दिल दे के देखो……


सध्या तुम्ही टीवीवर वीरेंद्र सेहवाग, नेमबाज राजवर्धन राठोड आणि  प्रियांका चोप्रा हयांची हिरोहोंडा प्रायोजीत ’ फ़िर दिल दो हॉकीको ’ ही जाहिरात पाहिली असेलच. आपला राष्ट्रीय खेळ मानला जाणारया  हॉकीचा विश्वचषक तब्बल दोन दशकानंतर भारतात आज सुरु होणार आहे.पण आपल्या भारतीयांना (मला पकडुन) हया खेळाबद्दल थोडीही आत्मियता नसल्याने अश्या प्रकारच्या जाहिराती टीवीवर दयाव्या लागत आहेत.हाच जर क्रिकेटचा विश्वकप असता तर ७-८ महिन्या आधीपाअसुनच त्याबाबत गल्लीबोळात चर्चा असती,कोणी त्यावर गाण्याचा अल्बम काढला असता,सगळ्या मोठ्या कंपन्या आपल्या लोगोंसाठी मैदानावर पैसा ओततांना दिसल्या असत्या,बरयाच वस्तुंच्या वर्ल्डकप ऑफ़र आल्या असत्या,जो तो क्रिकेटच्या या तव्यावर आपली पोळी भाजतांना दिसला असता.पण दुर्दैव अस की राष्ट्रीय खेळ असणारया या हॉकीसाठी काहीच होत नाहिये.हॉकीला नेहमीच आपण सगळेच सावत्रपणाची वागणुक  देत आलो आहोत.त्यामुळेच प्रायोजक तर हॉकीपासुन दोन काय दहा हात लांबच राहण पसंत करतात.’चक दे इंडिया ’ या सिनेमाने मागे या खेळाला थोडी प्रसिद्धी मिळवुन दिली पण ती सिनेमापुरताच मर्यादीत राहिली. महिला हॉकी संघाला जिंकुन देणारा हा ’कबीर खान ’ हॉकीसाठी काहीही न करता ’ कोरबो लोरबो जीतबो ’करत शेवटी क्रिकेटच्याच मैदानात धावला.

त्यात गिल नावाच्या त्या *&@%$##%#@ माणसाने नवे नवे वाद करुन भारतीय हॉकीचे नाव पार धुळीस मिळवले.आताही विश्वचषकाच्या फ़क्त एक महिन्याआधी हॉकी खेळाडुंना पगारासंदर्भात संप करावा लागला होता.धनराज पिल्ले सारख्या खेळाडुबरोबर काय झाले ते आपण पाहिलेच.ज्यांना खेळ सोडुन त्यांच्या हक्काच्या पैश्यासाठी पण असे झटावे लागत असेल तर त्यांच्याकडुन अपेक्षातरी कसल्या ठेवायच्या म्हणूनच मग एकेकाळी सलग सहा ऑलिंपिक सुवर्ण पदक मिळवलेला भारतीय हॉकी संघ गेल्या वेळच्या बीजिंग ऑलिंपिकसाठी पात्रही होऊ न शकल्याच्या घटना घडणारच. ही खरतर आपल्यासाठी अतिशय निंदास्पद गोष्ट होती  पण त्याच आपल्याला काही वाटलच नाही.कारण आजच्या या पिढीने हॉकीला ’दिल दिलच ’ नाही.खरच या खेळाला आज आपली गरज आहे. नाहितर राष्ट्रीय खेळ म्हणवला जाणारा हा खेळ भारतात इतिहासमा होइल.म्हणुन शक्य तितके सामने बघुन कोणत्या न कोणत्या मार्गाने आपल्या संघाला प्रोत्साहन दयायला हवे.भारतीय हॉकीच भवितव्य हया विश्वचषक हॉकी स्पर्धेवर अवलंबुन आहे असे मला तरी वाटते. म्हणूनच हिरोहोंडाच्या जाहिरातीतिल ’ फ़िर दिल दो हॉकीको ’ बदलुन मला म्हणावेसे वाटते ’ एक बार हॉकीको दिल दे के तो देखो ’.

आतापर्यंत  विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या इतिहासात भारताला केवळ एकच वेळा जेतेपद पटकावता आले.२००६ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत तर भारतीय हॉकी संघाने खालून दुसरे स्थान मिळविले होते.बारा संघाचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत आज आपली गाठ पडणार आहे ती पारंपारिक प्रतिस्पर्धी बलाढय पाकिस्तान बरोबर तेव्हा आजचा सामना रंगणार हे वेगळ सांगायला नको.तसा दोन्ही सराव सामने जिंकत भारतीय संघाने आपला इरादा पक्का केला आहे.कालच सेलने (स्टील ऑथोरीटी ऑफ़ ईंडिया)  पुढे येवुन भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यासाठी विश्वचषक जिंकल्यास भारतीय संघाला एक करोड तर उपविजेते ठरल्यास पन्नास लाख रुपये बक्षीस देउ असे जाहिर केले आहे.तेव्हा यावेळी भारतीय संघाने विश्वचषक जिंकुन एका नव्या पर्वाला सुरुवात करावी असे मनापासुन वाटते.त्यासाठी भारतीय संघाला शुभेच्छा….चक दे इंडिया….

*हया विश्वचषकाच्या वेळापत्रक तसेच इतर माहितीसाठी इथे भेट द्या.

Advertisements

6 thoughts on “दिल दे के देखो……

  1. मस्त लिहीलयस.. खरंच हॉकीचे हाल चालू आहेत. गेली कित्येक वर्षं.. अन कोणालाच काही पडलेली नाही. कारण कोणालाच त्यात इंटरेस्ट नाही. (अगदी माझ्यासकट) .. अन हे बदललं पाहिजेच, विश्वचषकाच्या निमित्ताने थोडाफार जरी बदल झाला तरी उत्तमच ..

  2. खूप मस्त लिहलय!!! गिल ने हॉकीची पार वाट लावून टाकली आहे. आपल्या हॉकीचा सुवर्ण काळ परत यायला हवा अस अगदी मनापासून वाटतय…. तो काळ परत येईल. . .कदाचित त्याचीच ही सुरूवात असेल!!!

    • तस व्हायला पाहिजे अस मनापासुन वाटते…
      कालचा सामना मस्त झाला आम्ही घरी सगळ्यांनी सुरुवातीपासुन शेवटपर्यंत पाहिला..छान जिरवली काल पाकीस्तानची ४-१ ने हरवुन…
      उद्या ऑस्ट्रेलीया बरोबर आहे सामना पाहुया काय होते ते….

टिप्पण्या बंद आहेत.