‘ट्राय’ ला जेव्हा जाग येते ….


अन्न,वस्त्र आणि निवारा या बरोबरच मोबाइल ही आजच्या काळाची  मूलभूत गरज बनत चालली आहे हे कोणीही अमान्य करणार नाही.आज भाजीवाल्यापासून भिकारयापर्यंत ,शाळेतील लहान मुलांपासून खेड्यातील वृद्ध आजींकडेही हा सरास दिसतो.धड खायला नाही, रहायला घर नाही पण मोबाइल मिरवणारे  महाभागही आहेत.अस असताना गेल्या एक दोन महिन्यात ट्राय (टेलिफोन रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया)  ग्राहकांच्या हितसंबधांकडे लक्ष देण्याची चांगलीच ट्राय करत आहे.जवळ जवळ सर्वच क्षेत्रात महागाईचा भस्मासुर सर्व सामान्यांना वाकुल्या दाखवत असतांना ट्राय ने  मोबाइल सेवा स्वस्त केल्या आहेत.पाच सहा महिन्या आधी पर्यंत अनियंत्रित असलेल्या मोबाइल सेवा देणारया कंपन्याना त्यांनी बरयापैकी   नियंत्रणाखाली आणले आहे.टाटा डोकोमो ने पर सेकंड बिलिंग योजना आणल्यावर  ट्राय ने इतर मोबाइल सेवा देणारया कंपन्यानानाही पर सेकंड बिल आकारण्यास  सांगितले.याला कंपन्यांचा विरोध झालाच पण ट्राय आपल्या निर्णयावर ठाम राहिली.

मोबाइल कंपन्यांचे शेअर्स कोसळले पण सर्वसामान्य जनतेला महागाईने जगण मुश्किल केलेल असतांना   एकतरी सेवा स्वस्त झाली. (खासकरून एस . टी . डी . सेवा )त्यानंतर त्यांनी एसएमएस चे दर ही कमी करण्यास सांगितले.परवाच प्रेस रिलीज़ मध्ये त्यांनी जानेवारी २०१० मध्ये फ़क्त १९ रुपये भरून  मोबाइल कंपनी बदला पण मोबाइल नंबर तोच राखा असे जाहिर केले. मोबाइल कंपनीची सेवा वाइट असून सुद्धा सगळ्या नातेवाईकाना,मित्राना,व्यावहारिक संपर्कासाठी तो क्रमांक दिलेला असल्याने तो बदलणे जीवावर येत होते, त्यांच्यासाठी खुपच चांगली सोय आहे ही.एकदा मोबाईल नंबर कार्यरत झाल्यानंतर ९० दिवसानंतरच अशाप्रकारे मोबाईल कंपनी बदलता येईल.बर झाल स्विचिंग साठी फ़क्त १९ रुपये दर ठरवला ते कारण तो ठरवला नसता तर हया मोबाइल सेवा देणारया कंपन्यानी तो जास्त ठेउन ग्राहकांकडून यासाठीही चांगलाच पैसा उकळला असता आणि ग्राहकाला  क्रमांक बदलताना थोड़ा विचार करायला लागला असता.

शिवाय मोबाइल कंपनी बदलायची सोय  असल्यामुळे पुढे ह्या कंपन्यांही आपले ग्राहक राखण्यासाठी चांगल्यात  चांगली   सुविधा देण्याचे प्रयत्न करतील.आणि जेवढी हया कंपन्यांची स्पर्धा जास्त होइल तितकाच फ़ायदा ग्राहकांना होइल यात वाद नाही. ट्राय ची ही पाउले महागाईने पिडलेल्या जनतेला थोड़ा का होईना दिलासा देत आहेत.इतर रेगुलेटरी बोर्डानी सुद्धा या पासून बोध घेत सामान्य जनतेचे हित संबंध जपण्यासाठी पाउले   उचलावीत हीच अपेक्षा आपण ठेउ….

वाचाकाना एक सूचना :

३० नोव्हेंबरला ज्या मोबाईल हॅंडसेटचा “आयएमईआय’ (इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटी) क्रमांक योग्य नसेल त्यांची सेवा संबंधित कंपन्यांकडून आपोआप बंद करण्यात येइल. त्यासाठी आपला “आयएमईआय’ क्रमांक वैध आहे का हे तपासून पहायचे आहे. आपला तो क्रमांक ५३२३२ किंवा ५७८८६ वर  “एसएमएस’ करायचा आहे.(*#०६# दाबुन तुम्हाला तुमचा आयएमईआय क्रमांक पाहता येइल) जर आपला तो क्रमांक अवैध असेल, तर तो वैध करून घेण्यासाठी ‘जीआयआय’ सेंटरवर जाऊन १९९ रुपये भरून तो वैध करून मिळणार आहे.याबद्दल अधिक माहिती  इथे भेट दया.

Advertisements

9 thoughts on “‘ट्राय’ ला जेव्हा जाग येते ….

 1. आयएमईआय रजिस्ट्रेशनची आठवण करून दिल्याबद्दल खूप आभार. माझ्या भावानेही मला ही माहिती दिली होती, तेव्हा माझा आयएमईआय त्यानेच रजिस्टर करून दिला होता पण माझ्या मित्रमैत्रीणींना हे सांगायचं राहिलं होतं. आता लगेच सांगते. ही पोस्ट ट्विट करत आहे. सर्वांनाच उपयोगी पडेल.

  • अश्याच काही महत्वाच्या गोष्टी आपण विसरून जातो दैनदिन कामाच्या व्यापात ,म्हणुनच इथे टाकली ती माहीती शिवाय माझ्या पोस्टच्या संबधितच माहीती होती.त्या माहितीचा कोणाला तरी फ़ायदा होतो आहे हे वाचून आनंद झाला.तुमचेही आभार जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवल्याबद्दल….

 2. देवेंद्र सविस्तर माहीती दिलीस. धन्यवाद. सध्या मायदेशाबाहेर असल्याने मला लागलीच उपयोग होणार नाही कदाचित पण आमच्या सिनिअर्सना व मित्र-मैत्रिणींना लागलीच सांगते. फायदा होईलच.:)

  • खरतर ट्राय च्या कामागिरीला अप्प्रीशीएट करायला ही पोस्ट टाकली होती आणी ही माहीती त्याच्याशी सलग्न असल्याने सोबत जोडली.आपण नेहमीच जे वाईट आहे त्याबद्दलाच बोलत असतो तेव्हा एक बोर्ड जे थोड निट काम करत आहे त्याबद्दलही लोकांना समजायला हव म्हणून ही पोस्ट …
   प्रतिक्रियेबद्दल आभार …

  • आता भेट देणारे पाहुणे साठी http://whos.amung.us/stats इथे widget मिळेल.
   ट्राफीक फीड च्या विझेट साठी http://feedjit.com/joinjs/ इथे भेट दे.
   http://www.indiblogger.in/signup.php इथे तुझा ब्लॉग रेजीस्टर कर मग ते काही दिवसात ते रँक च विझेट मेल करतील .
   अजुन काहीही माहीती हवी असल्यास जरुर विचार शक्य तेवढा प्रयत्न करीन माझ्याकडून….
   कविता वाचून तिथे प्रतिक्रिया देतो वेळ काढून …

 3. अरे देव, हे मला सोमवारी समजले आणि मी माझा नंबर पाठवायचा वरवर प्रयत्न करून पाहिअल पण शक्यच झाले नाही. बघू काय होते ते.

 4. पिंगबॅक ’नेटभेट’ मध्ये मी…… « दवबिंदू

टिप्पण्या बंद आहेत.