इब्न-ए-बत्तुता


इब्न-ए-बत्तुता
बगल मे जुता
पहने जो करता है चुर्र~~~

हे गाण ऐकल असेलच तुम्ही,सध्यातरी बरयाच चार्टबस्टरस वर हेच गाण वरती आहे.इश्किया या विशाल भारद्वाज़च्या नव्या सिनेमातील हे गाण आहे.हो तोच तो कमिने वाला विशाल भारद्वाज़.चित्रपटसृष्टीत काही नाव अशी आहेत कि त्या नावासाठी आपण कोणताही सिनेमा बघायला तयार होतो.माझ्यासाठी तरी विशाल भारद्वाज़ हे एक असच नाव आहे.(काही वर्षापुर्वी रामगोपाल वर्माच नावही होत माझ्या हया यादीत पण आज त्याच रामगोपाल वर्माच नाव दिसल कि तो चित्रपट शक्यतो टाळतोच.त्यामुळे हे ’विशाल ’प्रेम कितपत अबाधीत राहील ते सांगता येत नाही)विशालबद्दल मी आधीही इथे लिहल आहे.त्याचा सिनेमा नेहमी काहितरी हटके असा असतो.’माचिस’ चित्रपटाच संगीत देण्यापासुन सुरुवात केल्यावर त्याने मागे वळुन पाहिल नाही,लेखक,निर्माता,दिगदर्शक अशी उत्तरोत्तर प्रगती करत तो आज इथे पोहोचला आहे.मागे मला बरयाच मित्रांनी विचारल होत कमिने तुला का आवडतो , काही खास तर नाहिये त्यात.तेव्हा मी त्यांना उत्तर दयायचो हा सिनेमा जरा वरच्या लेवलचा आहे नाही कळणार तुम्हाला त्यासाठी थोड वेड बनुन हा सिनेमा बघा आणि मग बोला. 🙂

इब्न-ए-बत्तुता

तर वर ज्या गाण्याचा उलैख केला आहे ते गाण मी बरयाच वेळा ऐकल होत.पण आज सकाळी असच ते गुणगुणत असतांना आमच्या श्री.बिनडोके (आता हे बिनडोके कोण ते मला विचारु नका) यांनी मला विचारल अरे गाण म्हणतो आहेस पण त्या ’इब्न-ए-बत्तुता ’ चा अर्थ माहित आहे का तुला.मग काय लगेच आपले गुगलास्त्र काढले आणी इब्न-ए-बत्तुता मंत्र म्हणत सोडले आंतरजालावर.तर इब्न-ए-बत्तुता हे मुस्लिम समाजातील मोरोक्को येथील सर्वात महान पर्यटकाच नाव.( खरतर त्याच पुर्ण नाव ’अबु अब्दुल्ला मुहम्मद इब्न अब्दुल्ला अल लवती  अल तंजी इब्न बत्तुता ’ होत..बापरे)अवघ्या २१ व्या वर्षी प्रवासाला निघालेल्या इब्न बत्तुताने पुढील ३० वर्षे त्यावेळी  ज्ञात असलेल्या जवळजवळ सगळ्याच मुस्लीम संस्कॄती असलेल्या देशांना भेट देण्यात घालवली.त्या काळी (ई.स. १३००) इतका प्रवास करण काही सोप काम न्वहत.हया सफ़रीत तो भारतातही आला होता.भारतात तो तब्बल ७ वर्षे राहिला होता व दिल्लीत काझी म्हणुन कामही केल होत. इब्न बत्तुता बद्दल अधिक माहितीसाठी इथे भेट दया.त्याच्या नावाचा सुप्रसिदध इब्न बत्तुता मॉल ही आहे दुबईला.

जरी हे पोस्ट ’इबन-ए-बत्तुता ’ गाण्यासाठी लिहलेल असल तरी मला या चित्रपटातील ’ दिल तो बच्चा है जी,थोडा कच्चा है जी ’ हे गाण खुप आवडते.नक्की ऐकुन बघा तुम्हालाही आवडॆल.बाकी पुढच्या आठवड्यात कळेलच विशालचा  ’इश्किया’ काय रंग दाखवतो ते.सध्यातरी हया गाण्याची मजा लुटा…

Advertisements

4 thoughts on “इब्न-ए-बत्तुता

  1. विशालचा माझा सर्वात आवडता चित्रपट म्हणजे ओमकारा. अफलातून मुव्ही आहे तो. honestly, कमीने अजिबात नाही आवडला. काय चाललय आणि मुख्य म्हणजे कशासाठी चाललंय तेच कळत नव्हतं. आता हा “इब्न-ए-बत्तुता” (आयला कसला अवघड शब्द आहे, मी सरळ कॉपी पेस्ट केला) उर्फ इश्किया कसा आहे बघू. मी पण रामू चा प्रचंड पंखा होतो एके काळी. पण नंतर त्याचं झालेलं अध:पतन बघवलं गेलं नाही..

    • हो ना ओमकारा छान आहे सिनेमा मलाही आवडतो.त्यातही त्याने पात्रांना भारी नाव दिली होती लंगडा त्यागी,केसु फ़िरंगी वैगेरे..मकबुल,मकडी,ब्लु अम्ब्रेला हे चित्रपटही छान आहेत.बाकी कमिने मला आवडतो कशामुळे ते माहित नाही… रामु नंतर तेच ते रिपीट करु लागला आणी बोअर करु लागला..

टिप्पण्या बंद आहेत.