ऑंखोंकी गुस्ताखिया माफ़ हो…


आमच्या कु नयना बोलके ना ओळखता ना…काय म्हणता नाही आठवत…अहो त्याच त्या   कु नयना बोलके ज्यांचा मी ’फ़ॉर माय आइज़ ऑन्ली…’ ही पोस्ट टाकुन मागच्या वेळी उद्धार केला होता.ज्यांच्यासाठी एक महिना कडक उपवास केला(ब्लॉगींगचा 🙂 ). त्यानींच आम्हाला असा दिवस दाखवावा.म्हणतात ना नेकी कर और दर्या मे डाल 🙂 .

त्याच झाल अस परवा माझी फ़र्स्ट शिफ़्ट (७.०० ते १५.००) होती.फ़र्स्ट शिफ़्ट असली कि मी ०५:३० चा गजर लावतो,आणि मग तो वाजल्यावर स्नुज़ करुन ०५:५० पर्यंत १० मिनटाच्या दोन डुलक्या घेतो.खर सांगतो हया दोन डुलक्या मला खुप प्रिय आहेत.त्याच सकाळी  मला फ़्रेश करतात.नाहितरी आमच्यात असा डायरेक्ट निद्रादेवींचा अपमान करण्याची हिम्मत नाही.म्हणुनच तर फ़र्स्ट शिफ़्ट असली कि नेहमी हया दोन डुलक्यांनी हळूवार ओवाळुन  (आस्वाद घेउन) आम्ही निद्रादेवींचा गोड निरोप घेतो.पहाटेच्या झोपेला साखरझोप म्हणतात ते नुसतेच नाही.पवार महाशयांच्या कॄपेमुळे साखरेशी संबधीत तत्सम गोष्टी सर्वसामान्यांच्या आवक्याच्या बाहेर होत असतांना हि साखर असलेली एकच गोष्ट आहे जिचा आस्वाद गोरगरीब आजही घेउ शकतात.

तर काल नेहमीप्रमाणे ०५:३० चा गजर लावला होता .पण अचानक मध्येच निद्रादेवी भंग पावली.जड पापण्या उघडुन मोबाईलमध्ये वेळ बघितली तर ०६:१० झाले होते.बहुतेक मी उठुन गजर स्नुज करण्याएवजी बंद केला होता नक्की आठवत नाही पण हया धक्क्याने धाडकन उठलो आणि धावतपळतच प्रात:विधि उरकल्या.झटपट आंघोळ  करुन धावतच  बस पकडली(खरच आंघोळ केली, तुम्ही काही शंका घेउ नये म्हणुन हे स्पष्टीकरण 🙂 ). तेव्हाच माझ्या मनात विचार आला आजचा दिवस काहितरी वेगळा आहे.

नेहमी प्रमाणे सकाळचा आपला फ़िल्ड राउन्ड आटपुन आपल्या केबिन मध्ये बसलो होतो. सुमारे ०८:१० ला एका सहकारयाचा फोन आला थोडस बोलण झाल्यावर त्याला म्हंटल चल १०-१५ मिनटात येतोच कॅटीनला बोलु तिथे.फोन ठेवला आणि घड्याळाकडॆ लक्ष देत होतो आणि ती १०-१५ मिनट जातच न्वहती लवकर.मग अचानक काय झाल माहित नाही.अचानक पापण्या जड होवु लागल्या.तशीही कधी कधी खुप आळवणी करुन सुद्धा प्रकट न होणारी हि निद्राराणी आज सकाळपासुन आमच्यावर विशेष प्रसन्न होती.मग काय  हळुहळु मला शरीर हलके वाटायला लागले.डोळ्यांच्या पापण्या हजारो टन वजनाच्या ओझ्याने अलगद मिटल्या गेल्या.इहलोकाला विसरुन मी हळुहळु निद्राराणीच्या काळोखी साम्राज्यात विलीन होवु लागलो.

पण हाय रे दुर्दैवा तितक्यात अचानक केबिनचा दरवाजा उघडला गेल्याचा आवाज आला.त्या आवाजाने निद्राराणीने घाबरुन कुठे धुम ठोकली माहित नाही (कारण वर प्रतिमेत दिलेल्या स्लीप सायकलनुसार स्टेज -१ मध्येच होतो मी) पण मला दिवसाच तारे दिसायला लागले कारण आत आलेले गॄहस्थ हे आमचे मेंटेनन्स सुपरिटेंडट होते.जरी ते मध्ये आल्यावर मी जागा असलो तरी माझ नशीब तेव्हा अस खराब होत की ’कावळा फ़ांदीवर बसायला आणि फ़ांदी तुटायला एकच गा्ठ ’ अस काहिस झाल होत माझ्याबरोबर.कारण  केबिनला समोर एक मोठी काच आहे तिने घात केला होता  बाहेरुन त्यानी पाहिल तेव्हा माझे डोळे मिटलेले होते. अगर केबिन हमारा शिशे के बदले पत्थर का होता तो….

मग काय व्हायच ते झाल माझा उद्धार…सोने के लिये आते हो इधर…(इथे आम्ही ’सोन्यासाठी’ यायला हि काय सोन्याची खाण आहे 🙂 ) .धीस इज नॉट गुड प्रॅक्टीस…वैगेरे म्हणत मला झापुन काहितरी जिंकल्याच्या आविर्भावात ज्या संक्रांतीच्या दिवशी मराठ्यांच पानिपत झाल होत त्याच्या एक दिवस आधिच माझ पानिपत करुन ते निघुन गेले.याआधीही आमच्यातल्या काही लोकांना डुलक्या घेताना अस बघितल गेल आहे पण आपली गोष्टच वेगळी होती कारण आमच्या त्या अवताराच दर्शन घेतल होत ते   मेंटेनन्स सुपरिटेंडटनी (बडा है तो बेहतर है 😦 ) .माझ्या साडेसहा वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच कोण्या बड्या अधिकारयाने माझ तस दर्शन घेतल होत.(पहिल्यांदाच डुलकी घेत होतो अस म्हंटलेल नाही मी 🙂 )

काय झाल जर त्यांनी डोळ्यात तेल घालुन लावले असतील नवे शोध विज्ञानात,तसे आम्हीही तासाला डुलक्या घेउन नवे शोध लावले आहेत इतिहासात… 🙂

मी कॅंटीनमध्ये गेलो.नियमीत गप्पाटप्पा झाल्या तिथे.पण मी तिथे कोणालाही हि ब्रेकिंग न्युज कळु दिली नाही.आमच्या इथे एखाद्याचा एक पॉंईट मिळाला की अशी खेचतात ना कि विचारुच नका.दिवस हळुहळु पुढे सरकला आणि दुपारी ०२:३० ला केबिनमधला फ़ोन खणखणला.आमच्या सेक्शन हेड (श्री.मलय साहा म्हणुन एक बंगाली गॄहस्थ आहेत  हे) चा फ़ोन होता तो.त्यांनी झालेल्या प्रकाराची विचारणा केली.पण मला काही जास्त बोलले नाही ते.कारण त्यांना माहित आहे मी कसा काम करतो.शिवाय तेही आमच्याबरोबर शीफ़्टमध्येच काम करत असल्याने ते आमच्या भावना समजु शकतात.आपल्या शरीराला निसर्गाच्या विरुद्ध जाउन नेहमी वेगवेगळ्या शिफ़्टसमध्ये एड्जस्ट करण खरच खुप कठीण काम आहे.असो  त्यांच्या नजरेत माझी जी चांगली इमेज आहे  तिच्याच पुण्याईने तारल मला.मला थोड बर वाटत होत त्यांच्या समजुतदारपणाच्या बोलण्याने इतक्यात त्यांनी एक चांगली बातमी दिली मला कि आजच त्यांनी गेल्या महिन्यात मी केलेल्या एका महत्वाच्या कामाबद्दल ऍप्रीसीएशन लेटर फ़ॉरवर्ड केल आहे म्हणुन……असो इथेच संपवतो हे पोस्ट… हॅपीज एंडीग्ज….(बघुया पुढे वरुन काही दबाव आला तर ते एखाद वॉर्नींग लेटर देतीलही मला …सध्या तरी ’आल इज वेल ’ ….)

कार्यालयात झोपायची आयडिया-१

आयडिया-२

Advertisements

12 thoughts on “ऑंखोंकी गुस्ताखिया माफ़ हो…

 1. जबरी लिहिलयं… शिफ्ट प्रॉब्लेम समजु शकतो, ४ वर्षापुर्वी केल्या होत्या आता नाही…

 2. ऑल विल बी वेल यार…तुझी ही अवस्था मी पूर्णापणे समजू शकतो…तुझी जी फर्स्ट शिफ्ट आहे ती तरी बरी आहे यार. माझी शिफ्ट स्टार्ट्स @ ६:३०, किवा ८:३० किवा ११:३० (इन द नाइट) हे हे इमॅजिन आम्ही कसे झोपात किवा पेंगत असु 😀

  And loved those idea..great and creative 🙂

  • आमच्या पण तिन वेगवेगळ्या शिफ़्ट्स आहेत …०७:०० ते १५:००, १५:०० ते २३:०० आणी २३:०० ते ०७:००….
   त्यामुळे ते पेंगण मी सुदधा अनुभवतो.. प्रतिक्रियेबददल धन्यवाद…

 3. अर्रे एकदम मस्त झालंय पोस्ट आणि झोप म्हणजे आमच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे जास्तच आवडलं. माझी पण एकदा अशीच वाट लागली होती ऑफिस मध्ये. पण वाचलो 🙂 .. हे वाच. http://harkatnay.blogspot.com/2009/12/blog-post.html

  • वाचल ते पोस्ट एकदम फ़क्कड झाल आहे…निद्रादेवीचा विजय असो….
   (आपल्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देता येत नाहिये..खुप वेळा प्रयत्न करुन पाहिला…)

 4. ओह.. हो का? काय माहित काय झालंय. मी टेस्ट कमेंट टाकून बघितला. तो चालला. हे वर्डप्रेस आणि ब्लॉगर च्या compatibility चं लफडं आहे काहीतरी मला वाटतं. मागे पण इतर १-२ वर्डप्रेस युजर्सना कमेंट टाकायला प्रॉब्लेम येत होता. असो.

 5. तुम्ही तरी शिफ्ट आहे म्हणून डुलक्या काढता , अस्मादिकेनी तर कित्येकदा सकाळी ९ ला office ला जाऊन १० ला डुलकी काढायचे पराक्रम केलेत.. त्याचाच परिणाम आहे माझी डुलकी वरची पोस्ट… 🙂 बाकी लिहिलंय एकदम सुंदर…

  • दवबिंदुवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद….
   डुलकी हा तसाही आपल्यासारख्या अनेक लोकांचा जिव्हाळ्याचा विषय…

टिप्पण्या बंद आहेत.