लोकशाहीतली घराणेशाही…


हुश …लागला एकदाचा विधानसभा निवडणुकिचा निकाल.रोज प्रसार माध्यमात आरोप-प्रत्यारोप,आश्वासने यांचा जो धिंगाणा चालु होता तो आता थोडा कमी होइल . महागाई, शेतकरी आत्महत्या,लोड शेडिंग,एस ई झेड यासारख्या अनेक मुद्यामुळे सामान्य जनता तशी सरकारवर नाराजच होती पण शिवसेना -भाजप युतिचाही लोकांना आधार वाटत न्वहता त्यात सोनिया,राहुल ,मनमोहन सिंह यांच्या स्वच्छ प्रतिमे कड़े पाहून कींबहुना दगडा पेक्षा वीट मऊ असे मानून जनतेने शेवटी काँग्रेसलाच कौल दिला.काँग्रेसला तब्बल ८२, राष्ट्रवादीला ६२, शिवसेनेला ४४, भाजपला ४६, मनसेला १३ आणि तिस-या आघाडीला ११ जागा मिळाल्या आहेत, तर  ३० जागांवर अपक्ष आणि इतर पक्षांनी बाजी मारली आहे.मनसेने  पहिल्याच  डावात पटकावलेल्या   ‘तेरा’ जागा ना विशेष महत्त्व आहे.ते आता या संख्याबळावर  काय करतात याकडेही लोकांच लक्ष राहील.याउलट शिवसेनेला भाजपा पेक्षा कमी जागा मिळाल्या मुळे विरोधी पक्षनेते पदावारही पाणी सोडावे लागणार आहे.

आपल्या देशात लोकशाही असली तरी आजवर बरेच नेते हे (विशेषत: कौंग्रेस मध्ये ) वारसा हक्काने निवडून येतात.(आपले लोक निवडून देतात) .काय सांगायच आता आपल्या येथील लोकाना आधीपासून हे नावाना भूलत आलेले आहेत खरेतर आपल्या येथील जो खरा कार्यकर्ता असेल त्यालाच त्याचा पक्ष न पाहता मतदान केले पाहिजे .पण इथे कम करणारा वेगळा आणी मलई खाणारा  वेगाळाच असा कारभार चालु आहे  कारण जेव्हा पक्षाची टिकिट वाटली जातात तेव्हा बरेच नेते हे आपले वजन वापरून आपल्या वारसाला (कोणीतरी नातेवाईक ) टिकिट मिळवून देण्यासाठी जिवाच रान करत असतात.मी अस म्हणत नाही की वारसा हक्काने येणारे सगळे नेते अगदीच निष्क्रिय आहेत पण केवळ कोणाचा वारस म्हणून त्याला मत देण उचित वाटत नाही.

तर यावेळी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख लातूरमधून विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत.कन्नड मतदारसंघातून माजी आमदार रायभान जाधव यांचे पुत्र हर्षवर्धन जाधव हे मनसेच्या तिकिटावर विधानसभेत पोहोचले आहे. अमरावती मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रपतीपुत्र रावसाहेब शेखावत यांनी  काँग्रेसचे बंडखोर उमेदवार व माजी राज्यमंत्री सुनील देशमुख यांचा पराभव केला. छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ (नांदगाव) हे नाशिक जिल्ह्यातून विधानसभेवर विजयी झाले आहेत. तर गणेश नाइकांचा मुलगा  संदीप नाईक ऐरोली येथे विजयी झाला आहे.माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे सोलापूरमधून, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे-पालवे परळीतून, तर काँग्रेस खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड धारावीतून विजयी झाल्या आहेत.शरद पवार आणी नारायण राणे यांचे वारस याआधीच लोकसभेत जावून बसले आहेत. ही तर नेत्यांच्या पुत्र/पुत्री यांची उदाहरणे आहेत नेत्यांच्या इतर नातेवाईकांचीही मोजणी केल्यास  घराणेशाहितुन निवडून आलेल्या आमदारांची संख्या लक्षणीय होइल.असो कौंग्रेस आघाडीचे  विजया बद्दल हार्दिक अभिनंदन.

लोकशाहीचा (?) विजय असो …..!

हे चित्र परत कधी दिसेल काय ...?

हे चित्र परत कधी दिसेल काय ...?

मोहिम फत्ते...आता मुख्यमंत्री कोणाला बनवायच हो.

मोहिम फत्ते...आता मुख्यमंत्री कोणाला बनवायच हो.

देखेंगे यार किसमे कितना है दम ...

देखेंगे यार किसमे कितना है दम ...

आमच्याकडेही लक्ष असू दया बाई ...

आमच्याकडेही लक्ष असू दया बाई ...

 

ये क्या हुआ...कैसे हुआ..?

ये क्या हुआ...कैसे हुआ..?

त्यांच्यावर माझा वचक असेलच...

त्यांच्यावर माझा वचक असेलच...

Advertisements

2 thoughts on “लोकशाहीतली घराणेशाही…

टिप्पण्या बंद आहेत.