ते सात दिवस…


सह्याद्रीच्या हाकेला साद देउन  १ तारखेलाच मी सुखरुप परतलो आहे.पण कामात जरा व्यस्त (खर तर नारायण झालो आहे, का माहित नाही पण आल्यापासुन बरयाच मित्रांची काम करत आहे.त्याच्यावर पुढे कधीतरी लिहेन.शिवाय या दिवसात नटरंग,झेंडा,हरिश्चंद्राची फॅक्टरी हे तीन चित्रपट बघण्याची मोठी कामगीरीही पार पाडली.) असल्याने ब्लॉग जगतात येणे झालेच नाही.खरतर मी ट्रेकींगच्या वेळी काहीच लिहुन ठेवल नाही. लिहायला एक छोटी डायरीही घेतली होती बरोबर पण लिहण जमलच नाही.कारण पुर्णत: मिसळुन गेलो होतो मी निसर्गाच्या रंगात आणि बघता बघता अज्ञातवासाचे ते सात दिवस कसे निघुन गेले ते समजले सुदधा नाही.(यासाठी की त्या सात दिवसात बाहेरील जगतात काय घडत आहे हे कळण्यासाठी टी.वी,वर्तमानपत्र किंवा इतर कोणत्याही प्रसारमाध्यमाशी संपर्क झालाच नाही.शिवाय मोबाइल नेटवर्क नसल्याने आणि चार्जींगची व्यवस्था नसल्याने मोबाइल हि बंदच होता).ब्लॉगजगतासाठी तसा मी २२ दिवसापासुन अज्ञातवासात आहे. आज लिहु, उद्या लिहु करता करता आता १५ दिवस झाल्यावर लिहतो आहे त्यामुळे जस आणि जितक आठवेल तस लिहतो आहे .तिथे मी ज्या फ़ीलिंगस अनुभवल्या त्या इथे नीट मांडु शकेन की माहित नाही पण माझ्यासाठी तरी नक्कीच हा एक अविस्मरणीय ट्रेक होता.

तर २३ जानेवारीला रात्री सह्याद्रीच्या हाक ही पोस्ट टाकुन तुमचा सगळ्यांचा निरोप घेतला होता.त्यानंतर फ़क्त तीन तास झोप मिळाल्याने निद्रादेवींचा कोप बरोबर घेउनच सकाळी ५:१५ ला मी घर सोडल.निघतांना एक दिवस आधीच खरेदी केलेली अवाढव्य वाटत असलेली हिटलॉन शीट (स्लीपींग मॅट) घ्यायची कि नाही असा प्रश्न पडला,कारण बॅग तर काठोकाठ भरली होती आणि चादर वैगेरे तर घेतली होती त्यात ही कशी सांभाळायची.शेवटी ठरवल घेउया हातातच पुढे बघुया काय करायच ते.हा निर्णय घेउन मी किती मोठी घोडचुक टाळली होती हे मला जंगलात गेल्यावरच कळाले आणि तिथेच हया शीटशी मैत्री जडली.कारण रात्री जंगलात झोपतांना जमीन अशी गार पडायची की सांगायलाच नको पण ही शीट माझ्यासाठी ढाल होवुन त्या थंडीशी लढा द्यायची.दुपारी उन्हातान्हात भटकतांनासुदधा  कुठेतरी सावलीत घटकाभर विसावा घेताना ही मखमली शीट कसला राजेशाही अनुभव द्यायची ते मी इथे शब्दात मांडु शकत नाहिये .शिवाय मुक्कामाला पोहोचल्यावरसुदधा  आमचा सगळा संसार थाटला जायचा तो हया शीटवरच.तर ही शीट हातात घेउनच ०५:४० ला बोइसर-पनवेल ट्रेन पकडली.(पुढे मात्र बॅगला मस्त बांधली ही शीट. वरील छायाचित्र मोठ करुन बघितल्यास दिसेल तुम्हाला ते)वसईपर्यंत तर नेहमीचाच मार्ग होता पण पुढील मार्गावरुन मी पहिल्यांदाच प्रवास करत होतो.त्यामुळे असच बाहेर पाहायच होत पण निद्रादेवींचा कोप असल्याने पापण्या जड होत होत्या.आणि अश्या डुलक्या काढत काढतच अर्ध्या झोपेतच सकाळी ०९:१५ ला पनवेल गाठल.

पनवेलमध्ये पोहोचल्या पोहोचल्याच आमचे स्वागत झाले ते एका  वाईट बातमीने. आमची ट्रेन तब्बल ३ तास उशिरा होती मग काय करायच याबाबत चर्चा करुन बसने चिपळुण गाठायचा निर्णय घेतला गेला.रेल्वेची टिकीट रद्द करुन मग १०:१५ ला चिपळुणला जाणारी आपली लाल बस पकडली.मला वाटते ११:३० च्या आसपास गाडी एका बसस्टॅंड वर १० मिनटांसाठी थांबली मग तिथे उतरुन एक झुणकाभाकर घेतली चव चाखायला इतकी मस्त झाली होती ती की आम्ही ३ प्लेट बांधुन घेतल्या.मग बसमध्ये धनावडॆ यांनी घरुन आणलेल्या लाडुंवर आणि झुणकाभाकरवर यथेच्छ ताव मारला.इथवर आम्ही चार जण सोबत होतो. श्याम धनावडे नावाचे आमच्या इकडचेच एक जॉली सदगॄहस्थ होते जे जवळ्पास २०-२५ वर्षापासुन ट्रेक्स करत आले आहेत.दुसरा होता स्वानंद मुळे हा माझा बालपणीपासुनच ओळख असलेला जवळचा मित्र आणि तिसरा फ़िरायची आवड असलेला वैभव जुन्नरकर नावाचा मित्र आणि चौथ्या सुपरस्टारला तर तुम्ही ओळखतातच.तर पुढे माणगाव नावचे एक गाव लागले तिथे आमचा पाचवा मित्र वीडी (विवेक देशमुख) बसमध्ये बसला.त्याने बरच लपवायचा प्रयत्न केला पण त्याला स्टॅंडवर सोडायला आलेल्या मैत्रीणीला मी पाहिलेच आणि यावरुन बोलता बोलता आम्हाला त्याचे २-३ पॉंइंटस मिळाले जे पुढील सात दिवस त्याची खेचण्यात पुरुन उरले.

वीडी आल्यापासुन आधी थोडे कंटाळलेले आम्ही टिंगल-टवाळी करत हसतखेळत बरेच ताजेतवाने झालो.गाडी दुपारी ०२ ला पोलाद्पुरला जेवणासाठी २० मिनटांसाठी थांबली.पण रविवार असल्याने चिपळुणला जाउन काहितरी नॉनवेज ठोसुया असा बेत बहुमताने ठरल्याने आम्ही तिथे जेवलो नाही.पुढे ०३:४५ च्या आसपास आम्ही चिपळुण गाठल.पण हाय रे दैवा आमचा मांसाहारावर ताव मारायची योजना पुरी फ़सली होती.कारण तिथे कुठेच आम्हाला त्या वेळेला नॉनवेज उपलब्ध झाल नाही.”आता मिळणार नाही ” किंवा ” वेळ लागेल ” अशी उत्तर मिळाली. एक-दोन प्युअर नॉनवेज  हॉटेल होती ती का माहित नाही पण बंद होती. ’केहते ना किसि चिज़ को अगर दिलसे(पेटसे) चाहो तो सारी कायानात उसे तुमसे मिलानेमे (जुदा करनेमे) जुड जाती है’ अस काहिस होत होत आमच्याबरोबर. फ़िरुन फ़िरुन शेवटी बस डेपोच्या बाहेरच असलेल आणि ५० वर्षात पदार्पण केलेले (तसा बोर्ड बाहेर झळकत होता) हॉटेल अरुण उपहार गॄह चांगल वाटल आणि तिथेच घासपुस खाउन पेटपुजा उरकली.शाकाहारी असल तरी तिथे जेवण बाकी छान होत .

चिपळुणहुन ०५:०० ला हेळवाक गाडी पकडली.हा रस्ता बराच घाटाचा होता त्याची मजा घेत आम्ही ०६:३० ला आमच्या आजच्या ’फ़ायनल डेस्टीनेशन’ ला  हेळवाकला पोहोचलो.तिथे बेस कॅंपला गेल्या गेल्या आम्हाला गरमागरम चहा-बिस्कीटे आणि चिवडा दिला गेला त्यामुळे आम्ही बरेच ताजेतवाने झालो. आम्ही एकुण २८ जण या  गिरीसंचार कार्यक्रमात सहभागी झालो होतो.यात दोन जण इंदोर,एक काश्मिर,एक पंजाब,एक राजस्थान,सहाजण आम्ही  तारापुरचे(आमचा सहावा पार्टनर हेमंत शेट्ट्ये आधीच तिथे पोहोचला होता) आणि इतर मुंबईचे असे आम्ही सगळे आता पुढील सहा दिवस एकत्र काढणार होतो.मग तिथे फ़्रेश होवुन  नवीन लोकांशी ओळखी करण्यात वेळ कसा गेला ते कळलेच नाही.

मग ०९:०० च्या आसपास आम्हाला सुप देण्यात आला.बरीच थंडी असल्याने सुप प्यायला खुप मज्जा आली.त्यानंतर जेवण आटोपल्यावर आम्हाला सर्वांना एकत्र बसवुन दुसरया दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देण्यात आली.सगळ्यांना आपापली ओळख देण्य़ास सांगीतले गेले व त्यानंतर श्याम धनावडॆ,सिंग(नाव आठवत नाही),हेमंत शेट्ट्ये (दोघे आमच्या ग्रुपमधले) हया तिघांना आमचे लिडर बनवले गेले.मग आम्हाला हॅट वाटण्यात आल्या.ती ओळख-परेड आटपुन आम्ही तंबुत झोपायला गेलो.तंबुत झोपायची ही माझी पहिलिच वेळ होती.तंबुचा पॄष्ठभाग बराच गार पडला होता, इथेच सर्वप्रथम मला हीट्लॉन शीटचे महत्व कळले.दिवसभरच्या प्रवासामुळे थकवा होताच त्यात दुसरया दिवसाच्या ट्रेकबद्दल विचार करत करत  कधी निद्राराणी प्रसन्न झाली ते कळलेच नाही…………… क्रमश:

[जस आठवल तस लिहण्याचा प्रयत्न केला आहे.जास्त काही एडीटही केल नाहिये त्यामुळे काही चुका असु शकतात.पण बरयाच दिवसांपासुन न लिहण्याच आलेल जडत्व (inertia) पळवण्यासाठी आज पण करुनच बसलो होतो,काहीही करुन आज पोस्ट टाकायचीच.पुढील पोस्टही लवकर टाकायचा प्रयत्न करेन.ऑरकुटवर ट्रेकींगचे काही फ़ोटो टाकले आहेत.ते इथे पाहु शकता.]

Advertisements

16 thoughts on “ते सात दिवस…

 1. छान! मज्जा आहे बरं का ? मी ६२+चा तरूण आर्कुट्वर फोटो पहायला गेलो तर काय? थेथे बंदी फोटो बघायला !
  आम्हाला ही फोटॊ पहायची संधी द्या ना? आणि येथे ही आपली पायधूळ झाडा ना जरा ?
  http//:savadhan.wordpress.com
  बघा आवडतय का ?

  • दवबिंदुवर तुमचे स्वागत आणी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..तुम्हाला ऑरकुटवर ऍड केल आहे…आता पाहता येतील तुम्हाला ते फ़ोटो..
   सावधान,तुमच्या ब्लॉगवर येतो आहे…

 2. आम्ही राहतो सह्याद्रीत…
  चिपळूण ला जाताना महाड लागला असेल कदाचित..
  पुन्हा कधी आलास तर भेटण्याचा योग येवू देत..
  मला फारशी त्रेक्किंग ची आवड नसली तरी…
  माझे खूप मित्र आहेत… ट्रेकिंग करणारे..
  एक त्यांनी छान उपक्रम केला होता…
  आमच्या इथे महाबळेश्वर ला उगम पावणारी सावित्री नदी आहे..
  तिच्या सुरुवातीपासून, शेवटपर्यंत त्यांनी प्रवास केला होता नदीतून.
  ‘उत्तुंग ते अथांग’ असे नवं दिले होते त्यांनी उपक्रमाला..
  फार छान उपक्रम केला होता..

  • जरुर भेटु पुन्हा तिथे येण झाल तर…
   मी सुदधा नेहमी ट्रेकींग करणारा नाहिये.
   तुमच्या मित्रांच्या ‘उत्तुंग ते अथांग’ उपक्रम मस्त वाटतो आहे.

 3. पिंगबॅक स्ट्रॉबेरीच्या दुनियेत… « दवबिंदू

 4. पिंगबॅक दक्षिणायन… « दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.