सिल्वर जुबिली …


redhearts240x320

नाही हो मी इथे कोणत्या सिनेमाच्या सिल्वर जुबिली बद्दल लिहत नाहीये तर आज माझ्या आयुष्याची सिल्वर जुबिली आहे.अहो चक्क पंचवीस वर्षाचा झालो मी आज.कळालच नाही कधी मला, कशी एका एकामागून एक एक वर्ष सरली आणि मी पंचविशी गाठली ते,काही काही घटना तर अगदी काल परवा घडल्यासारख् वाटत आहेत.असो उगाचच भरपूर लवकर मोठा झालो अस वाटत आहे.खरच आजच्या लाइफ मध्ये स्वातंत्र्य,उत्साह,एक थ्रिल असल तरी कधीही मला ते लहानपणीचच निरागस मोकळ आयुष्य आवडेल जगायला . पण गेलेली वेळ काही परत येत नाही,’लहानपण देगा देवा’ म्हणून देव काही आपल्याला ते परत देत नाही. इथे एक गाण गुणगुणावस वाटते  ‘आनेवाला पल जानेवाला है हो सके तो इसमे ज़िन्दगी बितादो पल ये जो जाने वाला है’…..’

खरच वाढदिवसाची खरी गंमत असायची ती लहानपणीच.ते वाढदिवसाच्या ७-८ दिवस आधी पासून केलेले बेत,रात्री १२ वाजता घरी येणारे मित्रांचे फोन,मग शाळेत सगळ्याना चोकलेट्स आणि पेन्सिल किंवा तत्सम गोष्टी वाटणे,सगळे यूनीफॉर्म मध्ये असतांना एक दिवस कलरफुल कपड्यात शाळेत वावरण्याची मजाही वेगळीच,ती मित्रांची छोटी-मोठी गिफ्ट्स- ग्रीटिंग्स,संध्याकाळी आरती ओवाळण्याचा,केक कापण्याचा कार्यक्रम अगदी धम्माल ….गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.

birthdayboy

Advertisements

39 thoughts on “सिल्वर जुबिली …

  1. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देवेंद्र …
    आज माझापण वाढदिवस आहे पण सिल्वर जुबिली मागच्या वर्षी होती .. 🙂

  2. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा !!! तुझ वय वाढो पण तू नेहमी असाच दिसो. तुझ तारुण्य चिरकाल टिको. आता अनावधानाने तुला शुभेछा उशिरा देतो आहे. पण पुढच्या वेळी नक्की वेळेवर देईल. बाकी तुझी मत आणि तुझा ब्लॉग मला नेहमी आवडतो. असो, तुझ आयुष्य सुखाच आणि समाधानी जावो. तुला यावर्षी एखादी छानशी गर्ल फ्रेंड मिळो. आणि असेल तर तीच राहो. हीच देवाकडे प्राथर्ना. 😉

  3. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!! भरभराट करत राहा !! तू आणि तुझा ब्लॉग दोघेही यशाच्या शिखरावर राहोत अशी देवाकडे (रजनीदेवाकडे केली तर चालत असेल तर त्याच्याकडे पण) प्रार्थना करतो..
    सिल्वर जुबिली ला अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करा…पुन्हा ही येणार नाही…

  4. आयला !!!! माझं लक्षच नव्हतं तिकडे !!! अरे तर सव्विसावं स्मरणीय करायचं !!! आपल्याला फक्त स्मरणीय पाहिजेत 😀 !! आमचे सगळेच विस्मरणीय 😦 म्हणूनच सांगतो रे !!

  5. “आयुष्याच्या वाटेवर अशे काही क्षण येतील की त्या क्षणांमुळे पुन्हा नव्याने जगावस वाटेल…..आयुष्यातील अश्याच क्षणांसाठी मनापासुन शुभेच्छा”

टिप्पण्या बंद आहेत.