वपुंच्या चाहत्यांसाठी…


जो माणुस जीवनाला कंटाळलाय, वैतागलाय त्याला एवढचं विचारावसं वाटतं

“राजा, तू कधि लताचं गाणं ऐकलयंस? ‘ रसिक बलमा ‘ किंवा ‘ ओ बसंती ‘ डोळे मिटुन तंद्रित ऐकलयसं. आणि जर नसलसं तर ऐक.पुन्हा पुन्हा ऐकत रहा. तुला जगावसं वाटेल.आणि असं वाटत असतानाच तु वपुंच्या कथा ऐक. तुला कधिच मरावसं वाटणार नाही. ”

वपुंच्या एका वाचकाने पाठवलेल्या पत्रातील हे वाकय वपुंबद्दल बरच काही सांगुन जाते.मला झोपेतुन उठवुनही कोणी माझा आवडता लेखक विचारला तर माझ्या तोंडातुन वपुंचच नाव निघेल.(बरयाच लोकांच्या तोंडुन एकल आहे कि त्यानाही तारुण्यात असतांना वपुनी असच झपाटल होत)  त्यांची सहज सोप्या कथांतुन जिवनावविषयी खोल तत्वज्ञान मांडण्याची शैली मला आवडते.बर वपुंवर नंतर कधी तरी टाकेन एक पोस्ट. खरतर मला इथे वपुंच्या चाहत्यांशी वपुंबद्दलच्या दोन बातम्या शेअर करायच्या आहेत.

आपत्ती पण अशी यावी, की त्याचाही ईतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा..पडुन पडायचच तर ठेच लागून पडू नये. चांगले दोन हजार फूटांवरुन पडावं. माणूस किती उंचावर पोचला होता, हे तरी जगाला कळेल -वपु

काल ऑरकुटवर  वपुंच्या कम्युनिटीला भेट दिली तेव्हा कळले की वपुंच्या कन्या स्वाती चांदोरकर हया लवकरच वपुंच्या दोन ऑडीओ सी.डी. काढत आहेत.वपुंच्या कथा पत्रव्यवहाराव्यतिरिक्त घरच्या काही आठवणीही सीडीत  आहेत.हया सीडीत स्वत: वपु कन्या स्वाती चांदोरकर, सचिन खेडेकर, संपदा जोगळेकर,निखिल हजारे यांचा सहभाग आहे.हया सीडीचे मार्केटिंग करण्यास कोणी इच्छुक असल्यास त्यांनी स्वाती ताईंशी  swati.chandorkar@yahoo.in इथे संपर्क साधावा.हया   सीडी वपुंप्रेमीसाठी आनंदाची पवर्णी ठरतील हयाबद्दल वाद नाही.स्वाती ताईंनी लवकरात लवकर त्या प्रदर्शित कराव्यात हिच सदिच्छा.

AS you Write more and more personal it becomes more and more universal-वपु

दुसरी बातमी आहे ती वपुंच्या अजरामर कलाकृति पार्टनर बद्दल.१९७७ मध्ये वपुंनी लिहलेल्या हया कादंबरीची जादु आजही वाचकांना पार वेड लावते.तर हया कादंबरीवर आता दिग्दर्शक समीर सुर्वे चित्रपट काढत आहेत.आपला ’पार्टनर’ मोठया पडद्यावर अनुभवण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. गमंत म्हणजे वपुप्रेमींनासुद्धा यात सहभाग घेता यावा म्हणुन हयातील कलाकार ओपन ओडीशन घेउन निवडले जाणार आहेत.ओडीशन मध्ये भाग घेण्य़ासाठी ९७७३३१३६५१ या क्रमांकावर संपर्क साधावा. हया चित्रपटाची प्रत्येक वपुप्रेमी चातकाप्रमाणॆ वाट बघेल याबाबत शंका नाही.

पारिजातकाचं आयूष्य लाभलं तरी चालेल. पण लयलुट करायची ती सुगंधाचीच ……वपु.

Advertisements

8 thoughts on “वपुंच्या चाहत्यांसाठी…

 1. वपुंची पुस्तकं खुप वाचलीत अगदी सुरुवातीला.नंतर तीच घासुन गुळगुळीत झालेली वाक्य वाचायचा कंटाळा यायला लागला. तरी पण अजुनही एखाद्ं पुस्तक वाचतोच हाती लागलं तर. पण आधी सारखा उत्साह नाही राहिलेला.. ती सिडी घेईन विकत..

  • महेंद्रजी,
   सारख तेच केल तर नक्कीच कंटाळा येतो त्या गोष्टीचा.मी सर्वच प्रकारची पुस्तक वाचत असतो
   पण मध्ये मध्ये एकतरी वपुंच पुस्तक लागतेच मला मग भले मी ते आधी वाचलेले असेल तरी
   चालते.तसही वयानुसार पुस्तकांची आवड़ही आपोआप बदलत जाते.लहानपणी मी पुलंचा असाच
   चाहता होतो पण त्यांची जागा वपुनी कधी घेतली ते मलासुद्धा कळले नाही.मी सुद्धा घेणार आहे ती सीडी.

 2. मानवाच्या (किंवा at least माझ्या तरी) ४ मुलभूत गरजा .. अन्न, वस्त्र, निवारा आणि पार्टनर.. अजूनही ३-४ महिन्यातून एकदा तरी माझं पार्टनर वाचणं होतच.मस्त बातमी दिलीत. नक्की घेईन ती सीडी..

  • पार्टनर आहेच तस …जीवना विषयीच तत्वज्ञान आकंठ भरलेल आहे पार्टनरमध्ये…
   मलाही वपुंची गरज पड़तेच अधून मधून…प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद …

 3. vapuncha lekhan he samanya manasachya aatal lekhan hot. tithe artificial as kahich navhat…..
  partner he tyacha uttam udaharan,
  dusar sakhi…………… ekunach manavachya antarangacha ved ghyava to va pu ni………
  ani swabhavacha rekhatan karava te pu la ni…………….

  nahi ka?
  apratim mahitisathi………abhari ahe….

  • वपु आणी पुल यांच्या लिखाणाबाबत जे लिहल आहे ते पटते. मनुष्याचे बाह्यरंग आणी स्वभाव याबाबत पुल अगदी हुबेहूब वर्णन लिहायचे आणी वपु व्यक्तीच्या अंतरंग आणी भावविश्वाचे सुरेख सादरीकरण करायचे.प्रतिक्रियेबद्दल आभार …

 4. मी स्वत: वपुंची मोठी फॅन आहे…..वपुर्झा, आपण सारे अर्जून कायम असतात माझ्याजवळ…..सीडी मात्र नक्की विकत घेइन….

  • प्रत्येकाने संग्रही ठेवाव असच आहे वपुर्झा…
   ‘आपण सारे अर्जुन’ सर्वात पहिल्यांदा वाचले तेव्हा फुल बाऊन्सर गेले होते.हळु हळु ते समजायला लागले. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद …

टिप्पण्या बंद आहेत.