‘बुर्ज खलिफा’


‘बुर्ज खलिफा’ नाम तो सुनाही होगा…हो तीच ती विक्रमी अशी जगातली सर्वात उंच  इमारत.(पुर्वीच नाव ’बुर्ज दुबई’) ८२८ मी. उंची असलेली हि इमारत थेट आकाशाला भिडणारी अशीच आहे.’बुर्ज खलिफा’ला ऐकुण १६२ मजले असुन प्रतिसेकंद १० मीटर वेगाने जाणार्‍या एकूण ५७ लिफ्ट यात आहेत.या ४ जानेवारीला खरया अर्थाने ’गगनचुंबी’ असलेल्या या इमारतीचे उदघाटन झाले.या इमारतीच्या छायाचित्रांचा एक मेल आला आहे तो इथे शेअर करतो आहे.या छायाचित्रांमध्ये ‘बुर्ज खलिफा’ बददल बरीच माहीतीही आहे.जगातील सर्वात उंच अश्या २० इमारतींची माहितीसाठी इथे भेट दया. हि छायाचित्र पाहुन  श्रीपादकृष्ण कोल्हटकर यांच्या ’आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे’  या पंक्ती  आपोआपच माझ्या ओठावर आल्या होत्या.बाकी सहजच वर लवकरच यासंदर्भात एक जिंवत पोस्ट येइल अशी अपेक्षा मला आहे .सध्यातरी हया  छायाचित्रांचा आस्वाद घ्या.

उदघाटन सोहळ्याचा हा विडीयो ही खरच पाहाण्यासारखा आहे.

Advertisements

14 thoughts on “‘बुर्ज खलिफा’

 1. एकदम वरच्या मजल्यावरुन काढलेला इमारतीची सावली दिसणारा फोटो अतिशय मस्त आहे, तिथुन पहायला मजा आली असेल….

 2. आयला. ८२८ मीटर सरळ चालताना पण दम लागतो आम्हाला. आणि यांनी तर ते सरळ उभं बांधून टाकलं. कमाल आहे बाबा 🙂

  • कमाल तर आहेच… 🙂 उभ बांधल असल तरी तश्याच वेगवान लिफ़्ट्स पण दिल्या आहेत तिथे…
   बाकी ‘बुर्ज खलिफा ’ बांधणारया कामगारात ४० % कामगार भारतीय होते….

 3. एप्रिल मध्ये जाणार आहे बहुदा.. बघुया.. सर्वात उंच मजल्यावर टूरिस्ट लोकांना जायला ओपन केला आहे का?

 4. देवेंद्र अरे जेव्हा आम्ही तिथे या टॉवर जवळ होतो ना गौरीने(माझी लेक) उंच आकाशात (तिला झेपेल तेव्हढे) पाहून म्हटले होते ,”अरे नानीने इथे घर कधी बांधले?????”
  हसुन हसुन पुरेवाट झाली होती सगळ्यांची, माझा नवरा म्हणे “हे आजीवरच्या प्रेमाचे जगातले सर्वात उंच प्रतीक आहे………….”

  बाकी माहिती मस्त दिलीयेस…………सगळ्यात वरचे टोक पहायचे तर मान पार वाकडी होते रे बाबा….

 5. जेवढी याची उंची आहे तेवढा वेळ मी ब्लोग वर गैर हजर राहिलो
  असा वाटल कि सगळे विसरले तर आपल्याला… आधीच एकटे त्यात दुकटे ही कुणी राहिले नसते
  भीती होती… पण तुम्ही सगळे माझ्या ब्लोग ला फेरी मारून गेले असाल अशी खात्रीही होती.
  पण म्हणतात न…
  अंधार झाल्यावर आठवते रामरक्षा
  असो…
  माहिती खूपच सुंदर आहे…
  बाकी तू कसा आहेस?

  • मी अगदी मजेत.मी गेला महिनाभर न्वहतोच या जगात (ब्लॉगींगच्या) कारणासाठी इथे भेट दे.
   खरच तुझ्या ब्लॉगला भेट दिलीच नाही यार परत आल्यापासुन …त्यासाठी तु माफ़ करशील अशी आशा आहे….असो असाच लिहत रहा आणी हो मकरसंक्रांतीच्या हर्दिक शुभेच्छा…तिळ्गुळ (वर्च्युअल) घ्या गोड गोड बोला………

टिप्पण्या बंद आहेत.