फ़ॉर माय आइज़ ऑन्ली…


१ डिसेंबरला ’दुरावा’ हि पोस्ट टाकुन तुमच्यापासुन दुर झालो होतो.त्यानंतर ४ जानेवरीला  5.+1 ते 3Ϊ मधुन परतलो या जगात. तेव्हा महेंद्रजी,तन्वीताई यांनी कुठे होतास इतके दिवस म्हणुन विचारल.मग ठरवल एक पोस्ट टाकुन सविस्तर लिहु यावर.(एक पोस्टही वाढेल माझी 🙂 ) तशी ब्लॉग वर न लिहिण्याची कारणं महेंद्रजीनी सांगीतली होतीच.त्यापैकी एक देता आल असत,पण माझ थोडस वेगळ कारण असल्यानेच ही पोस्ट लिहायला घेतली.

तर ३ डिसेंबरची सकाळ होती  नेहमीप्रमाणेच संगणकासमोर बसलेलो असतांना डोळ्यांना थोडा त्रास होत असल्याच जाणवल.(अजुन तरी चष्मा लागलेला नाही मला) मग लगेचच स्वत:लाच प्रश्न विचारला “का बर होत असेल अस..? काय रे बाबा तुझा कोणता अवयव सर्वात जास्त काम करतो सांग बर…?  डोक्यात विचार आला अरे हाच अवयवावर तर मी जास्तीत जास्त कामाचा भार देत असतो.  डोक(आहे हो थोड्फ़ार 🙂 ) कान,हात, पाय,  हया सर्वांपेक्षा हाच अवयव आहे माझा जो अविरत काम करत असतो.कारण जास्तीत जास्त वेळ डोळे फ़ाडुन मी संगणकासमोरच असतो.(यासंदर्भात घरी तशीही नेहमी बोलणी खात असतोच)संगणकापासुन थोड दुर झालो की हेच डोळे कोणत्या तरी पुस्तकात खुपसतो.तिथल आपल कार्य संपल कि मनाच्या विरंगुळ्यासाठी हे इडियट बॉक्सकडॆ वळतात. कामावरही प्रचालन(operation) विभागात असल्याने नेहमी पॅनलवरील वेगवेगळे सिस्टम डेटा मॉनीटर करावे लागतात ते हया डोळ्यानीच. मग ठरवल यासाठी  काहितरी पाउल उचलायला हवीत म्हणुन.

तातडीने शरीरातील सर्व विभागीय अधिकारयांची  इजीएम(इमर्जन्सी जनरल मीटींग) बोलावली. अध्यक्षपदी श्री.मेंदु.बिनडोके होते तसेच नियंत्रण आणि शुदधीकरण विभागाचे श्री. स.दा. स्पंदने, दॄष्टी विभागाच्या कु. नयना बोलके,जनसंपर्क अधिकारी व खास प्रवक्ते श्री.वदन बड्बडॆ, श्रवण विभागातील श्री. का.न.उघडॆ ,श्वास व गंध विभागाचे श्री. वासु नाकपुरकर,प्रोसेस विभागातील श्री. हा.त. काहितरीकर,वाहतुक व दळणवळण विभागाचे श्री. पा.य.धावते ,कॅंटीनमधील  सौ. रुचिरा जिभे व श्री.दात्ता चावरे असे सगळेच जातीने हजर  होते. श्री. बिनडोके यांच्या परवानगीने कु. नयना बोलके यांनी आपली बाजु मांडायला सुरुवात केली.सर्वप्रथम त्यांनी मी वर उलैख केलेले चार मुददे (संगणक,पुस्तक,टी.वी.,साइटवरील पॅनल्स) अगदी तपशिलवार मांडले.

त्या पुढे म्हणाल्या डोळ्यांच महत्व कळत नसेल तर  डोळ्यांना पट्टी बांधून खेळायची आंधळी-कोशिंबीर  आठवा त्यात काही क्षणांसाठी पट्टी डोळ्यांवर बांधली कि आपली काय परिस्थीती होते ती आठवा, अशी  आंधळी-कोशिंबीर आयुष्यभर खेळावी लागली तर… म्हणुनच जग पाहण्याची दृष्टी देणाऱ्या डोळ्यांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल ? तुमच्या मॄत्युनंतर तुमच्या शरीराबरोबर जळुन जाणारे हेच डोळॆ जर अश्या कोण्या आयुष्यभर आंधळी-कोशिंबीर खेळणारयाला मिळाले तर त्याचे जिवनात कसे रंग भरले जातील याचा विचार करा असे म्हणत  त्यांनी नेत्रदानाचे सुदधा महत्व सर्वांना पट्वुन दिले. मग त्यांनी खाली दिले्ले इतर मुददेही सर्वांसमोर मांडले.

 • कधी कोणाच्या भेटीसाठी मन आतुर होते पण  वाट पाहातात ते डोळेच ..
 • सुखाचा क्षण असो वा दु:खाचा भरुन येतात ते हे डोळे…
 • लोक आपल्या डोक्याने वागतात पण बोलणी ऐकावी लागतात ती डोळ्यांना म्हणे ’आतातरी डोळे उघडा’….
 • कधी आपल्या नकळत पाणावतात तर कधी शब्दांच्या मर्यादा ओलांडुन  मनातल्या भावना आपोआप बोलुन जातात हे डोळे…
 • कधीच खोटे बोलत नाहीत ते डोळे…
 • जे आल्यावर किंवा गेल्यावर दु:खच होते ते डोळेच…
 • मुलींना पटवतांना मारले जातात ते हे डोळेच…
 • सुख,दु:ख,लाज,लबाडी,शालीनता,अधाशीपणा,वात्सल्य,प्रेम,राग,करुणा असे सगळेच भाव व्यक्त करतात ते डोळे…

सारेच जण हे ऐकुन अगदी भावुक झाले.कु. नयना यांचे विचार सर्वांनाच पटले. मग सर्वांच्या सहमतीने डोळ्यांना शक्य तितका आराम दयायचा असे ठरले.मग त्यासाठी सर्वात पहिल संगणकाचा वापर अगदी कमी करायचा अस ठरल.मग माझ्या मनाने सुदधा स्वत:ला आव्हान केल ऑरकुट,फ़ेसबूक,चॅटींग यांच वेड तर केव्हाच गेल आहे तेव्हा आता ब्लॉगींग बंद करुन बघायच जेणेकरुन  संगणकासमोर जास्त वेळ बसाव लागणार नाही.तेव्हा श्री. स्पंदने का माहित नाही पण किंचीत हसल्यासारखे वाटले.

तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी हे करा: दिवसभरात चार-पाच मिनिटं डोळ्यांवर तळहाताची पोकळी धरून शांतपणे बसावं. याला पामिंग म्हणतात. यामुळे डोळ्यांवरचा ताण कमी होतो. तासन्‌तास लेखन, वाचन आणि “समीप’ दर्शनामुळे भिंगाचे (लेन्सचे) स्नायू थकतात. दूर अंतरावरचं पाहताना ते शिथिल (रिलॅक्‍स) असतात, त्यांना विश्रांती मिळते. यासाठी अभ्यासाच्या खोलीला खिडकी हवी आणि मधूनमधून लांबच्या इमारती, दूरवर आकाशाकडे पाहायला हवं.अधिक माहीतीसाठी खालील संकेतस्थळांना जरुर भेट द्या.खुपच माहितिपुर्ण आहेत हि संकेतस्थळ.

http://www.enetrajyoti.com/marathi/m_index.htm

http://abstractindia.blogspot.com/2008/04/blog-post.html

खर सांगतो १४ डिसेंबर पर्यंत तर काहिच वाटले नाही कारण ओळखीची इतकी लग्न होती कि यादरम्यान कित्येक दिवस मला घरी जेवावच लागल नाही.याकाळात मध्येत ’काय वाटेल ते’ ला एक धावती भेट दिली होती.पण १४ तारखेनंतर मनावर नियंत्रण करण कठीण होवु लागल.मग ठरवल या वेड्याला आता कुठेतरी दुसरीकडे वळवायला हव.मग मी गिटार शिकायच ठरवल (जे माझ एक अपुर स्वप्न आहे.)लहानपणापासुनच गिटारबददल एक अनामिक आकर्षण आहे मला.मग त्यासाठी गिटार शिकवणारा शोधु लागलो पण आमच्या  भागात(बोईसर-पालघर) एकही  गिटार शिकवणारा मिळाला नाही.मग माझा एक मित्र नितेश मेहता जो  थोडॆफ़ार गिटार वाजवतो त्याच्याकडुनच गिटारचे धडे घ्यायला सुरुवात केली.

लय अवघड वाटला हो हा प्रकार पहिला सगळ्या स्केल शिका,त्यांचा पुर्ण सराव करा.गाण्याच्या कोर्ड्स लक्षात ठेवा.अजुन तरी सा रे ग म प ध नि सा,ट्विंकल  ट्विंकल,हॅप्पी बर्थडॆ टु यु यापुढे मजल गेली नाही माझी.लवकरच वेळ काढुन बाहेर कुठेतरी गिटार क्लास लावयचा विचार आहे.बघुया कितपत जमते ते.मनात ब्लॉगजगताची ओढ होतीच पण हया गिटारप्रेमामुळे दिवस जात होते.अशातच नविन वर्ष उजाडल आणि ब्लॉगवरील मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो.मग एकेक ब्लॉग वाचता वाचता जाणवल या सगळ्यांपासुन जास्त वेळ दुर राहु शकता येणार नाही आणि वाटल  इथुन आता परत  जाउच नये. तितक्यात  श्री.मेंदु. बिनडोके आणि श्री.स्पंदने यांची कोणत्या तरी विषयावर बैठक चालु असलेली दिसली.आणि थोड्याच वेळात ऑर्डर आली कि डोळ्यांची काळजी घेत वाचत रहा,खरडत रहा.आता मला कळल  श्री.स्पंदने   तेव्हा का हसले होते ते….. (दिल है के मानता नही)

सारांश: हा दवबिंदु असाच तुम्हाला त्रास देत राहणार...

Advertisements

36 thoughts on “फ़ॉर माय आइज़ ऑन्ली…

 1. वा वा देवेंद्र.. एकदमच “डोळे भरून वाचावं” असं पोस्ट झालंय हे. आणि शरीरातील सर्व विभागीय अधिकारयांची नावं तर जबरीच !!

 2. एकदम कल्पक पोस्ट आहे…आणि अगदी बरोबर आहे डोळ्यांची काळजी घेणं फ़ारच महत्वाचं आहे…त्यासाठी थोडा दुरावा आला तरी चालेल…

 3. मस्त माहीतीपुर्ण झाला आहे लेख. पुन्हा लेखन चालु केल्याबद्दल अभिनंदन

 4. मस्त झालाय लेख…..नावं मस्त एकदम….
  तुच नव्हे तर सगळ्यांनी डोळ्यांची काळ्जी ग्यायला हवीये….(हे सगळे म्हणजे मी!!!! कधीही चष्मा न लावणे हा दुर्गूण मी गेले अनेक वर्ष बाळगुन आहे…)

  • वरच्या कमेंट मधे ’काळजी घ्यायला’ लिहायचेय बरं का मला नाही तर या अशुद्ध लेखनासाठी अपर्णाताई फटकायच्या मला…..तेव्हा तो दोष माझा नसून माझ्या की बोर्डाचा आहे….

  • ज्यापदधतीने आजची पिढी संगणकाला चिटकुन असते ते पाहता डोळ्यांची काळजी घेणे खरच गरजेच आहे.
   बाकी तो दुर्गुण असाच अबाधीत राहु दे.
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…

 5. डोळ्यांची काळजी घ्या, कमी पोस्ट्स चालतील पण कायमचा ब्लॉग बंद नको…
  शरीरातील अधिकार्यांची नावे खुपच मस्त!

  • आपल्या सदीच्छेप्रमाणेच आमच्या श्री.बिनडोक्यांची ऑर्डर ही आहे.
   त्यामुळे नक्कीच काळजी घेइन.
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…

 6. मित्रा, खुश केलस. मस्त जमलीय पोस्ट आणि इमर्जन्सी जनरल मीटींग वाह वाह सिंप्ली ग्रेट. असाच लिहत राहा 🙂

  • तसाही मला लिहायचा काही जास्त अनुभव नाही.काही चारोळ्यांची पुण्याई घेउन ऑरकुटवर नांदत होतो.तेथुन महेंद्रजीनी या जगात आणले.मग इथे ब्लॉग्स वाचता वाचता वाटल आपणही लिहु काहितरी म्हणून हा ब्लॉग सुरु केला.आणी पांढरयावर काळ करु लागलो.हिटस हि बरयाच मिळत होत्या पण लोकांच्या प्रतिक्रिया जास्त येत न्वहत्या.पण हया पोस्ट्ला मिळालेल्या प्रतिक्रिया (या ब्लॉग्वरील आतापर्यंत सर्वाधिक) पाहुन तुमच्या बोलण्यात काहितरी तथ्य आहे अस वाटते.बघु यापुढे कितपत जमत ते…असो तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…

 7. देव मस्त जमलंय! ते नाक्पुरकर बोलके छान नाव दिली आहेत. आणि हो डोळ्याची काळजी घ्यायलाच हवी!

 8. yaar kaa lihitos tu he….kharach mast watla he wachun….charolya tar me dekhil karto pan he asa mala jamel asa mala watat nahi. jara malahi hints de na blog kasa lihayacha te..
  rohit

  • जे मनाला वाटेल ते लिहत राहयच ब्लॉगवर एकदा लिहायला लागल कि आपोआप सुचत जाते.कर लव्करच सुरु तुझा ब्लॉग.मदतीसाठी मी आहेच.आणि हो तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…

 9. हे पोस्ट वाचायच्चं सुटलं होतं. तुमच्या परवाच्या कॉमेंटला लिंक दिलीत म्हणुन बरं झालं. कालच घरी परत आलो आणि शांतपणे सगळे सुटलेले पोस्ट्स वाचुन काढले.. मस्त झाले आहे हे पोस्ट.. आंधळी कोशिंबीर वाचलं अन जुने दिवस आठवले..

 10. पिंगबॅक ऑंखोंकी गुस्ताखिया माफ़ हो… « दवबिंदू

 11. पिंगबॅक जाणीव… « दवबिंदु

 12. अप्रतिम… नावं तर जबराट….मलाही माझ्या डोळ्यांची काळ्जी घ्यावीशी वाटायला लागली…तूही तूझ्या डोळ्यांची काळ्जी घे…

टिप्पण्या बंद आहेत.