नात


नुकताच घरातली काम उरकून सुधा वर्तमानपत्र चाळीत बसली होती.इतक्यात टिंग टोंग  दाराची बेल वाजली.आताच तर सतीश आणि त्याचे बाबा बाहेर पडले होते मार्केट मध्ये जाण्यासाठी  मग कोण आल असेल बर हा विचार करत तिने दुर्बिणिच्या छिद्रातुन बाहर पाहिल पाहाते तर काय बाहेर चक्क सचिन उभा होता.तिने तत्परतेने दरवाजा उघडला.आणिसचिनकडे पहातच राहिली. सचिनला प्रत्यक्ष भेटून ५ वर्ष उलटली होती.तिच्या डोळ्यापुढे ५ वर्षापूर्वी मायदेश सोडून अमेरिकेत नोकरीसाठी जातानाची त्याची मूर्ति समोर येत होती .  गेल्या आठवड्यातच त्यांच झालेल बोलण तिला आठवल तिने लटक्या रागातच सचिनला सुनावले होते “हे बघ सचिन जर हया दिवाळीला तू जर हया ताईला भेटायला आला नाहीस तर तुज माझ नात संपल म्हणून समझ… “हयावर सचिन अगदी लहान बाळा सारखा  काकूळतिला येउन म्हणाला होता “अस नको म्हणु ग ताई,हया दिवाळिला मी काहीही झाल तरी तुझ्याकडे येइनच…” त्याच्याकडे बघता बघता तिचे डोळे भरून आले.

“अग एव ताईडी असच  माझ्याकडे बघत राहशील की मला घरात पण येऊ देशील” या  सचिनच्या बोलण्याने तिची तंद्री भंगली.”अरे ये आत ये हे काय तुला सांगायला हव होय ,आणि आता पाच वर्षानी तुला सवड मिळाली हो या ताईकडे यायला” ती हसतच उत्तरली.अगदी लहानपणापासुन दोघांच एकमेकांवर खुप प्रेम होत.”ए ताई तुला राग आला का ग माझा खरच मी …” तो अगदी भावुक होउन म्हणत होता, दोघानाही गहिवरून आल होत.त्याच बोलण मध्येच कापत सुधा म्हणाली “अरे इतका सेंटी का होत आहेस, मी कधी तुझ्यावर रागावणार आहे का रे ,चल पटकन हातपाय धुवून फ्रेश हो तोवर  मी तुझ्यासाठी मस्त चहा ठेवते, सतीश आणि त्याचे बाबाही येतील इतक्यातच मग आपण मस्त गप्पा मारू” अस म्हणत सुधा स्वयंपाक घराकडे वळली.

क्रमश:

Advertisements

6 thoughts on “नात

  1. किती लहानसं पोस्ट टाकलस रे..पुढचा भाग जरा मोठा टाक उत्सुकता ताणायची नाही अशी!!!!
    तुला ’नात’ (grand daughter) म्हणायच आहे की ’नातं’ (relation)….असा गोंधळ उडाला होता नाव पाहून..
    पुढचा भाग लवकर टाक….

    • ‘नात’ रिलेशन म्हणून आहे इथे.जास्त ताणनार नाही उत्सुकता,वेळ मिळाल्यास आजच दूसरा भाग टाकायचा विचार आहे.तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद …

टिप्पण्या बंद आहेत.