कौन बनेगा करोडपती…


या जगात कोणाला करोड़पती व्हाव अस वाटत नसेल .जो तो हे स्वप्न उराशी बाळगुन  असतो.अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाचेसुद्धा `करोडपती’ बनण्याचे स्वप्न असते; परंतु स्वप्न सत्यात येण्यासाठी प्रयत्न करण्यात आपण नेहमीच  कमी पडतो.हयाच  सामान्य माणसाच्या   सायकोलोजीच भांडवल करत   तर ‘कौन बनेगा करोडपती’ सारखे कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर बसतात.

kbc

तर कालच  मेल आला होता एका  मित्राचा करोडपती होण्या संदर्भाताला ,तुम्ही म्हणाल आता हा कोणती स्कीम प्रमोट करायला लागला आहे इथे ब्लोगवर.कारण मार्केटमध्ये अश्या योजनांच अफाट जाळ पसरलेल आहे .अमुक अमुक रक्कम भरा आणि दरमहा इतकी रक्कम  घ्या किंवा मग अमुक रक्कम भरा दोन वर्षात डबल वैगेरे या स्कीम्स मध्ये सुरुवातीला बरयाच लोकांना हा फायदा दिला जातो मग एकदा लोकांचा विश्वास बसला त्या स्किम्वर आणि मोठ्या प्रमाणात  गुंतवणुक झाली लोकांची की हे भाईसाहेब पैसा घेउन पसार.आणि असे अनेक प्रकार उघडकिस येउन सुद्धा प्रत्येक वेळी लोक ‘इजी मनी’ च्या लालसेने हया प्रकाराला नाहक बळी    पडतातच.

तर मी इथे करोडपती होण्याचा जो मार्ग सांगत आहे त्यात काही स्कीम वैगेरे नाही .तुम्हाला बैंक एफ़.डी.,पोस्ट ऑफिस आर.डी.,पी.पी.एफ़.,एस आय पी,रिकरींग डिपॉझिट यांसारख्या माध्यमातून  गुंतवणुक करून सुद्धा करोडपती होता येइल.जर तुम्ही दरमहा  फक्त ५ हज़ार रुपये जर अश्या माध्यमात विना जोखीम गुंतवले तर किमान ८% व्याज दराप्रमाणे ३५ वर्षात १०७८७,०३२  एवढी रक्कम तुमच्या खात्यात जमा असेल.हेच जर तुम्ही थोडीशी रिस्क घेउन एस.आय.पी.(Systematic Investment Plan)  च्या मार्फ़त मार्केट मध्ये गुंतविले आणि त्यावर तुम्हाला समजा सरासर १६% परतावा मिळाला तर दरमहा ५००० हज़ार गुंतवून २२ वर्षातच तुम्ही करोडपती होऊ शकता.जे आता तरुण आहेत आणि चांगल्या नोकरीला आहेत  त्यांनी  जरुर याबाबत  विचार करावा.कारण तुमच भविष्य तुमच्याच हातात आहे.

Indian_rupee

परताव्याचा व्याजदर
वर्षे ८% १२% १६ %
६२,६०० ६३,९०० ६५,२००
१३०,२०८ १३५,४६८ १४०,८३२
२०३,२२५ २१५,६२४ २२८,५६५
२८२,०८३ ३०५,३९९ ३३०,३३६
३६७,२४९ ४०५,९४७ ४४८,३८९
१० ९०६,८५९ १,१२१,३६४ १,३९०, १६०
१५ १,६९९,७२२ २,३८२, १७४ ३,३६८,२००
२० २,८६४,६९९ ४,६०४, १५ १ ७,५२२,७५९
२२ ३,४७ १,५९३ ५,९ १०,९ १५ १०,२६३,४५७
२५ ४,५७६,४३२ ८,५२०,०३४ १६,२४८,७५४
२७ ५,४६८, १५८ १०,८२२,९९९ २२,००५, १५६
३० ७,०९ १,५२९ १५,४२ १, १५९ ३४,५७६,३२५
३५ १०,७८७,०३२ २७,५८३,२९७ ७३,०७०,४८५

* गुंतवणुक- दरमहा ५००० हज़ार रुपये.

*सरकारी गुंतवणुक स्कीम्स बद्दल माहिती साठी इथे भेट दया

Advertisements

11 thoughts on “कौन बनेगा करोडपती…

 1. जर दर महिन्याला वेगळे पैसे घालणं शक्य होत नसेल , तर पी एफ मधे आपलं कॉंट्रीब्युशन वाढवता येउ शकतं. म्हणजे जर सी पी एफ असेल, तर कंपनिचं कॉंट्रीब्युशन तेवढंच असेल, पण तुमचा सहभाग तुम्ही वाढवू शकता. पी एफ मधले पैसे काढता येत नाहीत, आणि त्या मुळे जरी परतावा ( आर ऒ आय) कमी असला तरी मी स्वतः प्रिफर करतो पी एफ आणि पी पी एफ…

  • पी. एफ. च कटिंग पगार हाती यायच्या आधीच होत त्यामुळे त्याच काही ओझ सुद्धा वाटत नाही ,
   कारण पैसा हातात आला की तो कसा संपतो ते कळत सुद्धा नाही मग गुंतवणुक बाजुलाच राहाते.
   विना जोखिम ८ % परतावा मिळतो यात शिवाय अगदीच इमर्जन्सी असल्यास पी. एफ. एडवांस घेता येतो.

  • मला सुद्धा पी.पी.एफ. किंवा जी.पी.एफ. हे नो रिस्क चे पर्याय जास्त योग्य वाटतात.

 2. नमस्कार,

  आज पहिल्यांदाच मी प्रतिक्रिया देते, त्याबद्धल क्षमस्व. आपली माझ्या पोस्ट वरची प्रतिक्रिया वाचली. मी आपला ब्लॉग आता नियमित पणे नक्कीच वाचीन. कधी कधी स्वताच्या भावविश्वात इतके रमायला होते कि, वास्तव जगाचे भान राहत नाही. मला स्वताला असे व्यावहारिक. आधुनिक जगाची ओळख करून देणारे ब्लॉग्स आवडतात. आपण दिलेली हि माहिती नव्हे तर आपल्या ब्लॉग ची लिंक अनेकांना पाठवणार आहे. मी इथे खूप लिहित नाही कारण प्रतिक्रिया ह्या सुटसुटीत छान वाटतात. सविस्तर मेल पाठवीन. मुले, पती, पत्नी ह्यांच्या सुरक्षित भाव विश्वा करिता, भविष्य पण नियोजन बद्ध असावे. विचार आवडला, माहिती अशीच देत राहावी. कळावे, शुभेश्च्या

  • अनुजा ताई,तुम्ही वेळ काढून इतकी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल तुमचे आभार …
   तुमच्या सारख्यांच्या शुभेच्छांमुळे नेहमीच अस लिहायचा प्रयत्न्न करत राहीन.

 3. पिंगबॅक ’नेटभेट’ मध्ये मी…… « दवबिंदू

 4. पिंगबॅक एमएलएम… « दवबिंदु

 5. पिंगबॅक दोन वर्ष – तीन पावसाळे … | दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.