5.+1 ते 3Ϊ


एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात २२ एप्रील १९७४ ला जन्म, १९९५ साली ‘ आयआयटी दिल्ली ‘ आणि १९९७ साली ‘ आयआयएम-अहमदाबाद ‘ मधून पास आउट तेही  ‘ बेस्ट आऊटगोइंग स्टुडंट ‘ चं मेडल घेउन.हाँगकाँगमधील एका मोठ्या नामांकीत अमेरिकी बँकेत इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणुन नोकरी.अगदी वेल सेटल्ड असा तो.पण हे सर्व असतांना त्याच मन त्याला वेगळीकडॆच ओढत होत त्याच्या लेखक होण्याच्या स्वप्नाकडे.तस त्याने शिकत असतांनाच ठरवल होत चांगला पैसा कमवायचा आणि मग सगळ सोडुन पुर्ण वेळ लेखक व्हायच.अश्या प्रकारचे निश्चय बरेच लोक करत असतात पण काळाच्या ओघात ते कसे विरघळुन जातात ते त्यांना कळतही नाही.पण त्याने आपला निश्चय कायम ठेवत लेखक व्हायच स्वप्न जिवंत ठेवल.

त्यासाठी त्याने आपल्या आयआयटी मधील जिवनावर लिखाण केल आणिते ड्राफ़्ट्स घेउन बरयाच प्रकाशकांचे उंबरठे झिजवु लागला.बहुतेक ठीकाणी नकारघंटा ऐकुनही तो फ़िरत राहिला आणि शेवटी रुपा पब्लिकेशन त्याच पुस्तक प्रकाशीत करायला तयार झाली.त्यातुनच २००४ साली जन्म झाला ‘ फाइव्ह पॉइंट समवन:  व्हॉट नॉट टू डू अॅट आयआयटी ‘ चा (आता बहुतेक त्याला व्हॉट नॉट टू डू अॅट बॉलीवुड म्हणून एक पुस्तक लिहाव लागणार आहे 🙂 )  आणि पुढे जे काही झाल तो इतिहास आहे.रुपा पब्लिकेशनने ज्या लेखकावर विश्वास दाखवला तोच आज ’बिगेस्ट सेलिंग ईंग्लीश लॅंगवेज नोवेलिस्ट इन इंडिअन हिस्टरी’(न्युयोर्क टाइम्स) अस बिरुद मिरवतो आहे.तुम्ही ओळखल असेलच मी कोणाबददल लिहतो आहे ते, हो तोच तो चेतन भगत.

तो काही एकदम महान लेखक आहे किंवा खुप उच्च विचार त्याने मांडल्यात अस नाही.पण त्याने आपण पुस्तक कशासाठी आणि कोणासाठी लिहतो आहे याच नेहमीच भान ठेवल आहे.तो म्हणतो मी लोकांच मनोरंजन करण्यासाठीच पुस्तक लिहतो.तो म्हणतो मी लोकांना चिप्स(पुस्तक) देतो आणि ते ती आवडीने खातात. म्हणुनच तर त्याची पुस्तक एकदम दर्जेदार नसली तरी सहज,वास्तववादी,मनोरंजक आणिआपल्या आयुष्यातील घटनांशी संबध जोडायला लावणारी अशी आहेत.माझ्या मते हाच  त्याचा बेस्टसेलिंग चा फ़ंडा आहे.सर्वात पहिल्यांदा मी ‘फाईव्ह पॉईंट समवन’ वाचल ते माझा एक मित्र मिलिंद  याच्या रेकंमडॆशनमुळे आणि त्याच्याकडुन घेउनच ( त्यावेळी ईंग्लिश पुस्तक तरी विकत घेउन वाचत न्वहतो.शिवाय दुसरयाच पुस्तक घेतल कि कस पटापट वाचुन होत परत द्यायच प्रेशर असत ना… 🙂 ).

सर्वप्रथम मला वाटल किती दिवस लागतील हे वाचायला कारण जरी ईंग्लिश पुस्तक अधुनमधुन वाचत असलो तरी वेळ लागायचा ती पुस्तक वाचतांना.पण आश्चर्यम ‘फाईव्ह पॉईंट..’ फ़क्त दोन दिवसात संपल. (सर्व दैनंदिन कामांसहित) मनोरंजनाचा जबरदस्त तडका घेत हे शक्य झाल ते चेतनच्या विशेष शैलीमुळेच.पुस्तकाबददल पुढे लिहतोच.टाइम्स ओफ़ इंडीया समुहाने या पुस्तकाबददल ’ए मस्ट रीड फ़ोर बोथ आयआयटीयन्स अॅड नोनआयआयटीयन्स’ अस म्हंटल आहे ते नुसतच नाही.हे पुस्तक वाचुन मी सुदधा चेतनचा पंखा झालो. आज माझ्याकडॆ    चेतन भगतची चारही पुस्तक (स्वत: विकत घेतलेली 🙂 ) आहेत.त्याने साहित्य अकादमी पुरस्कारांसंबधी केलेल विधान मला अजिबात पटत नाही पण अगदी खर सांगतो त्याच्यामुळेच मी आज इतरही बरीचशी ईंग्लीश पुस्तक घेउन वाचतो.(तरीही अभिमानाने सांगाव वाटते हया पुस्तकांपेक्षा मराठी पुस्तकच मला जास्त  आवडतात)

सहकुटंब सहपरिवार...

त्याच्या पुस्तकांच एक विशेष म्हणजे त्याच्या चारही पुस्तकातील मुख्य नायकाच नाव हे कॄष्णाच आहे शिवाय त्याच्या चारही पुस्तकाच्या नावात एक ना एक अंक आहे.यासंबधी त्याला विचारल असता तो म्हणतो ’शेवटी मी एक बँकर आहे त्यामुळे हे आकडे काही माझ्या डोक्यातुन जात नाहीत’. चेतन भगत त्याच्या ब्लोग आणि ट्वीटर वरुन नेहमीच वाचकांच्या संपर्कात राहिला आहे.गेल्या वर्षीच त्याने आपली नोकरी सोडली व पुर्ण वेळ लेखक होण्याचा निर्णय घेतला व आपली सहचारिणी अनुषा व जुळे पुत्र इशान आणि श्याम यांना घेउन मुंबईत रहायला आला आहे.तो आता टाइम्स ओफ़ इंडीया आणिदैनिक भास्कर मध्ये अधुन मधुन काही लेख लिहत असतो ते वाचायचे असल्यास इथे भेट दया.आपल्यामधील स्पार्क जिवंत ठेवण्यासंबधी पुण्याच्या सिम्बायोसिसमध्ये बीबीएच्या नव्या विद्यार्थ्यांसमोर केलेलं हे भाषणही नक्किच वाचनीय आहे.ते वाचण्यासाठी इथे भेट दया.त्याच लिखाण हे बहुतांशी तरुणाईला समोर ठेवुन केलेल असल्याने ते एका ठरावीक वयोगटातल्या लोकांना रुचत नाही पण त्याने खरच आजच्या तरुण पिढीला वेड लावल आहे.त्याची पुस्तके वाचणे हे आजच्या तरुण पिढीचे एक स्टाईल स्टेट्मेंट बनते आहे.  ओर्कुटमधील चेतन भगत या कम्युनिटीत तब्बल ९४४०० सभासद आहेत यावरुनच त्याच्य लोकप्रियतेचा अंदाज येतो.

हरी, आलोक आणि रायन यांच्या आयआयटीतल धमाल जीवन ’फ़ाईव पोईंट समवन’ मध्ये चेतनने रेखाटल आहे.पुस्तक वाचता वाचता आपण त्यांच्या विश्वात पुर्णत: रमुन जातो.पुस्तकाची सुरवात १३ फ़्रेक्चर झालेल्या रक्ताने माखलेल्या अलोकला एम्बुलंस मधुन होस्पीटल मध्ये घेउन जाणारया प्रसंगाने होते.तेथुन मग हे पुस्तक कोलेजमधिल रेगींग,गमतीजमती,प्राचार्यांची मुलगी नेहा आणि हरीच प्रेमप्रकरण,त्यांचा रोमांस,पेपर चोरी करण्याचा प्रसंग अस उत्तरोत्तर अधिकच रंगत जाते.शेवटी एक धमाल मनोरंजक पुस्तक वाचल्याचा अनुभव आपल्याला येतो. याच पुस्तकावर आधारित ’३ इडीयट्स’ हा चित्रपट सध्या खुप गाजतो आहे.हया चित्रपटाच्या कथेचा वाद सध्या चांगलाच चिघळला आहे..(’तारे जमीन पर’ च्या वेळीही कथानकावरुन आमिर व अमोल गुप्ते यांच्यात असाच वाद झाला होता). हीच ती चेतन भगत व विनोद चोप्रा फ़िल्म्स यांच्यात झालेली अॅग्रीमेंट.विधु विनोद चोप्रा यांनी ३ इडीयट्स फ़ाईव पोईंट समवन का नाही याची ३० कारणे त्यांच्या वेब साइट्वर दिली आहेत.

विधु विनोद चोप्रा,राजकुमार हिरानी आणि आमिर खान या त्रयींनी हा एक उत्कृष्ट चित्रपट बनवला आहे याबाबत काही वाद नाही.मलाही चित्रपट आवडला.पण पुस्तकातील फ़क्त २% ते ३% भागच चित्रपटात आहे असे ते जे म्हणतात ते पुस्तक वाचलेल्या वाचकाला पटण्यासाराखे नाही.कारण जरी  मुन्नाभाइचे कपडे घातलेले असले तरी ३Ϊ चा  आत्मा ५.+१ चाच आहे हे नाकारता येणार नाही.असे असले तरी पुस्तकाचे राइइटस विकले असल्याने आणि अॅग्रीमेंट मधील अटी चोप्रा कंपनीने पुर्ण केलेल्या असल्याने माझ्या मते तरी चेतनला हयाबाबत वाद घालायचा काही अधिकार नाही.या त्रयींचा ‘फाईव्ह पॉईंट समवन’ ला  परिसस्पर्श लाभला आहे हे त्याने स्विकारले पाहिजे कारण ’वन नाईट…’ च्या हेल्लो चे मोठ्या पडद्यावर काय झाले ते त्याने अनुभवल आहेच.आज चेतन भगत लोकांनी वाचला असल्याने हे आपल्याला कळल पण चित्रपट्सॄष्टीतील कितितरी मोठी नाव कोण्या अज्ञात कलाकाराच कौशल्य(कथा,संगीत,नॄत्य.वैगेरे) स्वत:च्या नावावर खपवतात ते आपल्याला माहितीही पडत नाही.त्यांच्याबददल विचार करुन खरच वाईट वाटते.

इथे तर कदाचित हा दोघांकडुन जाणूनबुजुन केलेला पब्लिसीटी स्टंट असल्याचीही शक्यता आहे.कारण यामुळे दोघांचाही फ़ायदा होत आहे.सगळीकडे हा विषय चघळला जातो आहे जे या सिनेमाच्या पब्लिसीटीसाठी(गझनीच्या  पब्लिसीटीसाठी आमिर हातात कैची घेउन लोकांचे केस कापायला निघाला होता हे विसरु नका)  फ़ायदेशीर आहे.तसेच राजु आणि विधु विनोद चोप्रा दोघेही ओरडुन ओरडून आधी पुस्तक वाचा आणि मग बोला अस म्हणत आहेत.सर्फ़ एक्सेल्च्या जाहिरातीतील ’दाग अच्छे है ना’ सारख ’वाद अच्छे है ना’ अस तर म्हणत नाहित ना हे लोक 🙂 . असो खरे त्या देवालाच माहित पण एक गोष्ट मात्र पक्की  रसिक या दोन्ही कलाकॄत्या नक्किच एन्जोय करतील.सिनेमा बराच अमिरकेंद्रीत केल्यामुळे वास्तवापासुन थोडा दुर जातो.(पुस्तकातील रायनचे गुणही हरीलाच दिले आहेत)आल इज़ वेल छान असल तरी पॅंट उतरवुन ’जहापनाह तुस्सी ग्रेट हो’ म्हणणॆ किळसवाण वाटते.चतुरचा ’चम्तकार’ दाखवतांना सहकुटंब आलेल्या प्रेक्षकांचा विचार त्यांनी केलेला नाही.शिवाय मोनाची व्यक्तिरेखा अनावश्यक तर तिचा बाळंतपणाचा प्रसंग मला तरी अगदी रटाळ वाटला.इतर सर्व बाबतीत अव्वल नंबर. जोय लोबो ची आत्महत्या हादरवणारी आहे.बाकी आल इज वेल…

‘फाईव्ह पॉईंट समवन’ च्या पदार्पणाच्या पुढच्याच वर्षी चेतनच ‘वन नाईट अॅट द कॉल सेंटर’ आल.केवळ पहिल्या तीन दिवसात ५० हज़ार प्रती विकल्या जाण्याचा भिमपराक्रम या कादंबरीने केला.यात चेतनने कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या सहा जणांचं(ईशा, प्रियांका, राधिका, मिलिटरी अंकल, वरुण आणि श्याम) आयुष्य आपल्या समोर मांडल.पुर्ण पुस्तक ही कॉल सेंटरमधील एका रात्रीची गोष्ट आहे.पण ही त्यांच्यासाठी साधी रात्र निश्चित्च नसते.त्या रात्री ते काय काय ट्वीस्ट अनुभवतात ते पुस्तकात मस्त लिहले आहे.यावर हेल्लो हा सिनेमाही येउन गेला.तो जास्त चालला नाही पण हया पुस्तकाची लोकप्रियता मात्र कमी झाली नाही.त्यानंतर आलेल ’थ्री मिस्टेक्स ओफ़ माय लाईफ़’ हे जरी मी आवडीने वाचल असल तरी नंतर खुपच फ़िल्मी वाटते हे पुस्तक.हया पुस्तकात अहमदाबाद मधील तीन उद्योग करण्यासाठी उत्सुक असलेल्या तीन मित्रांची(गोविंद,इशान आणि ओमी) कहाणी आहे.पण यात क्रिकेट-ओस्ट्रेलिया,गोध्रा हत्याकांड,हिंदु मुस्लिम वाद,गोविंदचे इशानच्या बहिणीबरोबर प्रेमप्रकरण,बरीच हाणामारी,कुर्बानी असा बराच मसाला ठासुन भरला आहे.

’टु स्टेटस’ च्या प्रकाशनाच्या वेळी आपल्या अर्धांगीनीसोबत...

‘थ्री मिस्टेक्स ओफ़ माय लाईफ़’ हया पुस्तकाचे हक्क फ़रहान अख्तरने विकत घेतले असुन तो हया पुस्तकावर लवकरच चित्रपट बनवणार आहे.(आणखी एक नवे वाद-प्रकरण..?)बघुया गुणी फ़रहान कितपत न्याय देतो हया पुस्तकाला.याच वर्षी आलेल्या त्याच ‘टू स्टेट्स -स्टोरी ओफ़ माय मैरेज’   त्याच्या स्वत:च्या लग्नाच्या घटनेवर आधारित असल तरी  खरं तर हा विषय हिंदी सिनेमात उसाच्या चरक्यातुन काढलेला असा आहे.पण तरीही चेतनच्या हाताळणीमुळे पुस्तक वाचायला छान वाटत.पुस्तकाच्या मागील कव्हरवर त्याने पुस्तकाचा सांराश दिला आहे. मुलगा-मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात.मग मुलीच्या कुटुंबाला मुलगा आवडावा लागतो.मग मुलाच्या कुटुंबाला मुलगी आवडावी लागते.मग मुलिच्या कुटुंबाला मुलाच कुटुंब आवडाव लागत.मग मुलाच्या कुटुंबाला मुलिचा कुटुंब आवडाव लागत.त्या दोघांत अजुनही प्रेम असते आणि ते लग्न करतात.या पुस्तकात पंजाबी क्रिश आणिमद्रासी अनन्या हयांच्या आंतरराज्यीय लग्नाची कथा मस्त गुंफ़ली आहे. अस असल तरी त्याने आता थोड वेगळ लिखाण कराव अस मला वाटते कारण त्याच्या लिखाणात आता थोडा तोचतोपणा येउ लागला आहे.पुढील पुस्तकासाठी त्याला शुभेच्छा…

[कोणी जर त्याची पुस्तक वाचली नसतील त्यांच्यासाठी आता तर त्याच्या पुस्तकाची मस्त बंपर ओफ़र आहे केवळ २८५ रुपयांत चारही पुस्तके विकत मिळतात.म्हणजे त्याच एक पुस्तक विनामुल्य मिळते.बघा तुम्हाला चेतनच्या दुनियेत रमायला कितपत आवडते ते.  ]

Advertisements

21 thoughts on “5.+1 ते 3Ϊ

 1. मस्त लिहलायेस रे लेख…. मी चेतन भगत चे, ONe Night @call center, आणि 3 mistakes वाचलेत, नेमका 5.+1 नाही वाचलेले पण 3 Idiots नुकताच पाहिला…त्यामुळे तुझे सगळे मुद्दे पटत होते…चेतनने त्याच्या ब्लॉगवर त्याची मत मांडली आहेत पण मला वाटत हा प्रसिद्धीचा मंत्र आहे या लोकांचा…..

  • तन्वीताई,सर्वप्रथम प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद …
   वाच लवकरच ५.+१ ,माझ चेतनच तेच पुस्तक सर्वात जास्त आवडत आहे.टु स्टेटस पण छान आहे हलकफ़ुलक एकदा वाचायला हरकत नाही.
   त्याची ब्लॉगवरची मते वाचली.पण हे पक्के प्रोफ़ेशनल(3 Idiots चे युनिटसुदधा) लोक आहेत.प्रसिदधीसाठी कुठल्या थराला
   जातील हयाचा काही नेम नाही.बाकी आल इज वेल…

 2. चेतन भगतचं वन नाईट वाचलं होतं, पण मला अगदी बोअर झालं होतं. आता रिव्ह्यु वाचल्यावर हे पुस्तक नक्की वाचीन.

 3. अगदी सुंदर मांडलय चारही पुस्तकांबद्दल. मी पहिली तीनही वाचली आहेत आणि सध्या “2 states” वाचतोय. माझं प्रामाणिक मत म्हणजे पहिली ३ पुस्तकं उतरत्या भाजणीत आहेत. 5.S अप्रतिम आहे. मी ते कमीत कमी ४ वेळा वाचलं आहे. पण “one night at call center” आणि “3 mistakes of my life” मला मुळीच आवडली नाहीत. तुम्ही म्हणता ते खरं आहे. त्याच्या लिखाणात थोडा तोच तोच पणा यायला लागला आहे. पण मला अजूनही भावतो तो 5.S लिहिणारा भगत आणि त्यासाठीच त्याच्या पुढील लिखाणासाठी शुभेच्छा !!!

  आणि हो चारही नायकांची नावे कृष्णाची आहेत आणि चारही पुस्तकांच्या नावात अंक आहे हे तपशील लक्षात नव्हते आले. ते सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • हेरंबजी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…
   पहिली ३ पुस्तकं उतरत्या भाजणीत आहेत या आपल्या मताशी सहमत आहे मी.पण “2 states” हे “one night at call center” आणि “3 mistakes of my life” पेक्षा
   चांगले वाटले मला.म्हणजे आलेख परत थोडासा वरती गेला आहे.बाकी मी पण ५.+१ मुळेच तर त्याचा पंखा झालो …

 4. फार छान लिहलय, मी सगळीच पुस्तक वाचली आहेत चेतनची आता नवीन आलेला २ स्टेट्स पण वाचेन लवकरच. थॅंक्स फॉर द रिव्ह्यु..

 5. मस्त लिहिलय.
  मी सुद्धा चेतन ची चारही पुस्तकं वाचली आहेत. ‘फाइव पॉइण्ट’ वाचल्यावर मी पण त्याचा पंखा व्हायच्या मार्गावर होतो…..पण वन नाइट आणि ३एम मुळे विचार बदलला माझा. २स्टेट्स बरं आहे पण ते सहि सहि ‘फाइव’ चं सीक्वल असल्यागत वाटतं. कदाचित ‘फाइव’ शी तुलना केल्यामुळे किंवा चेतन कडून खूप चांगली अपेक्षा केल्यामुळे त्याची नंतरची पुस्तकं आवडली नसावीत.
  पण तुझा (एकेरी चालेल ना?) लेख चांगला आहे. अप२डेट संदर्भ मस्त वाटतात.
  अंकांची भानगड माझ्यापण लक्षात आली होती. मला वाटलं काही न्यूमरॉलजी आहे. (हेल्लोचं अपयश आणि “३” ईडियट्स च्या यशानंतर तर असा (गैर)समज दृढ झाला होता) आणि लेखात ‘कृष्णा’बद्दल लिहिलय ते आधी कळलं नव्हत. आता कळलं. हरी, श्याम, गोविंद आणि क्रिश…… मस्तय !!!

  • क्षितीज, दवबिंदुवर स्वागत आणि अभिप्रायाबद्दल आभार…
   २ स्टेट्स ‘फाइव’ चं सीक्वलच आहे.. वर नमुद केल्याप्रमाणेच त्याची पुस्तक एकदम दर्जेदार नसली तरी सहज,वास्तववादी,मनोरंजक आणिआपल्या आयुष्यातील घटनांशी संबध जोडायला लावणारी अशी आहेत…३एम मलाही आवडल नाही तितक..मला तु बोललेल अगदि धावेल…नाव आणि आकड्यांबद्दल वाचता वाचता लक्षात आल…

 6. आणि हो, मराठी पुस्तकांसमोर मात्र ‘फाइव’ सुद्धा फिकं पडतं. सु.शिं च्या दुनियादारी किंवा बोकीलांच्या शाळा समोर ‘फाइव’ चा टिकाव लागत नाही.

 7. पिंगबॅक 2010 in review « दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.