हाक सह्याद्रीची…


खरतर हे आधीच लिहणार होतो.पण कामात व्यस्त असल्याने जमले नाही.आजही कामावरुन आल्यापासुन जायच्या तयारीत वेळ कसा गेला कळलच नाही. उद्या सकाळी ५ला मला घर सोडायचे आहे.( कायमचे नाही हो )तरीही आता रात्री ००:२० ला ही पोस्ट लिहायला घेतोय कारण हे ब्लॉगजगत सुदधा एक दुसर घरच झाल आहे.त्यामुळे तुम्हा सर्व ब्लॉग मित्रमैत्रीणींना हे कळवणे जरुरीचे वाटले.तर मी पुढील ७ दिवसासांठी (२४ ते ३० जानेवारी) हया रोजच्या रॅटरेसपासुन दुर निसर्गाच्या कुशीत सांगली येथील चांदोली अभयारण्यात राहायला चाललो आहे.चांदोली अभयारण्याबद्दल तुम्हाला इथे माहिती मिळेल.खरंतर या जंगलात जाण्यात ‘रिस्क’ आहे.कारण हे जंगल वाघ,बिबटे,रानरेडे आणि मगर यांसा्रख्या हिंस्त्र प्राण्यांसाठी  विशेष प्रसिदध आहे.पण पंकज (भटकंती ) च्या भाषेत माझी खाज आणिनिसर्गाची ओढ मला तिथे जाण्यास प्रवॄत्त करते आहे.

आमचा सात दिवसांचा कार्यक्रम

याआधीही छोटेमोठे ट्रेक्स केले आहेत पण ते १-२ दिवसाचे, असा ७ दिवसाचा ट्रेक आयुष्यात पहिल्यांदाच करणार आहे.तसे रोहन आणि पंकज यांच्या ब्लॉग्समधुन बरेच मोठे मोठे ट्रेक्स अनुभवले आहेत.पण ’याची देही याची डोळा ’ हे सगळ पहिल्यांदाच अनुभवायला चाललो आहे. तर आमच्या इथे डी.ए.ई. स्पोर्टस ऍंड कल्चरल काउंसील दरवर्षी इंडीयन माउण्टेनीअरिंग फ़ाउंडेशनच्या साहाय्याने ट्रेकिंगचे आयोजन करतात.त्यासाठी कंपनी आम्हाला स्पेशल सी.एल. देते.(ट्रेक यश्स्वीरीत्या पुर्ण केल्यावर)फ़िरण्यासाठी कंपनीची सुट्टी आहे कि नाही मजा.तर याआधीही मी दोन वेळा यासाठी फ़ॉर्म भरला होता.पण दोन्ही वेळी माझा नंबर लागला नाही.तरीही यावर्षी मी परत फ़ॉर्म भरला आणि देवाच्या कॄपेने यावेळी माझा नंबर लागला म्हणतात ना, कोशीश करनेवालोकी कभी हार नही होती…

तर आमच्या ग्रुपमध्ये एकुण २० लोक असणार आहेत त्यात आमच्याकडचे आम्ही ५ जण आहोत आणि उरलेले १५ जण भारतातील वेगवेगळ्या भागातुन येतील.तशी भटकंतीची  आणि निसर्गाची आवड आधीपासुन आहेच पण अस साहस कधी केल नाही.कारण या सात दिवसात आम्हाला काही किल्लेही चढायचे आहेत.त्यात तिसरया दिवशी जो प्रचितगड आम्हाला सर करायचा आहे त्याबद्दल इथे वाचुन काल थोडीशी फ़ाटली होती पण आता मी तयार आहे हे आव्हान स्विकारायला.त्यासाठी ही पोस्ट माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली.बघुया पुढचे सात दिवस निसर्गाच्या सोबतीने कसे जातात ते.तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेतच …तेव्हा निघतो आहे मी एक वेगळा अनुभव घ्यायला….

निसर्गराजा ऐक सांगतो....

Advertisements

14 thoughts on “हाक सह्याद्रीची…

 1. चांगली कंपनी आहे तुझी…आता मस्त मजा कर जंगलात….आणि आल्यावर पोस्टा टाक….
  शुभेच्छा..

  • धन्यवाद…
   अस चांगल ते काढुन घ्यायच कंपनीकडुन… मग कंपनी चांगली होते आपल्यासाठी… 🙂
   बघुया जंगलात काय होते ते..पोस्ट तर नक्कीच टाकीन आल्यावर…

 2. देवेंद्र … माझ्या आवडत्या ट्रेक्सपैकी एक आहे हां.. मज्जा कर एकदम. फुल टू घुसून जा निसर्गात. आल्यावर पोस्ट कर.. आता ते लिखाण वाचायची ओढ लागुन राहील…
  …तुझ्यासारखाच एक सह्यसखा … रोहन … !!!

 3. आम्ही कधी तिथे गेलो नही गालिब
  कारण आम्ही माणसांमध्येच जनावर पहिली..
  कुणी जखमी,हिंस्त्र तर कुणी रक्ताळलेली…
  हिरवीकंच जमीन मारून उजाड केलेली

  कुठे राहिली थोडी राने
  आणि झाडालाही दुर्मिळशी पाने..
  पाहुनी सुखाव तू… तव डोळ्यांना
  तेवढीच समाधाने…

 4. पिंगबॅक ते सात दिवस… « दवबिंदू

टिप्पण्या बंद आहेत.