते आवडतात.त्यातील  दोन शीर्षक गीतांच्या ओळी खाली लिहत आहे …

कळत नकळत

मन होई फुलांचे थवे
गंध हे नवे कुठूनसे येती
मन पाऊल पाऊल स्वप्नी
ओली हुळ्हुळणारी माती
मन वार्‍या वरती झुलते
असे उंच उंच का उडते
मग कोणा पाहून भुलते
सारे कळत नकळतच घडते
कुणीतरी मग माझे होईल
हात ठेवुनी हाती मिठीत घेऊन
मोज चांदण्या काळोखाच्या राती
उधळूनी द्यावे संचित सारे
आजवरी जे जपले
सात राहू दे जन्मोजन्मी
असेच नाते आपुले
असेच नाते आपुले…..

पण कसे कळावे कुणी सांगावे
आज उद्या जे घडते
जरी हवे वाटते नवे विश्व ते
पाऊल का अडखळते
वाहत वाहत जाताना
मन क्षितीजा पाशी अडते

तरी पुन्हा पुन्हा मोहरते
सारे कळत नकळतच घडते

.
वादळवाट

थोडी सागर निळाई, थोड़े शंख नि शिम्प्ले ,
कधी चांदणे टीपुर, तुझा नयनात वाचले,
कधी उतरला चन्द्र, तुझा अणि माझा अंगणात,
स्वप्न पाखराचा थवा , विसावला ओंजळीत,
कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट,
फुन्कराला नधी काठ कधी हरवली वाट,
वारा पावसाची वाट काय भासलस डाट,
कधी धूसर धूसर एक वादळाची वाट
.

असो तर काय आहे मला गेल्या काही दिवसात अशीच दोन नवी शीर्षक गीते आवडली आहेत ती मी तुमच्या बरोबर शेअर करू ईश्चितो.त्यातील पहिल गाण झी मराठी वरील कुलवधू या मलिकेच आहे.आपल्या सारेगामा मधील महागायिका वैशाली माडे हिने मस्तच गायलेल आहे ते आणि एक गोष्ट ही की हे  गाण तिने महागायिका व्हायच्या आधी गायलेल आहे.दुसर गाण आहे ते आपल्या लाडक्या वैशाली ताईच(वैशाली सामंत ) कुंकू या झी मराठी वरीलाच मालीकेच शीर्षक गीत आहे ते.झी मराठी च्या वेब साईट वर ही गाणी फुकटात डाउन लोडिंग साठीही उपलब्द्ध आहेत.खाली यु ट्यूब वरील या दोन मालिकांच्या शीर्षक गीतांचे विडियो जोडत आहे .बघा कदाचित तुम्हालाही आवडतील.

माझी डोली चालली ग दूर देशी नव्या गावा
तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्नांचा रावा
तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ
तिथले उन पाउस भरतील  माझी ओंजळ…..

माझ्या भाग्याच, माझ्या सौख्याच
लेण सोन्याच,  माझ कुंकू
रोज पूजिते रोज जपते माझ कुंकू..
मन माझे ग झाले त्याचे
मोर स्वप्नांचा दारी नाचे
शब्द त्यांचे ग अम्रुतांचे
स्पर्श त्याचे चांदण्याचे…

Advertisements