डॉन


शीर्षक वाचून तुम्हाला अस वाटेल ना की आता हा कोणत्या डॉन वर लेख…अमिताभचा जुना डॉन ,शाहरुखचा आताचा डॉन की तो दुबई चा खराखुरा डॉन …? नाही या तिघांपैकी कोणावरही  हा लेख नाही .मग तुम्ही विचाराल हा कोणता नविन डॉन ,तर सांगतो तुम्हाला पुढे इतके अधीर होऊ नका .’डॉन का इन्तज़ार तो ग्यारह मुल्कों की पुलिस को है  लेकिन एक बात समझ लो डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है…’

तर झाल अस की गेल्या आठवडयात माझा एक मित्र भेटला होता मला त्याच्याशी असच इकडच तीकडच  बोलण  चालु असतांना तो म्हणाला ” डॉन माझ काही ऐकतच नाही”  माझ्या मनात विचार आला याने एखादी गैंग वैगेरे जोइन केली की काय मी लगेच त्याला प्रश्नार्थक चेहरयाने विचारल “डॉन ..?”तो हसतच उत्तरला “अरे बाबा तस काही नाही डॉन म्हणजे आमचे बाबा ,त्यांची तब्येत थोडी खराब आहे सध्या त्यामुळेच तर गावी गेलो होतो त्यांना इथे आणायाला, पण कितीही समजावल तरी ते गाव सोडायला तयार नाहीत .”आता बोला स्वत:च्या वडिलांचा उल्लेख  डॉन म्हणून केला होता त्याने (उद्या लादेन म्हणूनही करेल) या आधी मी वडिलांचा उल्लेख बाप ,बाबा , दादा ,भाऊ ,अण्णा, तीर्थरूप ,डैड असाच ऐकला होता सर्व मित्रांकडून त्यामुळे हे डॉन प्रकरण थोड वेगळ वाटल म्हणून शेअर केल इथे.तुम्हीही कोणाकडून असा एंटिक उल्लेख ऐकला असेल वडिलांचा तर इथे शेअर करा .

आम्हा मित्रांच्या गप्पांमध्ये काही मित्र वडिलांचा उल्लेख एकेरी करतात मला खरच ते आवडत नाही.मी माझ्या एक दोन मित्रांना हयाबाबत सांगुनही  पाहिले पण त्यांच म्हणन अस की काय फरक पडतो .असो ज्या व्यक्तीने आपल्याला इतकी माया दिली ,लहानाच मोठ केल ,आपले नाना हट्ट हसत हसत पुरवले त्याबद्दल थोडा तरी आदर ठेवायला हवा.निदान घरात नाही तरी बाहेर  तरी त्यांचा  अश्या पद्धतीने उल्लेख करू नये असे मला वाटते.

*वडिलांची महती सांगणारी आणि मला खुप आवडलेली एक कविता  इथे वाचा .

Advertisements

4 thoughts on “डॉन

    • हीरो म्हणुनच करतो ना..आमचे मित्रानी तर डायरेक्ट डॉन बनवून टाकला की स्वत:च्या वडिलांना.असो तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार .

Comments are closed.