मुंबई सगळ्यांची…?


सर्वप्रथम सचिनचे  आंतरराष्ट्रीय कारकीदीर्ला  वीस वर्षे पूर्ण  झाल्याबद्दल  अभिनंदन …

sachin-tendulkar_1208999c

तर मुंबई कुणाची,या अटीतटीच्या सामन्यात शुक्रवारी थेट मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘मुंबई ही सर्व देशवासीयांची आहे’ अस म्हणत प्रांतिकतेच्या भिंतीवरून एकात्मकतेचा षटकार ठोकला.अशी बातमी मटात आज वाचली.खरतर माझ्या मते तेंडुलकरने हा चेंडू षटकार न मारता सोडून द्यायला हवा होता.कारण ‘मुंबई हम सबकी है’ अस  म्हणत इथे जे राजकारण आणि घुसखोरी होत आहे त्याची किंचितशी झळ ही सचिनला पोहोचत नाही, म्हणुनच तो वरील उदगार काढू शकला.जर तो आज एखादा  सर्वसामान्य मनुष्य असता तर नक्कीच अस म्हणु शकला नसता.कारण  या सगळ्या गोष्टींचा त्रास सर्वसामान्य जनतेलाच (फ़क्त मराठीच नाही तर इतरही स्थायीक लोक ) होतो .मतांसाठी लाचार झालेल्या राजकारण्यांच्या तोंडून अशी वाक़ये  सरास ऐकायला मिळतात.त्याच काही वाटत ही नाही कारण हया लोकांची सगळी नाटक आम्ही पुरेपुर ओळखुन आहोत.पण सचिनसारख्या कडून  अस हे डिप्लोमेटिक   वाक्य नक्कीच  आवडल नाही मला.

महाराष्ट्रातलाच मराठी माणूस नोकरीसाठी वणवण भटकत असताना मुंबईतल्या रेल्वेच्या जागा भरण्यासाठी येथील मराठी वृत्तपत्रात जाहिरात ना देता बिहारमधील स्थानिक वृत्तपत्रात ती जाहिरात येते.वाह…मग इथल्या लोकांनी काय करायचे…?पहिला आम्ही सहिष्णुतेने तिथे उद्योग धंदा नाही म्हणून आलेत बिचारे पोट भरण्यासाठी’ म्हणत  हया लोकांना इथे राहू दिल.आमच्यापैकिच एक मानल पण हळु  हळु  हे लोक आपल्याच खांद्यावर बसून उद्दामपणाने  आपल्याच कानात मुतायला लागलेत.एकेक नातेवाईकाला इथे बोलवून एका नविन झोपडीला जन्म दिला.कोणत्याही गोष्टीला काही मर्यादा असते, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच हे कळत नाही का हया लोकांना, की आपल उठल आणि पकडली मुंबई ची  ट्रेन. खरतर ही तिथल्या राजकारण्यांची आणि पर्यायाने त्यांना निवडून देणारया हयाच लोकांची हार आहे .कारण जे लोक स्वत:च्या राज्यात रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही त्यांना हे लोक पुन्हा पुन्हा  मते तरी का  देतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बरयाच रोजगाराच्या संधी असतानाही हया राजकारण्यांनी तिथे हया क्षेत्राला  उत्तेजना का दिली  नाही ही विचार करण्यासारखी बाब आहे.

आता तर उत्तर प्रदेशातील राजकारण्यांची (उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था यांचे पूर्ण बारा वाजवून)  इथे उत्तर प्रदेश स्थापना दिवस साजरा करण्या पर्यंत मजल गेली आहे.इथे कोणी मराठी ची बाजू घ्यायला गेल की हया लोकांच् देशप्रेम उफ़ाळुन येत आणि मराठीची बाजू घेणारा  गुंड आणि राष्ट्रीय एकात्मतेचे तुकडे करणारा होतो. हयाच लोकांतील एका बैलाचा राष्ट्रगीत सुरु असतांना बसून राहिलेला फोटो मघाशीच भाग्यश्री ताइंच्या ब्लॉग वर पाहिला.आणि वर हे लोक देश्प्रेमाच्या गोष्टी करतात. इथे राहतात तर इथल्या संस्कृतीशी जुळवुन घ्यायला नको का.हीच लोक पश्चिम बंगाल किंवा  दक्षिणेतील एखाद्या राज्यात उत्तर प्रदेश स्थापना दिवस साजरा करायची हिम्मत दाखवू शकतात का. नक्कीच नाही कारण तेथील लोकांची तेथील  संस्कृति विषयक जी अस्मिता आहे ती हयाना तसा विचार देखिल करू देणार नाही.आणि  आपण मराठी लोक मात्र  मराठी अस्मितेची गळचेपी चुपचाप पाहत आहोत.अश्या परिस्थितीत सचिनने हया विषयाचा गांभीर्याने  नीट अभ्यास करुनच प्रतिक्रया द्यायला हवी होती.कारण मुंबई सगळ्यांची अस म्हणत सगळे अशेच इथे येत राहिले तर आपण कुठे  जायचे…?उद्या सचिनच्या घराच्या आवारात कोणी युपी वरून येउन झोपडी बांधून राहिला तर सचिन असच  विधान करेल का.?

असो  सचिन अशीच यशाची नवनवी शिखरे गाठत आणखी बरीच वर्षे खेळत राहावा … हीच माझी शुभेच्छा…!!!

Advertisements

6 thoughts on “मुंबई सगळ्यांची…?

 1. खरय देवेंद्र तुझं…सचिनला जराशीही झळ पोहोचत नाही या घुसखोरीची म्हणून तो सहजपणे असे वाक्य बोलतोय!!!
  छान लिहीलयेस तू!!!!

  • तन्वी ताई, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद …
   मी अगदी लहानपणापासून सचिनचा पंखा आहे.पण त्या दिवशीची
   त्याची ती स्टेटमेंट मला आवडली नाही म्हणून हा लेख …
   शेवटी ज्याची जळते त्यालाच कळते…

 2. माझंही हेच मत आहे. जो आपला प्रांत नाही त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ नये. पण एक विचार असाही मनात आला की मुळात सचिनला हा प्रश्न विचारण्याची गरज काय? त्याचा सत्कार हा काही महाराष्ट्रातील यशस्वी मराठी खेळाडू म्हणून केला गेला नव्हता. खरं तर प्रश्नकाराला सुद्धा कुणाला कोणता प्रश्न विचारावा याचे भान असले पाहिजे. ते नसेल तर उत्तर देणा-याने ते त्याच्या लक्षात आणून द्यावयास हवे.

 3. कांचनजी, तुमचे म्हणणे १०० % पटते मला, आजकाल प्रसार माध्यम मोठ्या प्रमाणावर आग लावण्याची काम करत आहेत.टी.आर.पी. साठी वाटेल ते करायला तयार असतात हे लोक.तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  @दीपक
  सचिन चांगला माणूस आहे यात काहीच वाद नाही.खरतर त्याच्या बाबतीत जवळ जवळ प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक आपुलकीची भावना आहे ,म्हणुनच आपण सर्वच अगदी लहान मुलेसुद्धा त्याचा एकेरीच उल्लेख करतो म्हणुनच तर त्याच बोलण लागल ना आपल्याला बाकी कितीतरी कुत्री भुंकत असतात या विषयावर पण त्याच काही वाटत नाही आपल्याला.आणी हो माझा राजकारणाशी काडीचाही संबध नाही.मी इथे माझी वैयक्तिक मते मांडली आहेत.(माझा लेख मा. बाळासाहेबांच्या प्रतिक्रियेच्या आधीच प्रकाशीत केलेला आहे )
  तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…

 4. sachin je kaahi bolala te sahaj bolun gela pan jhale kay ki ? ek tar sachinne maahit naslelya goshtimadhye naak khupsale, aani mumbaivar saglyncha saarkhach adhikaar aahe ……..
  ase mhantaana tyala 105 hutaatmane je balidaan dile aahe yaachi jara tari kalpanaa aali hoti ka ?

टिप्पण्या बंद आहेत.