शापित गंधर्व


Indopia_4a8a2e3c07b95_rahul-dravid15

सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….!

तंत्रशुध्दता, संयम, एकाग्रता, जिद्द, तीक्ष्ण नजर, चिकाटी,विनयशील आदी गुणांचा संगम असणारा असा प्रज्ञावंत खेळाडू म्हणजे राहुल शरद द्रविड.म्हणजेच जॅमी ,दि वॉल,‘मिस्टर डिपेंडेबल’मिस्टर कन्सिस्टंट,मिस्टर कुल…एकदिवसीय सामन्यात गेली दोन वर्षे संघाबाहेर असणाऱ्या राहुल द्रविडने अखेर अपेक्षेप्रमाणे दोन महिन्यापूर्वीच एकदिवसीय सामन्यात (चॅम्पियन्स करंडक स्पर्धे)पुनरागमन केले होते. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएल-2 मध्ये द्रविडला दमदार फलंदाजी करून अजूनही झटपट क्रिकेटसाठी आपण उपयुक्त आहोत हे दाखवून दयायला लागले होते.’द वॉल’ म्हणून प्रसिध्द असलेल्या राहुल द्रविडने कितीतरी वेळा  हे नाव सार्थ करून दाखविले आहे.त्याने कित्येक वेळा बेभरवशी भारताची अब्रू एक हाती वाचवली आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला इ.स. १९९६ मध्ये सुरूवात केली.पहिल्याच कसोटीत ९५ धावांची खेळी करत त्याने आपली निवड सार्थ ठरवली.तेव्हापासून अनेक चढ़ उतार आले त्याच्या कारकिर्दीत पण ही ‘भिंत’ कधीच ढ़ासळली नाही.आपल्या खेळाशी प्रामाणिक राहत तो नेहमीच चांगल्या धावा करत राहिला आणि आज तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांत एक गणला जातो.सध्या खेळत असलेल्या खेळाडूत तर तो तंत्रशुद्ध फलंदाजीचा ‘बादशाह’ आहे.

नुकत्याच झालेल्या इंग्लंडबरोबरच्या कसोटीत त्याने रिकी पोंटिंगला मागे टाकत कसोटीमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.(पहिला अर्थातच आपला सचिन आहे  🙂 ) तसेच चारशे झेल घेण्याचा पराक्रम करतच ‘लिटल मास्टर’ गावसकरांच्या ३४ शतकांच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली आहे…

तर कालच्या ई मटात पहिल्याच पानावर द्रविडला डच्चू अशी बातमी होती.ती बातमी वाचून खरच वाईट वाटले द्रविडबददल.असही नाही की पुनरागमनानंतर त्याने खराब कामगिरी केली,चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत त्याने अनुक्रमे १४ ,४७,३९,७६,४ अश्या धावा केल्या.पण निवडसमितीने शेवटी त्याला नारळ दिला कारण त्यांच्याकडे आता भारतात आपल्या गल्लीत शेर असणारे खुप फलंदाज उपलब्द्ध  आहेत (जे बाहर गेले की ढेर होउन जातात, परदेशात शेर असणारे खुप कमी खेळाडू आहेत द्रविड सारखे) खुद्द धोणीनेही अपवादात्मक एखाद दोन चांगल्या खेळ्या परदेशात केल्या असतील बाकी पाटी कोरीच… शिवाय आजकाल खुपच उर्मट वाटतो तो मैदानात वावरताना, मीडिया मध्ये बोलताना वैगेरे .डोक्यात हवा गेली की काय होते त्याचे एक उदाहरण होउन बसला आहे तो आता.

हया शांत,गुणी खेळाडूच्या वाट्याला का कोण जाणे बरयाच वेळा उपेक्षाच आली आहे.जणू काही त्याच्या  गुणवत्ते बरोबर निसर्गाने एखादा शाप ही दिलेला आहे.आला तेव्हा कित्येक वेळा बिच्चारा नवद्दीतच बाद व्हायचा,माझ्या माहिती प्रमाणे सर्वाधिक वेळा नर्वस नाइनटीज़ मध्ये बाद होण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे .हयाच्या अनेक संस्मरर्णीय  खेळ्या त्याच वेळी इतर कोणीतरी चांगली खेळी केल्याने झाकोळल्या गेल्या.खुपच कमी वेळा कौतुक त्याच्या वाट्याला आले.पण त्याने संयम आणि विनय कधीच सोडला नाही.प्रत्येक वेळी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर त्याने टिकाकारांना चोख उत्तर दिले.तुम्ही म्हणाल दिवाळीच्या दिवशी काय हे द्रविडच्या नावाने रडगाण लावल आहे पण त्याच काय आहे कि सचिन तेंडूलकर माझ क्रिकेटमधल दैवत असल तरी द्रविड मला नेहमीच त्याच्यापेक्षा जवळचा वाटत आला आहे,आणि सध्या क्रिकेट फार क्वचितच बघत असलो तरी पण खरच वाटते कि द्रविडवर अन्याय होत आहे म्हणून हि छोटीशी पोस्ट…

द्रविडची आजवरची कामगिरी :
*’वॉल’भक्तांनी  इथे  जरूर भेट द्यावी …

Advertisements

One thought on “शापित गंधर्व

  1. त्याने आज ६.४ षटकात ३२ धावांवर ४ गडी बाद अशी अवस्था असतांना नाबाद १७७* धावा फटकावत भारताच्या डावाला (३८५/६ )आकार दिला.
    शेवटी निवड समितीला आपल्या खेळीनेच योग्य उत्तर दिले.
    द्रविडचे अभिनंदन….!!!

टिप्पण्या बंद आहेत.