गाडी बुला रही है….


आज सकाळी वर्तमानपत्र वाचत असतांना  (रोजच्या अश्या झालेल्या मुलांच्या आत्महत्येच्या बातम्या आजही आहेतच ) दोन बातम्यांनी माझे लक्ष विशेष वेधुन घेतले.दोन्ही बातम्या वाहतुक व दळण वळण क्षेत्राशी  निगडीत आहेत.मुख्य म्हणजे दोन्हीही बातम्या चांगल्या आहेत प्रवाश्यांसाठी म्हणुनच इथे तुमच्याशी शेअर कराव्याश्या वाटल्या.

झाल गावच्या बसच आरक्षण...

एसटीच्या प्रवाशांनाही घरबसल्या किंवा एजंटच्या कार्यालयात जाऊन एअरलाईन्सच्या तिकिटाप्रमाणे ई-तिकीट आरक्षित करता येईल.ई-तिकीटची सुविधा सुरू करून एसटी महामंडळाने ’हम भी किसिसे कम नही’ हे दाखवुन दिले आहे.यासाठी तीस दिवस आधी व गाडी सुटण्याच्या तासभर आधीही बुकिंग करता येईल.इतकच नाही राज्यातील  २६ आगारांत “इलेक्‍ट्रॉनिक तिकीट इश्‍यू मशीन’ प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आल्या होत्या. ही योजना यशस्वी झाल्याने राज्यभरात ही योजना लागू करण्याचा निर्णयही      राज्यशासनाने घेतला  आहे. त्यामुळे लवकरच कागदी तिकिटे कालबाह्य होणार आहेत. हया हायटेक सुविधेचा वापर करण्यासाठी इथे भेट द्या. एस.टी. चा चेहरा मोहरा खरोखरच बदलत आहे आता आणि हे पाहुन मला खरच बरे वाटते आहे कारण एस.टी. ही सर्वसामान्यांसाठी नक्कीच एक जिव्हाळ्याचा विषय आहे.

आपली एसटी

ड्रायव्हिंग लायसन्स काढल असेलच.स्वत: सगळ करायला गेल कि ते मिळविण्यासाठी परिवहन कार्यालयात बरेच खेटे मारावे लागतात.तेच जर एखाद्या दलालामार्फ़त ड्रायव्हिंग लायसन्स काढायला गेला तर दोन फ़ेरयात काम होते.पण जास्त पैसे भरावे लागतात.आमच्या इथे सध्या दुचाकी साठी ७००-८०० रुपये भाव आहे.(खरी फ़ी जास्तीत जास्त २५० रुपये आहे) दुसरी बातमी आहे ती हिच की परिवहन कार्यालयातील दलालांच्या सुळसुळाटातून सर्वसामान्यांची सुटका करण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने ड्रायव्हिंग लायसन्स घरपोच देण्याची योजना आणली आहे.  कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स घरपोच होईल. तेही केवळ ५० रुपयांत.

ड्रायविंग सिम्युलेटर

त्याआधी लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठी आता परिवहन कार्यालयात जावून ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल. त्यामध्ये १५० प्रश्न विचारण्यात येतील. त्यात पास होणा-यांना अवघ्या दोन तासांत सहा महिन्याचे लर्निंग लायसन्स देण्यात येईल.यासाठी इथे भेट द्या.पावसात, धुक्यात तसेच रात्रीच्यावेळी हायवेवर कसे ड्रायव्हिंग करावे, याचे ट्रेनिंग चालकाला सिम्युलेटरच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.यासाठी मुंबईत १४ ठिकाणी सिम्युलेटर उभारण्याचा परिवहन विभागाचा प्रस्ताव आहे.ही सिम्युलेटरची टेनिंग पूर्ण झाल्याशिवाय ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही असेही प्रशासनाने म्हटले आहे.यामुळे निश्चितच अपघातांच प्रमाणही कमी होईल.कारण योग्य त्या व्यक्तीलाच ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल तेही शासनाच्या ट्रेनिंग नंतरच.खरच प्रशासनाने हे खुप चांगले निर्णय घेतले आहेत असे मला वाटते.मागे मी ट्राय ला जाग येत असल्याच लिहल होत.चला त्यापुढे आता अजुन एक खात (महाराष्ट्रातल) जाग होत आहे हे पाहुन खरच आनंद वाटत आहे.

सुहाना सफ़र और ये………….

Advertisements

14 thoughts on “गाडी बुला रही है….

  1. मस्तच रे. कोणीही कितीही हिणवू देत एस टी ला लाल डबा म्हणून.. पण आपली तर एकदम फेवरेट आहे.. आणि आता तर सोने पे सुहागा..

    • हो या ’लाल डबा ’ बद्द्ल माझ्या मनात पण का माहिती नाही पण बरीच आत्मियता आहे,म्हणुनच हि महिती इथे टाकावीशी वाटली.

  2. Both good news, but I am disappointed anyways. ST website is crap and I tried booking a ticket – but it doesn’t work at all.
    Online test for driving license is a joke since everyone gets the same questions and the answers are prompted to all participants lound and clear by the pimps

    • सिम्युलेटरच्या ट्रेनिंग्बद्दल काही माहिती आहे का आपल्याकडॆ, मी तरी अजुन वापरल्या नाहीत या सुविधा त्यामुळे नक्की त्या कश्या काम करतात त्याबद्दल मला महिती नाही.पण हया दोन्ही सेवेंची ऑफ़िशीयल अनाउंसमेंट कालच झाली आहे.(मुख्यमंत्र्यानी स्वत: काल ई-टिकीट आरक्षीत करुन उदघाटन केले या सेवेचे)मला वाटते हे सुरळीत चालु व्हायला थोडा वेळ लागेल.आपण तशी आशा करुया.

  3. बाईकने ट्रेक्स सुरू करायच्या आधी ST ने जाम भटकलो आहे. आता ST ने जाणे बंद आहे तसे. पण माहिती उत्तम. ती दूसरी माहिती बेस्टच आहे… ड्रायव्हिंग रूल्स सुधारतील अशी अपेक्षा बाळगुया…

  4. अरे वा! निर्णय स्वागतार्ह आहेतच. हेरंबशी सहमत. मी तर नेहमीच ’ लाल डबा-एशियाड ’ ने प्रवास करते. या सुविधेचा वापर करून पाहायला हवा. देवेंद्र धन्यवाद रे, माझ्या नजरेत नाहितर ही इतकी उपयुक्त माहिती लवकर आलीच नसती.

टिप्पण्या बंद आहेत.