ते सात दिवस…(भाग-२)


दुसरया दिवशी म्हणजे २५ जानेवारीला आम्हाला सकाळी सहालाच चहासाठी उठवले गेले.आळस देतच मग आमच्या त्या घरटयातुन (तंबु) आम्ही बाहेर पडलो.बाहेर खुपच थंडी होती म्हणुन  दात न घासताच आधी चहाचा आस्वाद घेउया अस मी आणि इतरेही काही जणांनी ठरवल.गरमागरम चहाचे घुटके घेतल्यावर जरा तरतरी आली.मग आम्हाला सुचना देण्यात आली कि हया गावाला (हेळवाक) नुकताच स्वछतेबद्दल पुरस्कार मिळाला आहे तेव्हा कचरा वैगेरे कचरापेटीतच टाका आणि शौचासाठी पलीकडे एक डोंगर आहे तिथे जा.मग काय निघाली स्वारी मोहिमेवर.सकाळीच त्या डोंगरावर जातांना सकाळ्च्या शांत आणि नयनरम्य निसर्गाची सोबत खुपच छान आल्हाददायक वाटत होती.मग त्या डोंगरावर मोहिम फ़त्ते करुन  ताजेतवाने होवुन आम्ही परतलो.

आज आम्हाला सर्वांना आंघोळीची गोळीच घ्यायची आहे हे परतल्यावर समजले.मग उपलब्ध असलेल्या पाण्याचा वापर करुन आम्ही सगळे तयार झालो.नाश्त्याला मस्त कांदेपोहे होते ते हाणुन आम्ही चपाती आणि मुगाची भाजीच पॅक्ड जेवण बरोबर घेतल.नंतर आम्हाला परत एकदा आजच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली त्याबरोबरच एक वाईट बातमी मिळाली कि उद्या ज्या प्रचितगडावर जायचे होते तिथे व्याघ्रप्रकल्प संदर्भात वाघांची मोजणी होत असल्याने तिथे जायला  दिलेली परवानगी सरकारने नाकारली आहे त्यामुळे उद्या कोकण कडा इथे जायचे आहे.मला तर खुप वाईट वाटले कारण प्रचितगडाबद्दल मी बरच ऐकल होत.अगदी तोंडापाशी आलेला घास कोणीतरी हिरावुन घेतल्यासारख वाटल.पण हे ऐकल्यावर आनंद झाला की आम्ही पुढील दिवसात जिथे जिथे फ़िरणार आहेत तो पुर्ण पट्टा ‘स्वतंत्र सह्यादी व्याघ्र प्रकल्प’ म्हणुन जाहिर झाला आहे आणि यापुढे कोणालाही इथे फ़िरता येणार नाहिये.कारण ’हयुमन बिहेवीअर ’ आम्ही काही नशीबवान लोक इथे शेवटचे फ़िरणार होतो ना.हया व्याघ्र प्रकल्पासंबधी काही माहिती तुम्हाला इथे वाचता येइल.

बर आधीच्या पोस्टपासुन मी ज्या सुचना मिळाल्या वैगेरे म्हणत होतो ना त्या देत होते ते डॉ. फ़ळ .आम्ही सहभाग घेतलेल्या गिरिसंचार या कार्यक्रामाचे एक शिल्पकार.शास्त्रज्ञ असुनही निसर्ग आणि डोंगरदरयांवर त्यांचे विलक्षण प्रेम त्यांच्या बोलण्यातुन दिसत होते.त्यांनी शिवरायांच नाव घेत घोषणा दिली व आम्हाला निरोप दिला.मग ०८:१५च्या सुमारास एकदम जोशात भैरवगड जिंकण्यासाठी आम्ही सगळे शिवरायांचे मावळे  निघालो.सुरुवातीलाच चढण असल्याने मला तरी भारी पडत होते कारण हयाची माझ्या आळशी शरीराला  सवय न्वहती ना.पण कोणालाही मी तस दाखवल नाही .त्या डोंगरावरील चढत्या वाटेवर दरमजल करत आम्ही मग एका  थोड्या सपाट भुभागावर आलो.तिथे ४-५ मिनीटे थांबुन आम्ही पुढे निघालो.पुढे एक बैलगाडी जाण्यासाठी बनवलेला एक रस्त्यावरुन जायचे होते.थोड बर वाटत होत त्या रस्त्यावरुन पण थोड्याच वेळात पुढे पाहतो तर काय त्या रस्त्यावर सुद्धा मोठ्या मोठ्या चढणी होत्या.बैलगाड्या येथुन कश्या जात असतील याच आश्चर्य वाटत होत.

त्या रस्त्यावर लाल मातीची उधळण करत चालत (चढत) असतांना तीन-चार मुल आम्हाला भेटली.सगळ्यांच्या खांद्यावर दप्तर आणि हातात दुधाची मोठी किटली होती.त्यांना विचारल असता ते म्हणाले आता ही किटली काही ठिकाणी पोहोचवायची आणि शाळेत जायचे व परत येताना खाली किटली घेउन यायची असा त्यांचा दैनंदिन कार्यक्रम होता.मी इथे जरा बदल आणिमजा करण्यासाठी आलो होतो आणि ही पोर एक गरज म्हणुन रोजच हा ट्रेक करत होती.असो ती मुल भेटल्यावर ५-१० मिनटांनी आम्ही ती बैलगाडीची वाट सोडली आणि जंगलात जाणारी पायवाट पकडली.ही नेहमीची पायवाट नक्कीच न्वहती कारण त्या काटयाकुट्याच्या रस्त्यात बरयाच ठिकाणी मार्गात येणारया फ़ांद्या आम्हाला बाजुला कराव्या लागत होत्या.१० च्या आसपास आम्हाला एक मनोहारी धबधबा लागला.ते पाण्याचे तुषार खरच आतापर्यंत केलेल्या पायपीटाचा शीण घालवणारे होते.  तो खडतर मार्ग चालल्याच खुपच चांगल बक्षीस त्या डोंगराने आम्हाला त्या धबधब्याच्या रुपात दिल.मी त्या धबधब्याच्या गाभारयात जाउन काढलेला वरील फ़ोटो पाहा.त्या ठिकाणी असतांना तिथे पाउसाळ्यात पाण्याच कस साम्राज्य असेल हा विचार तेव्हा माझ्या मनात आला.कारण पाउसाळ्यात त्या ठिकाणी जाण ’मुश्कीलच ’ नाही तर ’नामुनकीन’ असेल अस मला तरी वाटते.

त्या धबधब्याच्या अल्पश्या सहवासात प्रसन्न होवुन आम्ही पुढची वाट पकडली.आता मिस्टर हॉट (सुर्यनारायण) ही त्यांच अस्तीत्व आम्हाला जाणवुन द्यायचा प्रयत्न करु लागले होते.अचानक जैत रे जैत सिनेमातील ’लिंगोबाचा डोंगुर’ या गाण्यातील ’सुर्यदेव भर डोक्यावरी आला ’ ही ऒळ डोक्यात वाजुन गेली.शिवाय ही वाट हि बरीच चिंचोळी होती.बाजुला खोल दरी  होती थोडा पाय सटकला तर त्या उतारावर बरीच झाडझुडुप असल्याने मरण नाही पण जिवंतपणीच मरण यातना भोगाव्या लागतील ऐवढ मात्र नक्की होत.आम्हीही सावध पवित्रा घेत १०-१५ मिनटात ती वाट पार पाडली.पुढे १०:३० ला एक वाहता ओढा लागला.तिथे क्षणभर विसावा घेउन आम्ही पुढे वर चढत राहिलो.११:४५ ला आम्ही त्या डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो.आजुबाजुचे डोंगरमाथ्यांच सुरेख दर्शन तिथे घडत होत.जरा वेळ तिथे रेंगाळुन आम्ही तिथुन परत एका एकदम निमुळत्या आणि घसरड्या वाटेवरुन थोड खाली उतरलो व एका ठिकाणी वळुन घनदाट जंगलात प्रवेश केला.

आतापर्यत आग ओकणारया सुर्यदेवानी येथे मात्र आमचा पिच्छा सोडला कारण ठरवुनही त्याला त्याच एकही किरण आमच्याबरोबर पोहोचवता येत न्वहत.अगदी थंड वाटत होता तो भाग.चारही बाजुला इतकी गर्द झाडी होती  की मनात थोडी का होइना भीतीची लहर आली होतीच. पण त्यातही मजा घेत मोठया मोठया चढ-उतारावर मार्ग काढत आम्ही ते रान पायाने तुडवत होतो.जंगलात मध्येच मोठीमोठी दगड असलेला एक सुकलेला ओढा लागला तिथे ४-५ मिनट विश्रांती घेउन आम्ही आमची पायपीट चालुच ठेवली. दुपारी दोनच्या जवळ्पास आम्ही भैरोबाच्या मंदीराकडे पोहोचलो.तिथे आमच्या त्या असहय झालेल्या बॅगा उतरवुन आम्ही मंदिरात दर्शन घेतल.त्या बॅगा काढल्यावर नुसत चालतांना देखील आमच शरीर ऍक्सीलिरेट होत होत. इथेच आम्हाला जेवायच होत.पण तिथे पाण्याची सोय न्वहती आम्हाला काल दिलेल्या सुचने प्रमाणे मंदिराच्या पुर्व दिशेला खाली उतरले कि पाणी मिळेल असे सांगीतले होते.मंदीराच्या पुर्व दिशेला तर खाली दरीवजा भाग होता आणिसगळे जण खुप थकले होते.मग काय  ’मानो या न मानो ’ पण मी आणि वीडीने पाण्याची जबाबदारी घेतली.

सगळ्यांच्या बॉटल्स पिशवीत भरुन आम्ही दोघांनी त्या दरीत उतरायला सुरुवात केली.ती वाट अशी निसरडी होती कि सांगु नका एका ठिकाणी त्या वाटेवरच मी घसरलो वाटल सगळ संपल आता,खेळ खल्लास.पण एका ठिकाणी ग्रिप मिळाली हाताला आणि निभावल.’काळ आला होता पण वेळ आली न्वहती ’ याचा  अनुभव मी त्या मायक्रोसेकंदाच्या क्षणात घेतला हे मात्र नक्की.पाचच मिनटावर आम्हाला एक छोटस डबक लागल पाण्याच, पाणी स्वच्छ दिसत होत पण त्यात खुप किटक होते.मग रुमाल काढुन गाळुन ते पाणी घेतले.मस्त गार पाणी होत ते. निरीक्षण केल्यावर दिसल की तिथे दगडांमधुन कुठुनतरी ते पाणी येत होत. त्या गार पाण्याने सर्वांना तॄप्त करुन आम्ही सर्वांनी जेवण उरकल.जेवण करुन सुस्तावलेल्या सर्वांनी मिळुन एक तास तिथे विश्रांती घ्यायचे ठरवले.कारण आमच्या कार्यक्रमात हया भैरोबाच मंदीराकडुन परतायच अस होत. एक तास हाताशी होता आणि समोर भैरवगड, आम्हाला राहवल नाही. ’हा बघ सुर्य आणि हा बघ जयद्रथ’ प्रमाणे युगंधर जणु आज आम्हालाच आव्हान देत होता ’हा घ्या एक तास आणि हा बघा भैरवगड’…  मग काय आम्ही पाचजणांनी(मी,हेमंत,वीडी,मुळे आणिसचीन)  मिळुन तिथे जायच ठरवल.

सकाळी पहिल्या तासातच थकलेल्या माझ्यात मघाशी पाण्याची आणण्याची जबाबदारी घेण्यापासुन आता हया मिशन भैरवगड योजनेत सहभागी होण्यापर्यंत कोठुन शक्ती संचारली होती ते मलाच कळत न्वहत.पण जे काही अनुभवत होतो ते खुपच चांगल होत. अनुभवी असल्याने हेमंत हया मोहिमेत आमच नेतॄत्व करत होता.थोड चढल्यावर पुढे एक बुरुज दिसला तिथे थोडॆ फ़ोटो काढुन आम्ही पुढे मार्ग तुडवु लागलो.बॅग बरोबर नसल्यामुळे जरा सोप वाटत होता प्रवास.पण पुढील वाट तशी धोक्याची होती कारण बरयाच ठिकाणी एका बाजुला थेट पाताळात पोहोचवणारी दरी होती. डोंगराच्या बाजुला जास्तीत जास्त भार देत एक वेगळ थ्रिल अनुभवत आम्ही मावळे पुढे चढत आगेकुच करत राहिलो. शेवटी भैरवगड सर केला पण तिथे जास्त थांबायला मिळाले नाही कारण आमच्याकडे वेळ खुपच कमी होता.मग भैरवगडाला ती धावती भेट देउन ०३:३० ला भैरोबा मंदीराकडे परतलो आणि भैरोबा मंदीराच्या बाहेरच शिवाजी महाराजांचा एक छोटासा पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालो.भैरवगडाबद्दल अधिक माहिती तुम्हाला इथे मिळेल.

४ च्या आसपास आम्ही त्या मंदीराचा निरोप घेतला.सुरुवातीला काही वेळ घनदाट जंगलातील वाट होती पण पुढे आम्हाला एक बैलगाडी जाण्यासाठी असलेला मार्ग लागला.आजुबाजुला जंगल असल तरी सकाळच्या मानाने हा रस्ता खुपच सोपा होता. मग ०५:३० च्या आसपास आम्ही पाथरपुंज येथील आमच्या आजच्या फ़ायनल डेस्टीनेशनला पोहोचलो.खुपच सुंदर जागा निवडली होती कँप साठी कारण कॅंपच्या बाजुलाच वारणा नदी वाहात होती.त्यामुळे मुबलक पाणी होत. शिवाय जवळच दगडांमधुन एक छोटासा झरा वाहत नदीला मिळाला होता.त्या झरयाच पाणी आम्ही प्यायला वापरल.या ठिकाणी दोन दिवस मुक्काम असल्याने घातलेले कपडे धुतल्याशिवाय मला राहवले नाही.कपड्यांची हालत बघुन वाटल बर झाल मी हेमंतच्या सल्ल्यानुसार जुनेच कपडॆ घेउन आलो होतो ते.मग त्या नदीच्या गार पाण्यात  मस्त मनसोक्त आंघोळ केली आणि चहा वैगेरे घेउन आम्ही संध्याकाळी जवळच असलेल्या पाथरपुंज हया गावात फ़ेरफ़टका मारला.अगदी छोटस गाव आहे हे आणिलवकरच हे गाव व्याघ्रप्रकल्पा अंतर्गत इथुन उठणार आहे असे आम्हाला कळले.

पाथरपुंजहुन परतल्यावर तंबुत विश्रांती घेण्यासाठी पहुडल्याचा अवकाश माझे सर्व अवयव  बोलायला लागले होते.खांदयाच्या तर पुर्ण चिंद्या झाल्यासारख वाटत होत.पायात असह्य वेदना होत होत्या.हे आता अस का व्हायला  लागल ते कळत न्वहत. माझीच नाही तर बरयाच जणांची अशीच हालत झाली होती.मग आम्ही एकमेकांचे अंग दाबुन  दिल्यावर थोड बर वाटु लागल. थोड्याच वेळात तंबुत गाण्यांच्या भेंड्या आणि शेरो-शायरीची मेहफ़िल भरली आणि ते दुखण कुठल्या तरी कोपरयात विरुन गेल. त्यानंतर बाहेर आम्हाला गरमागरम-सुप देण्यात आल.त्या शीतल चंद्रप्रकाशाच्या आणि बाजुला वाहत असलेल्या संथ नदीच्या सहवासात गुलाबी थंडीचा आस्वाद घेत सुप पिण्याची लज्जत काही वेगळीच होती.

त्यानंतर काही वेळातच जेवण करुन परत गाण्यांच्या भेंडयांचा कार्यक्रम रंगला.त्यानंतर डॉ. वाडेकर (हे सुदधा गिरिसंचारचे एक फ़ाउंडर -हयांच्या बद्दल लिहण्यासारख बरच आहे पुढे लिहेनच ) यानी आम्हाला दुसरया दिवसाच्या कार्यक्रमाच्या माहिती बरोबरच सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त छोटासा झेंडावंदनाचा कार्यक्रम होइल असे सांगीतले.जंगलातही आम्ही प्रजासत्ताक दिन साजरा करणार हे ऐकुन खरच आनंद झाला.त्या आनंदातच आम्ही तंबुत परतलो.आज दिवसभर केलेल्या तपश्चर्येनंतर निद्रादेवीला प्रसन्न करण्यासाठी अजुन वेगळी आराधना करायची गरज न्वहतीच.त्यामुळे लगेचच आजच्या दिवसभरातील काही क्षण आठवत स्वत:च च कौतुक करत निद्रादेवीच्या अंधारया साम्राज्यात अलगद विलीन  झालो………….क्रमश:

*पोस्टमध्ये फ़ोटो धुसर दिसत आहेत ते मोठे करुन बघण्यासाठी फ़ोटोवर क्लिक करा.

(या येत्या २४,२५,२६ फ़ेब ला महबळेश्वर-प्रतापगड दौरा करायची योजना आजच एका मित्राने मांडली आहे.बघुया जमत का.)

Advertisements

18 thoughts on “ते सात दिवस…(भाग-२)

 1. मस्त..सगळे क्षण डोळ्यासमोर उभे राहतात. पुढल्या भागाची वाट बघतोय. लवकर येऊ देत.. :):)
  सध्या ऑफीसमुळे माझे ट्रेक बंद झालेत यार…श्या 😦 :(:(

 2. सही.. एकदम जिवंत केला आहेस ट्रेक. आम्ही भारत सोडण्यापूर्वी केलेल्या हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकची आठवण झाली. बाकी दुस-या फोटोत एकदम ढासू दिसतोयस 🙂

  • प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…
   आपल्या परीने केलेला ट्रेक मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
   मी जेव्हा तो फ़ोटो बघितला तेव्हा माझीही प्रतिक्रिया अशीच होती… 🙂

  • मी पण आधी रोहन आणी पंकज यांच्या ब्लॉगमधुनच ट्रेकची मजा घ्यायचो.पण प्रत्यक्ष हे अनुभवायच फ़िलींग वेगळच आहे.
   तुम्हाला तर भटकंतीचा अनुभव आहेच पुढील योग लवकरच येवो.
   प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद …

 3. mi ha trek kela ahe photo pahun khup athavan ali bhairavgad ani prachitgaddonhikade jaun ale ahe khar tar ha bhag chandoli abhayarnyat modato tethe ratrichyaveli aswale tasech rangave pahayala miltat tethil ratriche khup thararak anubhav ankhin athavtat

 4. aamhi ha treck 2009 april madhye kela hota.helvak nantar jo dhabadha lagla to kadachit ramghal asava. ramdas swaminni ti ghal shodhun kadli ase sangitale.nantar aamhi(nisargmitra panvel yanni aayojan kele hote)bhairavgadala gelo tya divashi bhairobachi yatra pan hoti.ratri bhairavgadavar mukkam kela.dusarya divashi patharpunj madhun vatadya gheun jangalatun vat kadit kandardoh yethe mukkam kela. khup mota dhabdhaba aahe.tethech varna nadicha ugam hoto ase vatadyane sangitale.sakali tya dohat snan karun prachitgadakade vatchal suru keli.tevha tethe janyavar bandi navhati.vatevar don sade lagle.kalyashar dagadache sade par kelyavar janglat ek purn uthun gelele gav lagale.tethun pude chalat gelyavar jangal sampun ekdam samor prachitgad disala.25 fut saral gasaryavarun utrun prachitgadachya shidine var gelo.gadachya madhomadh ek vadache zad aahe.ratri mukkam tethech.sakali khali kokanat hahile tar sampurn kokan dhagankhali gelele.parat gad utarayala saruvat keli.kadyachya khalun chhoti payavat aahe.ghasara khupach aahe .eka thikani rope laun 10-15 foot utaralo.sadharan 1vajata shrungarpurla aalyavar s t ne thet chiplun.tethun panvel.tinahi mukkamat jevan aamhich banvale.13-14 janamadhye 6 muli hotya aani 10 vhya 3 mulini tar kadhihi gadkille chadhalele navhate.mi mazya 10 vi til mulila gheun gelo hoto.ti matr aamachya barobar khup gadkallyavar aaleli aahe.

 5. i also aware of prachitgad i we also face that problem of tigar counting process but we do not listne anybody and completed our tour of prachitgad, bhairavgad befor two year pls check my ourkut profile u will see all photographs there

  • विनायक ,दवबिंदुवर आपल स्वागत…
   आम्ही तिथे असतांना बर्याच अधिकार्यांची सतत गस्त चालु होती..तेथील बरीच गावेही उठत आहेत आता…आपल्या प्रोफ़ाईलची लिंक द्या…

 6. पिंगबॅक दक्षिणायन… « दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.