एक अधुरी आणि खरी प्रेमकहाणी…


पुस्तकाच पहिल पान उघडल तिथे लिहल होत….

Not everyone in this world has the fate to cherish the fullest form of love.
some are born,just to experience the abbreviation of it.

म्हणजे जगात सगळ्यांनाच परिपुर्ण प्रेमाचा आनंद उपभोगण्याच नशिब लाभत नाही,तर काही लोकांचा जन्म फ़क्त प्रेमाच संक्षीप्त रुप अनुभवण्यासाठीच झालेला असतो.मग वाचायला घेतल हे प्रेमाच संक्षीप्त रुप.पुढच्या पानावर लेखकाने लिहल होत..हे पुस्तक त्या मुलीच्या प्रेमळ आठवणींना अर्पण जिच्यावर मी प्रेम केल पण लग्न करु शकलो नाही.पुढे शायरी होती.

तेरे जाने का असर कुछ ऐसा हुआ मुझपे
तुझे ढुंढते ढुंढते, मैने खुद को पा लिया…अनामिक

मग सरळ पुस्तक वाचायला सुरवात केली.अरे हो पुस्तकाच नाव राहिलच तर मी हे सगळ लिहतो आहे ते  रविंदर सिंग याच ’आय टु हॅड ए लव स्टोरी ’  पुस्तकाबद्दल जे मी कालच वाचुन काढले. आणि वाचल्यावर का माहित नाही पण खुप अस्वस्थ झालो.माझच कोणीतरी मला सोडुन गेल्यासारख वाटल होत मला काल.असो आताही थोडा एकटेपणा वाटतो आहे मन उदास झाल आहे नक्की काय ते खरच मला मांडता येत नाहिये इथे.खरतर काल हया पुस्तकाचा शेवट होता होता डोळ्यात पाणी आल होत माझ्या.( थोडा हळवा आहे मी) हया पुस्तकाचा इम्पॅक्ट आहेच तसा.

हया पुस्तकाचा लेखक रविंदर सिंग हा इन्फ़ोसिसमध्ये काम करणारा २६ वर्षाचा युवक आहे.तो काही नियमीत लेखक नाहिये त्याच आतापर्यंत तरी हे एकमेव पुस्तक. त्याने त्याच मन हलक करण्यासाठी लिहलेली  (आपल्या मनाला चटका लावुन जाणारी) त्याची प्रेमगाथा हया पुस्तकात त्याने मांडली आहे.त्यामुळेच पुस्तकाची भाषा सहज आणि सोपी आहे.पुस्तकाची सुरवात होते ती चार मित्रांच्या रियुनियन च्या प्रंसगाने.कामासाठी वेगळे झालेले कॉलेजातील हे मित्र एकत्र येतात जुन्या आठवणींना उजाळा देत देत ते लग्नाच्या मुददयावर येतात.कोणाच काही ठरल का ते एकमेकांना विचारतात.मग रविंदरचा एक मित्र त्याला शादी.कॉम बददल सांगतो.त्यानेही जाहिरात बघितलेली असतेच हया संकेतस्थळाची.मग हे माहाशय तिथे बरयाच जणींना रिकवेस्ट पाठवतात. हया संकेतस्थळावर  अस भटकतांना त्याला खुशी नावाची एक मुलगी भेटते.

पुढे एकमेकांची मोबाइल नंबरची देवाण घेवाण होते.त्यांच्यात बरयाच गोष्टी सारख्या असतात.(अगदी जन्मापासुन)आणिअस बोलता बोलता एकमेकांना न भेटताच ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.हळुहळु दोघे आपापल्या घरीही हयाबाबत कळवतात.दोघांच्या घरची संमती दे्खील मिळते.दिवसामागे दिवस जातात पण दोघांची प्रत्यक्ष भेट होत नाही,कारण तो असतो भुवनेश्वरला तर ती फ़रिदाबाद्ला.मग त्याला महिन्याभरासाठी कामानिमीत्त यु.एस. ला जायच असते.त्याची फ़्लाईट दिल्लीवरुन असते.मग त्यांच तिथे भेटायच ठरते.जसा फ़ोटो आहे तशीच असेल का वैगेरे हुरहुर  लागलेली असतांनाच त्यांची भेट होते.तो तिच्या घरी जातो.यु.एस. हुन परतल्यावर तिच्या घरचे रविंदरच्या घरी येतात.साखरपुड्याची तारीख निश्चित होते.खुशी इतकी खुश असते कि मला साखरपुड्याची तयारी करायची आहे म्हणत ति त्याच्याबरोबर फ़ोनवर नीट बोलत सुदधा नाही.साखरपुड्याची तारिख अगदी जवळ आलेली असतांनाच खुशीला एक अपघात होतो.उपचार चालु असतांना ४-५ दिवसांनंतर खुशी जगाचा निरोप घेते.रविंदरला एकटा सोडुन….

हा पुस्तकाचा सारांश असला तरी पुस्तकातील बरेच प्रसंग वाचण्यासारखे आहेत.अर्ध्यापेक्षा जास्त पुस्तक वाचतांना आपण हे पुस्तक का वाचतो ते कळत नाही.पण तेच शेवटी आपल्याला सुरुवातीला वाचलेल्या प्रसंगाची आठवण आल्याशिवाय राहात नाही.रविंदरच्या भावविश्वात आपण पुर्णत: गढुन जातो. नारायण मुर्ती यांनी हे पुस्तक वाचुन दिलेली प्रतिक्रिया खुप बोलकी आहे ते म्हणतात.. “Simple,honest and touching”

तर रविंदरच्या हया संक्षिप्त  प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी हे पुस्तक जरुर वाचा…

Advertisements

24 thoughts on “एक अधुरी आणि खरी प्रेमकहाणी…

 1. एरिक सेगलचं लव्ह स्टोरी वाचलंय कां?? माझं फेवरेट आहे ते. आणिसोबतच त्याचं क्लास ऑफ सिक्स्टी का काही तरी होतं, ते पण मस्त होतं..

  • एरिक सेगलच्या ’लव्ह स्टोरी’ बददल ऐकल आहे पण अजुन वाचल नाही…पण मागे एका मित्राने थोडक्यात सांगीतली होती त्याची कथा त्याची व तिची कॉलेजात भेट होते मग प्रेम..ती गरीब असल्यामुळे घरच्यांचा विरोध मग लग्न आणी तिचा कसल्याश्या रोगाने मॄत्यु…वाचायच आहे हे पुस्तक ..बघुया कधी मुहुर्त निघतो ते…

 2. कभी किसी को मुकम्मल जहॉं नही मिलता, कभी जमीं तो कभी आसमां नही मिलता|

  आपल्या आयुष्यातही असे काही क्षण येतात, जेव्हा ते का येतात हे आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही पण त्यांचा परिणाम आपल्या मनावर खोलवर होऊन जातो.

 3. मस्त पुस्तक सांगितलंस रे.. वाचलं पाहिजे. मला बरेचदा प्रतिथयश लेखकांपेक्षा अशी “first time” authors ची पुस्तकं वाचायला आवडतात. नवीन शैली, नवीन अनुभव असतात आणि उगाच नसता अलंकारिकपण नसतो त्यात. मी नुकतंच वाचलेलं असं “first time” author चं पुस्तक म्हणजे “Of course I Love You….Till I find Someone better” by Durjoy Datta and Maanvi Ahuja.. नावावरूनच कळतंय ना कसलं witty आहे ते 🙂

  • बहुतेक नव्या लेखाकांची भाषा अगदी सोपी आणी सहज असते…हया पुस्तकातही कुठेही अतिशयोक्ती वैगेरे वाटत नाही..लेखकाचे स्वत:चे अनुभव असल्यामुळे छोटे छोटे प्रसंगही छान रेखाटले आहेत… “of course ..” वाचाव लागेल आता…

 4. बरं मी तो ब्लॉग प्रायव्हेट केलाय…!
  आता हा नविन ब्लॉग सुरु केलाय बघु कितपत प्रायव्हेट राहतोय…!
  बर आणखी एक तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रीया वाचुन वाटलं नकोच थांबवावं लिहणं….!

 5. तू जेव्हा निघून गेलीस
  मागे न वळण्यासाठी
  तेवढी एकाच कृती पुरे होती
  विरह काय ते कळण्यासाठी ..

  चांगला निर्णय कालनिर्णय.. @ वैभव प्रसाद

  देवेंद्र हे पुस्तक कुठे मिळू शकेल सांगशील का?
  म्हणजे नक्की पत्ता मिळाला तर मी गेलो मुंबई पुण्यात तर मला सहज मिळेल.. असे…

  • छान चारोळी…
   कालनिर्णय.. 🙂
   (अरे अजयच आडनाव प्रसाद नाहिये,शिरसाट आहे)

   रेल्वे स्टेशनला जी पुस्तकाची दुकान असतात तिथे मिळेल हे पुस्तक किंवा ऑनलाइन ऑर्डरही देउ शकतोस इथे, डिसकॉंउंट पण आहे…

टिप्पण्या बंद आहेत.