दस का दम …


तुम्हाला माहितच असेल ना सोनी चैनेल वरील ‘ दस का दम’ ही मालिका. ही शाहरुखच्या ‘पांचवी पास’ बरोबरच सुरु झाली होती पण ह्या छोट्या पडद्यावर  बादशाहला युवराजने हरवले  खरतर सल्लुमियाच्या वागण्यात खुपच मोकळेपणा होता (म्हणजे त्याचे ते विचित्र  चाळे आणि बोलणे लोकांनी खपविले कारण लोकांना माहित आहे हा असाच आहे )  उलट शाहरुख़ बराच फोर्मल वाटत होता पांचवी पास मध्ये त्यातच पांचवी पास कधी विरून गेल ते कळल ही नाही. शाहरुखच्या ‘पांचवी’ वर सलमानाचे ‘दस’ भारी पडले आणि हा युवराज आज छोट्या पडद्यावर बादशाह होउन दस का दम च्या दुसरया भागातही मोठ्या प्रमाणात  टी. आर. पी. मिळवून थाटात मिरवत आहे.

हे आठवण्याच कारण हेच की ‘दस का दम’ चा अनुभव मीही घेत आहे या क्षणाला…माझ्या ब्लॉग वरील हिट्स नि १०००० हजाराचा पल्ला काल पार केला, काल माझ्या ते लक्षातच आल नाही.नाहीतर काल सोने पे सुहागा अस काही म्हणतात ना तस झाल असत मला कारण काल माझा वाढदिवसही होता ना…अगदी सुनील गावस्कर ला जेव्हा त्याने कसोटी क्रिकेट मध्ये जेव्हा  १०००० हजार धावा पूर्ण केल्यावर वाटल असेल ना तसच काहीस मला वाटते आहे.
आनंदी आनंद गडे ,इकडे तिकडे चोहिकडे …!

Blog Stats

Total views: 10117

Busiest day: 328— Saturday, July 18, 2009

बेरजा

Posts: 31

प्रतिक्रिया: 101

Categories: 12

Tags: 146

खरतर ब्लोगिंग शी काही संबध न्वहता माझा, म्हणजे काही माहिती गूगलतांना एखाद्या ब्लोगला भेट व्हायची पण त्या ब्लोगबद्दल काही देणे घेणे नसायचे हव ते वाचायला मिळाल की झाल पर्सनल अटैचमेंट न्वहति.ब्लॉग शी सर्वात पहिल्यांदा ओळख झाली ती ऑरकुट वर महेंद्रजींचा स्क्रैप आला एकदा की ‘सध्या मला  ब्लोगिंग चा कीडा चावला आहे ‘आणि खाली ‘काय वाटेल ते’ ची लिंक होती.’काय वाटेल ते’ ला भेट दिली आणि आवडायला लागल त्यांच लिहण मग बुकमार्क करून टाकल ‘काय वाटेल ते’ ला.खरच महेन्द्रजी अगदी चौफेर फटकेबाजी करतात म्हणजे त्यांच्या ब्लॉग मध्ये कितीतरी वेगवेगळे विषय त्यांनी त्यांच्या लिखाणातून हाताळले आहेत.मग काय हळुहळु ‘काय वाटेल ते‘ ,भूंगा,कंटाळा,बाल सलोनी हे काही ब्लॉगस वाचू लागलो.हे वाचतांना नेहमी अस वाटायच आपणही काही लिहाव म्हणून, तश्या ऑरकुट वर स्वत:च्या बरयाच चारोळ्या पोस्ट केल्या होत्या पण हे ब्लोगिंग च जग मला आकर्षित करत होत.

ब्लॉग वरील पोस्टसची अवलोकने :

विषय Views
‘जब वी मेट’ 503 More stats
डॉ.विक्रम साराभाई 496 More stats
ढॅण टॅ णॅण……… 421 More stats
पाऊस पडत असताना…(3) 405 More stats
५० फर्स्ट डेटस विथ गोजिरी… 376 More stats
राखी चे स्वयंवर 364 More stats
आस्ममची भास्मषा .. 294 More stats
गटारी 273 More stats
‘कणा’.. 254 More stats
दि ग्रेट मराठा 254 More stats
हे करून पहा एकदा… 250 More stats
“स्वामी” 231 More stats
विलक्षण योगायोग … 214 More stats
बजेट-२००९-१० 199 More stats
एक प्रवास कविता… 198 More stats
स्वत:चे पर्सनलाईज्ड वोलपेपर 197 More stats
कुलवधुचे कुंकू… 188 More stats
मीच का देवा …? 188 More stats
पाऊस पडत असताना…(2) 182 More stats
मै तो दिवाना दिवाना दिवाना……! 171 More stats
पाउस पडत असताना …(1) 166 More stats
पाउस आणी अश्रु … 165 More stats
माझ्याबद्दल … 159 More stats
‘वि दी लिविंग’ 157 More stats
मी तुझ्याकडे पाहील्यावर …(2) 154 More stats
उलट सुलट 141 More stats
मी तुझ्याकडे पाहील्यावर …(1) 139 More stats
सिल्वर जुबिली … 137 More stats
सहज सुचल … 93 More stats
‘सत्यम’ एव जयते …!!! 87 More stats
निफ्टी ५००० ++ … 44 More stats
०९/०९/०९ 39 More stats

त्यातच ऑरकुट वरील एक मैत्रिण केतकी हिने मला ब्लॉग बनवण्या संबधी माहिती विचारली.ती गोळा करतांना म्हटल आता बनवून टाकू आपलाही एक ब्लॉग.आणि हा  दवबिंदू  ३ जुलै २००९ ला ब्लोगिंग च्या जगात अवतरला.ब्लॉग बनवल तेव्हा स्वप्नात ही कधी एवढ्या हिट्स मिळतिल अस वाटल न्वहत.असो सुरवातीला बरयाच अडचणी येत होत्या मग ‘काय वाटेल ते’ मधील  ‘गप्पाटप्पा‘ सदरात महेंद्रजींकडून सोडवून घेतल्या  त्या अडचणी.त्याबद्दल  त्यांचे आभार . एक गोष्ट अशी आहे की १०००० च्या वर हिट्स गेल्या असल्या तरी कमेंट्स फक्त १०१ …बहुत ना इन्साफी है …त्यातलेही ३०-४० तर माझेच रीप्लाय असतील.पण मला तरी याबाबत बोलण्याचा काही अधिकार नाही कारण लोका सांगे ब्रम्ह ज्ञान असे व्हायला नको. मी स्वत: बरेच ब्लोग्स वाचत असतो पण कमेन्ट लिहायला आळशीपणा करतो.पण खरच कमेंट्स वाचून पुढच्या लिखाणासाठी  हुरूप येतो .असो माझ्या या ब्लॉग ला भेट देणारया सर्व वाचकांचे मी खुप खुप आभार मानतो.असाच लोभ असू दया…

सुहाना सफ़र और ये मौसम हसीं,
हमें डर है हम खो ना जाये काही ….!

Advertisements

4 thoughts on “दस का दम …

टिप्पण्या बंद आहेत.