नात (भाग-२)


गरमागरम चहाचा आस्वाद घेत दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या.दोघेही मनाने कितीतरी वर्ष मागे आले होते.अनेक जुन्या आठवणीना उजाळा देताना काही गंभीर प्रसंग स्मरत   दोघे भावुक  होत  होते  तर काही मिस्किल क्षण आठवून दोघेही मनसोक्त हसत होते.सहजच सुधाने टी वी चालु केला. न्यूज़ चैनल वर अमेरिकेतून भारतात येणारया विमानाला अपघात झाल्याची ब्रेकिंग न्यूज़ चालु होती.”बर झाल रे तू ज़रा आधीच इथे आलास नाहीतर ही बातमी बघून माझा जीवच गेला असता रे “सुधाच्या डोळ्यात आता पाणी  आले होते.ताई मी यावेळी नाही आलास तर तुझ माझ नात संपल अस तू म्हणाली होतीस ना मग मी इथे यायचा राहिलो असतो का ग “अस कारे म्हणतोस “सुधाने कळवळुन विचारले.”अग ताई,आईने मरायच्या आधी मला एक गोष्ट सांगीतली  होती ती म्हणजे “कितीही संकटे येवोत, तुमच बहिण भावाच ‘नात’ आयुष्यभर अगदी अबाधित ,अतूट अस ठेवा.”आणि दोघेही आईच्या आठवणीत हरवून गेले.इतक्यात मधल्या खोलीत टेलीफोनची रिंग वाजली.”आले ह मी” म्हणत ती आतल्या खोलीत गेली.

brother_and_sister
“हेल्लो” फोन उचलून सुधा म्हणाली ,
“मी सचिनचा मित्र संजय बोलतोय, माफ़ करा एक दुखद: बातामी आहे तुमच्यासाठी तुमचा भाऊ सचिन  भारतात ज्या विमानाने येत होता त्याला अपघात झाला.तो आता…. ताई सचिन आपल्याला सोडून गेला…”पलीकडून आवाज आला.
“काय …? तो तर इथे आहे.कोणी सांगितल तुम्हाला इतकी वाईट मस्करी करायला “सुधा  रागातच म्हणाली.
“ताई स्वत:ला सांभाळा,तुम्हाला भास झाला असेल.मी इकड़चे सगळे सोपस्कर पार पाडून लवकरात लवकर येतो तिथे सचिनचा मृतदेह घेउन …”यापुढे काही न बोलता त्याने फोन ठेउन दिला.

सुधाला खुप राग आला होता त्या माणसाचा आणि ती थोडी घाबरली ही होती.”अरे सचिन..” म्हणत ती लगबगीने  बाहेर आली. सचिन खुर्चीवर न्वहता.मग तिने घरात सगळी कड़े पाहिल पण सचिन कुठेच न्वहता.इतक्यात तीच लक्ष समोर चालु असलेल्या टी.वी. कड़े गेल.त्या अपघातातील मृतांची नाव खाली येत होती. त्यातल एक नाव पाहून ती जागच्या जागी थबकली आणि अगदी सुन्न मनाने टेबलवरील  चहाच्या खाली कप कड़े पाहात राहिली …

crying-man

Advertisements

8 thoughts on “नात (भाग-२)

  1. कालची पोस्ट वाचून ह्या नात्याच्या हळवेपणात गुंतले होते. पुढे काय ची उत्सुकता होतीच. पण एकदम धक्का बसला. असे कोणाच्याही आयुष्यात घडू नये. मात्र या नात्याची जपणूक करण्याची सचिनची धडपड मनापर्यंत पोचली.
    मांडणी आवडली.

टिप्पण्या बंद आहेत.