दुरावा…


हा दुरावा…

हया प्रवासातील दुरावा
नजरेतील दुरावा
सख्यासोबत्यांचा दुरावा
मिटुन दे सगळा दुरावा

का कोणी जवळ आहे
का कोणी दुर  आहे
नाही माहित इथे कोणाला

जवळ येत आहे कि
दुर जात आहे मी
मला कळतच नाही
आहे तरी कुठे मी

हा दुरावा…

कधी झाल अस, एकट्या प्रवासातही
तु होतिस सोबती
कधी तुला भेटुन, परतल हे ह्रदय
मोकळ्या हाती

कधी असही झाल
जस आताही  झाल
तुला सगळ्यांत मी मिळवल…

मला तुझा बनवुन टाकतो हा दुरावा
सतावतो हा दुरावा
तडपवतो हा दुरावा
मिटु्न दे सगळा दुरावा

कधी बोललोही नाही
जगु शकणार नाही
तु जर मिळाली नाही

तु्ला चुकुनसुद्धा बोललो नाही
मला हवा आहे दुरावा
फ़क्त अंतर असु दे
वेदना बनुन जे बोलु दे
हा लगाव अजुन नवा होउ दे…

तुझा माझा संपु दे हा दुरावा
परका आहे हा दुरावा
बाजुला होउ दे हा दुरावा
मिटुन दे सगळा दुरावा….

हा दुरावा…

[मुळ गाण:      ये दुरिया
चित्रपट:          लव आज कल
रचना:              इर्शाद कामिल
संगीत:             प्रितम चक्रबोर्ती
गायक:             मोहित चौहान ]

[श्रीकृष्ण सामंत यांनी त्यांच्या ब्लोगमध्ये बरयाच गाण्याचे छान अनुवाद केले आहेत.त्यांपासुन प्रेरणा घेउन माझ्या आवडत्या गाण्याचा अनुवाद करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.खाली गाण्याचा विडीओ जोडतो आहे.तोही गाण्यासारखाच सुंदर आहे.]

Advertisements

15 thoughts on “दुरावा…

  • अनुजाताई, खुप आवडते मला हे गाण. म्हणून अगदी मनापासून अनुवाद केला.
   माझ्या स्वप्नपरीला जेव्हा भेटेन तेव्हाच हा दुरावा मिटेल/निर्माण होऊ शकेल… 🙂
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद …

 1. सुंदर मराठी अनुवाद मित्रा
  छानच………
  कुणाला तू सांगितलं नसतास न तर
  एक उत्तम कविता म्हणूनही तुझी लोकांनी प्रशंसा केली असतीच…
  पण आपण संवेदनशीलता मानतो आणि म्हणून प्रामाणिकपण अपोआप आपल्या
  मागे सावली सारखा असतो….. तू स्वच्छ मानाने अनुवाद कसला आणि कुठला केलास हे हि सांगितलेस
  ते जास्त महत्वाचे……

  अनुवाद लिहावाच…
  पण तो इतका छान असेल तर तुझे स्वताचे काव्य लेखन निश्चितच अजून बहरेल यात शंका नाही…
  आम्हालाही एक आदर्श लाभेल न…………. कवितेच्या क्षेत्रात…
  बरोबर न?

  • सर्व प्रथम इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद …
   चारोळ्या लिहायला मला आवडते.( ५० च्या वर चारोळ्या लिहाल्या आहेत) कविता तसा माझा प्रांत नाही पण लिहायचा प्रयत्न करतो.मी मोजुन ७ कविता लिहल्या आहेत आतापर्यंत त्यातल्या पण दोन (नशीब आणी कणा) मेल मध्ये मलाच कितीतरी जणानी पाठवल्या आहेत (मला काहीही क्रेडिट न देता) त्यांना मला पटवून द्याव लागल की बाबा ही माझी कविता आहे.कालच गावचा कट्टा म्हणून एका ब्लॉग ला भेट दिली तर तिथे माझी ‘कणा’ विराजमान होती माझ्या किंवा माझ्या ब्लोगचा उल्लेख न करता.मी तिथे प्रतिक्रया द्यायचा प्रयत्न केला पण देता आली नाही.असो विषय बदलत आहे.श्रीकृष्ण सामंत यांच्या ब्लॉग वरील अनुवाद वाचताना हया गाण्याचा अनुवाद करायचा विचार आला कारण मी कधी कधी हे गाण अस मराठीतच गुणगुणत असतो.तुझ्या प्रतिक्रियेमुळे पुढे ही असाच लिहायचा प्रयत्न करेन.तू रोज छान कविता लिहतोस असाच लिहत रहा.

 2. सुंदर अनुवाद केला आहे देव! हि तर एक छानसी कविताच तयार झाली आहे. आणि हो तुला स्वप्नातली परी लवकर गवसो यासाठी शुभेच्छा. 🙂 आणि हा दुरावा लवकर मिटो.

 3. देवेंद्र अनुवाद खरेच अतिशय उत्तम केला आहेस…:) खरे तर हा अनुवाद आहे असे केवळ तू लिहिलेस म्हणूनच कळतेय. मस्तच.

 4. मला ’कैसी है ये ऋत के जीसमे….’ हे दिल चाहता है मधील गाणं खूप आवडतं. त्याचा अनुवाद तुम्हाला करता येईल का?

 5. पिंगबॅक इमोसनल अत्याचार कंटीन्युज…. « दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.