किल्ले रायगड


ll गोब्राह्मण प्रतिपालक, प्रौढ प्रतापी पुरंदर, क्षत्रीकुलावतंस, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय ll

लहानपणापासुनच शिवाजी महाराजांचे नुसते नाव एकल तरी  एक वेगळाच उत्साह आपल्या अंगात संचारतो.अवघ्या महाराष्ट्राचे स्फ़ुर्तीस्थान आणि आराध्यदैवत असलेल्या महाराजांबद्दल जास्त काही सांगणे न लागे.तर आज तिथीप्रमाणे (फाल्गुन कृष्ण तृतीया) शिवाजी महाराजांची ३८० वी जयंती आहे.त्याचच औचित्य साधुन आमच्या रायगडाच भेटीतील काही फ़ोटो इथे टाकतो आहे.तर  २४ फ़ेब्रुवारी २०१० हा दिवस खरच माझ्यासाठी सोनियाचा दिन होता.कारण बरयाच वर्षापासुन रायगडाला भेट द्यायची जी एक इच्छा मनात होती ती त्यादिवशी पुर्ण झाली.जो गड महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणुन निवडला, ज्या किल्ल्यात या जाणत्या राजाचा राज्याभिषेक सोहळा झाला,अखेरची सात वर्षे त्यांनी ज्या गडावरूनच स्वराज्याचा कारभार पाहिला,त्यांच्या कर्तुत्वाने आजही ते अमर राहिले असले तरी याच गडावर मनुष्यदेह त्यागुन ते अनंतात विलीन झाले अशा रायगडाचे दर्शन घेउन मी खरच धन्य झालो.

रायगड जिल्ह्यातील महाड या गावापासून उत्तरेला सुमारे २५ कि. मी. अंतरावर आणि समुद्र सपाटीपासून जवळजवळ२९०० फूट उंच , सह्याद्रीच्या रांगासोबत दिमाखात उभा असलेला जो पाहुन राजांनी ’ तख्तास जागा हाच गड करावा ‘ असे उदगार काढले तो  हा मराठी इतिहासातील अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार रायगड खरोखरच पाहाण्य़ासारखा आहे.ज्यांना गड चढायला त्रास होत असेल किंवा वेळेचा अभाव असेल अश्यांसाठी पाचाडगावातून रायगडावर दोरवाटेनेसुदधा जाता येते.गडावर महाराजांचे पवित्र समाधीस्थळ,राज दरबार,गंगासागर तलाव,बाजारपेठ, रंगमहाल,बालेकिल्ला,राणीवसा,महादरवाजा, नगारखाना,अष्ट प्रधान वाडा, जगदीश्वर मंदिर,टकमक टोक,हिरकणी टोक या जागा आपल्याला पहायला मिळतात.

इतिहासकाळी गुन्हेगारांना शिक्षा म्हणून रायगडाच्या ज्या टकमक टोकावरून  कडेलोट केला जायचा त्या टोकावर पोहोचलो तेव्हा तिथे नौसेनेच्या जवानांचा रॅपलिंगचा कार्यक्रम चालु होता.राजदरबारात गेलो कि आपण आपोआपच महाराजांसमोर नतमस्तक होतो. शिवरायांचा राज्यभिषेक ज्या दिवशी झाला होता त्यादिवशी सुर्याची किरण सरळ सिंहासनावर पडतात अस सांगीतल जात.ज्यांच्या एका श्ब्दावर मागेपुढे काहिही न पाहता निस्वार्थ बुदधीने हजारो लोक    आपल्या प्राणाची बाजी लावत त्या अलौकिक राजांच्या समाधीजवळ जाउन आपण खरच कॄत्यकॄत्य होतो.महाराजांच्या समाधीच्या बाजुलाच त्यांच्या कुत्र्याची समाधीही आहे. रायगड फ़िरतांना आपल्याला इतिहासातील अनेक गोष्टींची आठवण आल्याशिवाय राहात नाही.त्यावेळी जे काही आतुन अनुभवतो ते शब्दात मांडता येत नाही.

दोन तास गडावर फ़िरतांना कसे गेलेते कळले सुदधा नाही आणि इतक मनसोक्त भटकुनही मला परत तिथे जावेसे वाटते आहे.महाराजांचा सहवास लाभलेला हा गड खरच प्रत्येकाने पाहायला हवा.आता परत पाउसाळी वातावरणात रायगडाला भेट देण्याचा माझा विचार आहे.असो रायगडासंबधी अधिक माहितीसाठी इथे भेट दया.शिवरायांसंदर्भात विविध माहितीसाठी हा ब्लॉगही जरुर पहा.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा……

शिवरायांचे आठवावे स्वरुप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
भूमंडळी ॥

Advertisements

41 thoughts on “किल्ले रायगड

 1. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा……मस्त मजा केली आहे की??? फोटो पण छान आहेत.

  • हो खरच बरयाच वेळा ठरवल होत पण जाण होत न्वहत यावेळी बरोबर मुहुर्त निघाला….खरच नशिबवान आहे मी कारण मला महाराजांचा दिर्घ सहवास लाभलेल्या वास्तुत काही क्षण राहता आले…

 2. खुपच छान वर्णन आहे आणि फोटोजपण मस्तच. मी रायगड दोनदा केलाय. दोन्हीवेळा प्रचंड पावसात. पण पावसात तो इतका देखणं दिसतो म्हणून सांगू. आम्ही रात्री जवळपास ३ तास टकमकटोकावर बसलो होतो. एकदम शांत. नि:शब्द.. आणि शिवराज्याभिषेकाची जागा धुक्याने मढलेली होती. अतिशय भारावून टाकणारा अनुभव होता.

  • मला पण तिथे असतांना जाणवल कि पाउसात इथे याव अस..टकमक टोकावर रात्री ३ तास ,काय जबरदस्त अनुभव आहे..खरच तिथे असतांना महाराजांचा विविध घटनांचा चित्रपटच मनात चालु असतो..मग महाराज इथे कसे वावरत असतील, राजदरबारात कसे येत असतील वैगेरे वैगेरे याची चित्र मांडत मन एक्दम भरुन येते…

  • यावेळी एकदम ’चट मग्नी पट ब्याह ’ असा कार्यक्रम आखला गेला आमचा पुढच्यावेळी तिथे आलो तर नक्की भेटेन…तसाही पावसाळ्यात रायगड बघायचा मानस आहे…

 3. पिंगबॅक स्ट्रॉबेरीच्या दुनियेत… « दवबिंदू

 4. पिंगबॅक पाउले चालती सह्याद्रीची वाट.. « मन उधाण वार्‍याचे…

 5. ‘गडांचा राजा, राजांचा गड “किल्ले रायगड”
  खरच खूप सुंदर छायाचित्रे आहेत.

  • मनोज,दवबिंदुवर आपल स्वागत आणि आवर्जुन दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार…
   इतर वेळी एवढ नाही पण महाराजांच्या गडांवर गेल कि आतुनच हे सगळ येत हो…..जरुर भेटत राहु..जय शिवाजी…!

  • ललित महाजनजी,दवबिंदुवर आपल स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार…
   आपल म्हणण निश्चितच योग्य आहे.फ़क्त गडाचे फ़ोटोही काढले आहेतच,पण नैसर्गिक मानवी वृत्तीप्रमाणे स्वत: त्यात असलेले फ़ोटो जास्त टाकले गेले ब्लॉगवर. फ़क्त गडाचे कुशल फ़ोटोग्राफ़र्सनी काढलेले अनेक छायाचित्र आहेतच आंतरजालावर हा विचारहे होता तेव्हा मनात.असो यापुढे ब्लॉगवर गडाचे फ़ोटो प्रसिद्ध करतांना मी हा मुद्दा लक्षात घेवुन फ़ोटोंचा योग्य समतोल ठेवण्याचा प्रयत्न करीन.

 6. पिंगबॅक 2010 in review « दवबिंदु

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s