स्ट्रॉबेरीच्या दुनियेत…


२१ फ़ेब्रुवारीला संध्याकाळी असाच मित्रांबरोबर फ़ेरफ़टका मारत होतो.तेवढ्यात अचानक माझा भ्रमणदुरध्वनी बोंबलायला लागला,पाहिल तर माझ्या परेश नावाच्या मित्राचा कॉल होता.त्याने सांगीतल की २४,२५ आणि २६ फ़ेब्रुवारीला महाबळेश्वरला फ़िरायला जायचे आहे,पुर्ण कार्यक्रम अजुन ठरलेला नाही कळवीन लवकरच. येणार असशील तर सांग.पुर्वाश्रमीच्या अनुभवामुळे  ’ चट मग्नी पट ब्याह ’ तत्वावर मी लगेचच होकार कळवला.कारण याच  मंडळींबरोबर मागे मी शिर्डी-शनी शिंगणापुर-त्र्यंबकेश्वर दौरा केला होता.खरच नुसत फ़िरण्यापेक्षा कोणाबरोबर फ़िरतो हे ही महत्वाच असते भटकंतीमध्ये, कारण एक चिंधी माणुस पुर्ण कर्यक्रामाची कशी वाट लावतो हे मी अनुभवलेल आहे.असो तर नंतर मला कळल पहिल्या दिवशी रायगडावर जायच आहे आणि तिथेच माझा आनंद गगनात मावेनासा झाला.कारण खुप केव्हापासुन रायगडाला भेट देण्याची इच्छा मनात होती.

तर मी या कार्यक्रमावर स्वतंत्र पोस्ट टाकायचा विचारात होतो . पण त्यादिवशी शिवजंयतीच्या मुहुर्तावर रायगड आणि पाठोपाठ प्रतापगड यांवर वेगळी पोस्ट टाकल्याने आता यात उरले काय असा विचार केला तर माझ्या आतल्या आवाजाने लगेच उत्तर दिले स्ट्रॉबेरीला विसरलास काय.त्यासाठीच ही पोस्ट.तसा आधीच बराच बॅकलॉग भरुन काढायचा आहे पोस्टचा, त्या सात दिवसातील अजुन फ़क्त दोन दिवसांवर लिहल आहे.खरतर सध्या संगणकासोबत कमी वेळ मिळतो आहे आणि त्यात इथे आल की इतरांचे ब्लॉग्स वाचण्यात वेळ कसा जातो कळतच नाही.मग माझ पोस्ट राहुनच जाते.तशी हयासाठी मला झालेली कं ची बाधाही कारणीभुत आहे हे नाकारता येणार नाही 🙂 . इतका कंटाळा आलेला असतांनाही मी ही पोस्ट टाळु शकलो नाही हयातच माझ स्ट्रॉबेरीप्रेम आल.

२४ फ़ेब्रुवारीला सकाळीच ६ च्या सुमारास आम्ही सातजणांनी घर सोडल.सकाळच्या शांत आणि आल्हाददायक वातावरणात किशोर कुमारच्या गाण्यांचा आस्वाद घेत आम्ही मुबंई-अहमदाबाद ए़क्सप्रेस हायवे गाठल.सकाळी काही खाउन न निघाल्यामुळे सगळ्यांचाच पोटात हळुहळु कावळे ओरडायला लागले.मग काय ठाण्यानजीकच हायवेला लागुन असलेल्या असलेल्या आमच्या नेहमीच्याच हॉटेल फ़ाऊंटन मध्ये क्वालीस वळवली.जेवलो नाही इथे कधी पण नाश्ता मात्र बरयाच वेळा केला आहे .छान हॉटेल आहे.नाश्ता एकदम मस्त असतो.इथे पार्कींगसाठीपण मुबलक जागा आहे. या भागात आलात तर जरुर भेट दया.तिथे मस्त पेपर डोसा (जंबो) आणि कॉफ़ीचा आस्वाद घेउन पोटातल्या कावळ्यांची कावे-काव बंद केली.पुढे बरयाच ठिकाणी ट्रॅफ़िक असल्याने गाडी हळु हळु जात होती.आमच्या  गाडीमध्ये मात्र गप्पा रंगत असल्याने त्याचे काहीच वाटत न्वहते. नाहितर कधी कधी खुप वैताग येतो या ट्रॅफ़िकचा.असो मुंबई सोडल्यावर मात्र आमच्या गाडीने वेग घेतला.मध्येच एका ठिकाणी थांबुन बिस्किट-वेफ़र्स घेतले.शिवाय मी आईने बनवुन  दिलेला चिवडाही बॅगमधुन काढला.हे सगळ फ़स्त करत आम्ही सुमारे २:४५ ला रायगड गाठल.

रायगडाच्या दर्शनाने भारावलेल्या आम्ही ०५:४५ ला रायगडचा निरोप घेतला.पुढे आमचा आनंद अजुन द्विगुणीत करणारी घटना आमची वाट बघत होती.त्यादिवशी भारत-दक्षिण आफ़्रिकेचा तो ऐतिहासीक सामना चालु होता ज्यात आपल्या मास्टर-ब्लास्टर सचिनने द्विशतक झळकावले.शेवटच्या चार-पाच षटक आमच लक्ष पुर्णपणे हया सामन्याकडे होत.सचिनच द्विशतक झाल्यावर आम्ही गाडीतच असा वेड्यासारखा आरडाओरडा सुरु केला होता कि विचारुच नका.अश्या वातावरणातच आम्ही महाबळेश्वरला पोहोचलो.तिथे हॉटेलमध्ये मस्त ताजेतवाने होवुन बाजारात फ़िरायला बाहेर पडलो.

खरतर इतका चांगला मुडमध्ये इथे आलो असलो तरी सुदधा माझा मात्र पुरता हिरमोड झाला होता.कारण २००७ मध्ये पावसाळ्यात  इथे पाउल ठेवताच ज्या अविस्मरणीय स्वर्गीय वातावरणाने आमचे स्वागत झाले होते त्याची किंचितशीही सर आताच्या वातावरणाला न्वहती.’नभ उतरु आल ’ चा खरा प्रत्यय घ्यायला पावसाळ्यात इथे येउन बघाच.आता नुसत ते क्षण आठवुनही मन प्रसन्न होते आहे.असो तर असाच ’जब दिलही तुट गया ’ अवस्थेत महाबळेश्वरच्या बाजारात फ़िरत असतांना ’ ती’ दिसली.तिच ते मोहक रुप पाहुन मी नुसता पाहत राहिलो.मागच्या वेळेस चुकुनसुदधा हिच दर्शन झाल न्वहत,आणि आता  तीला पाहताक्षणीच मी पुरता घायाळ झालो होतो.ती ने काय जादु केली माहिती नाही पण ’याचसाठी का केला होता इथे यायचा अट्टाहास’ अस काही वाक्य तेव्हा कानात वाजत होत.

जास्त काही गैरसमज करुन घेउ नका ती म्हणजे जिच्यासाठी ही पोस्ट लिहायला घेतली ती स्ट्रॉबेरी.खरच दिसायला जशी सुंदर तशीच आतुनही एकदम चवदार.महाबळेश्वरात भारतातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी सुमारे ८५ टक्के उत्पादन होते.यंदाच्या हंगामात महाबळेश्वरमध्ये २० हजार टनापर्यंत स्ट्रॉबेरीचे उत्पादन अपेक्षित आहे.महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.आपल्याकडे जी स्ट्रॉबेरी मिळते तीची चव तुरट-आंबट असते,त्यांची जी खोकी मिळतात त्यात अर्ध्यापेक्षा अधिक पानच भरलेली असतात.तिथल्या स्ट्रॉबेरीची चव मस्त मधाळ आणि थोडीशी आंबट जिभेवर रेंगाळत राहणारी.मग काय आमच्यातल्या एकेक जण अर्धा-एक किलो घेत होता आणि सगळे मिळुन त्यावर तुटुन पडत होतो. २-३किलो पटकन कश्या फ़स्त झाल्या ते आम्हाला कळलेसुदधा नाही.मग तिथेच थोड फ़िरुन हॉटेल अमन मध्ये मस्त शुदध मांसाहारी जेवणावर यथेच्छ  ताव मारला.ढेकर देत हॉटेलमधुन बाहेर पडतांना परत ती दिसली आणि आम्हाला पोट तुडुंब भरलेल असतांना देखील स्ट्रॉबेरी खाण्याचा मोह आवरला नाही.भरल्या पोटावर अजुन १-२ किलो स्ट्रॉबेरी आम्ही चेपली.

रात्री खुप उशिरापर्यंत गप्पा-टप्पा  मारुन झोपल्यावर देखील भल्या पहाटे सुमारे ७.३०-८ ला आम्ही उठलो. 🙂 पटापट तयार होवुन ०९:३० ला मिसळ-पाव आणि चहाचा उपभोग घेउन प्रतापगडाकडे कुच केल.प्रतापगड फ़िरुन माघारी येताना रस्त्यात असलेल्या हस्तकलाकेंद्राला भेट दिली.इथे मावळ्यांचे छान-छान पुतळे उभारलेले आहेत.हस्तकलाकेंद्राच्या बाहेर एका बाजुला शिवाजी महाराजांच्या सर्व किल्ल्यांचे,त्यावेळच्या शस्त्र आणि विशिष्ट जागा यांच्या छायाचित्रांचा पाहण्यासारखा संच आहे.आतही छान वस्तु होत्या पण तिथे जास्त वेळ न थांबता आम्ही तेथुन निघालो.महाबळेश्वरला परत येउन विल्सन पॉइंर्ट,एलिफ़ंटस हेडपॉइंर्ट आणि लॉडवीक पॉइंर्टला भेट दिली.लॉडवीकपॉइंर्टवरुन परततांना मुख्य रस्त्यावर येतानाच आमच्यातल्या एकाचे (यतीन) लक्ष तिथे असलेल्या गोळावाल्याकडे गेले.सुर्यदेव एव्हाना डोक्यावर आले होते त्यामुळे त्याने फ़क्त गोळा खायचा का बोलायचा अवकाश सर्वांची पाउले तिथे वळली.सगळ्यांनी स्ट्रॉबेरी फ़्लेवरचाच गोळा मागीतला. गोळा अगदी मस्त होता,स्ट्रॉबेरी फ़्लेवर खरोखर जाणवत होत.आमच्यातल्या दोघा खादाड्यांनी  तर दोन गोळे फ़स्त केले. (अस्मादीक  त्यापैकीच एक  हे वेगळ सांगायला नको 🙂 )इथे आलात तर नक्की चाखुन पहा स्ट्रॉबेरीवाला गोळा.त्यानंतर आम्ही महाबळेश्वर मार्केट्मध्ये हलक-फ़ुलक जेवण आटपल.

जेवल्यावर आम्ही पाचशे वर्षापुर्वी बांधलेली प्राचीन महाबळेश्वर आणिअतिबळेश्वर यांच्या मंदीरांना भेट दिली.तिथेच  पंचगंगा नावाचे एक स्थान आहे जिथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्या उगम पावतात.पंचगंगेच्या पांडवकालीन मंदीरात पंचगंगेच तिर्थ स्वरुप पाणी प्राशन करुन आम्ही माघारी वळलो.पुढे मंकी पॉइंट,आर्थर सीट पॉइंट,सावित्रीचा उगम,एको पॉइंट, हंटर्स पॉइंट, इथे भेट दिली.आर्थर सीट पॉइंटला  दोन-तीन माणस स्ट्रॉबेरी विकायला बसली होती.मग…मग काय केली २ किलो फ़स्त.तेथुन सनसेट पॉइंटकडे जाताना.एका हॉटेलमध्ये स्ट्रॉबेरी क्रश पिण्यासाठी वळलो तिथे तब्बल ९० रुपये प्रति-ग्लास असलेल स्ट्रॉबेरी क्रश विथ आइसक्रिम हादडल.हया हॉटेलच्या मागेच स्ट्रॉबेरीचा मळा होता.स्ट्रॉबेरीचे प्लास्टिक पांघरलेले वाफे आकर्षक दिसत होते.तेथील माणसाला विचारले असता तो म्हणाला खुपच संवेदनशील असतात ही फ़ळ त्यामुळे माती लागून फळं खराब होऊ नये म्हणून हे प्लास्टिक लावल आहे.मळ्यात भटकल्यावर सनसेट पॉइंट करुन आम्ही वेण्णा तलावात मस्तपैकी बोटींग केल.अंधार झाला असल्याने प्रकाशाच्या पाण्यावर प्रतिबिंबीत होणारया नक्षी आणि विशेषत: तलावात मध्यभागी असलेला फ़ाउंटन मस्त दिसत होता.

बोटींगनंतर हॉटेलवर ताजेतवाने होवुन आम्ही मार्केटमध्ये जाउन विविध प्रकारच्या चिक्क्या विकत घेतल्या.अर्थातच स्ट्रॉबेरी चिक्कीही होती त्यात.त्यानंतर जेवण+आइसक्रिमचा कार्यक्रम उरकुन कालच्या प्रमाणेच दंगामस्ती करत आम्ही निद्राधीन झालो.दुसरया दिवशी सकाळी नाश्ता झाल्यावर केटस पॉइंट आणि नीडल होल पॉइंट बघत महाबळेश्वरचा निरोप घेतला. महाबळेश्वरमधून पाचगणीकडे उतरताना नेमेची मग येतो तो  ‘मॅप्रो’ वाला.बाजारात ज्या किमतीला हयांची उत्पादन आहेत त्यापेक्षा १०% सवलत इथे मिळते.अगदी तोंड वाकड न करता तुम्ही सांगाल त्याची चव तुम्हाला चकटफ़ु चाखवली जाते.तरीही मॅप्रो थोडस महागच आहे त्याच्या इतर स्पर्धकांपेक्षा.तिथे स्ट्रॉबेरी,कच्ची कैरीची चॉकलेटस विकत घेतली.मॅप्रोपासुन थोड्याच अंतरावर असलेल्या मनामाच्या दुकानात गेलो.तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तिथे जवळपास १५-२० वेगवेगळ्या पेयांची चव चाखली.जे आवडत होत ते बाजुला करत होतो.मी बाजुला केलेल सगळ एका मोठ्या बॉक्समध्ये त्याने भरुन दिल सवलतीनंतरसुदधा बिल झाल होत फ़क्त ११६५ रुपये.सगळ्यांच नाही माझ एकट्याच तरीही मी दुसरा होतो बिलामध्ये परेश महाशय तर १५०० च्या वर पोहोचले होते.असो आजही फ़्रिज त्या पेयांनी भरला आहे.(हे केवळ माहितीदाखल लिहल आहे.तरीही चुकुन हयाला कोणी घरी येउन ती पेय पिण्याचे आमत्रंण समजु नये. 🙂 )

आता खरेदी उरली होती ती स्ट्रॉबेरीची.मग गाडी परत मॅप्रोकडे वळवली कारण मॅप्रोसमोर स्ट्रॉबेरीच्या बरयाच गाड्य लागल्या होत्या.४५-५५ रु/किलो भाव होता तिथे.आम्हला  सगळ्यांना मिळुन १५ किलोच्या आसपास घ्यायची होती.मग तेथील एका आजींना ४० रु/किलो भावाला पटवल.तिथे मी ऐवढी स्ट्रॉबेरी खाली कि विचारु नका.आजीही काही बोलत न्वहत्या.तसही त्यांच्याकडे गेल्यागेल्याच त्यांनी आमच्या सगळ्यांच्या हातावर स्ट्रॉबेरी टेकवल्या होत्याच. आमच्यातला एक जण तर मला म्हणाला तु आता जेवायच नाव काढु नकोस म्हणुन.बघता बघता आमची ऑर्डर १९ किलोची झाली.त्यातील चार किलोची ऑर्डर अस्मदिकाची होती.त्या आजींना मानल पाहिजे त्यांनी  व्यवहार न बघता १० किलो त्यांच्याकडची दिली आणिउरलेली त्यांच्या बाजुलाच त्यांच्या भावाच्या मुलीची गाडी होती तेथुन घ्यावयास सांगीतले.स्ट्रॉबेरीनी तॄप्त होवुन आम्ही पाचगणीला गेलो तेथे टेबल लँड व पांडवांचे स्वयंपाकघर पाहिले.पुढे वाइचा गणपती,प्रती शिर्डी,प्रती बालाजी हयांच दर्शन घेउन संध्याकाळी लोण्यावळ्याला पोहोचलो. तिथे भुशी धरण पाहिल्यावर एका ठिकाणी परत चिक्की खरेदीचा कर्यक्रम यथासांग पार पाडला.

या सर्व सुखद आठवणी आणि रिकामा खिसा घेउन पुरते स्ट्रॉबेरीमय होवुन रात्री घरी परतलो.स्ट्रॉबेरी घरी आल्यावर दोनच दिवसात वाटुन व खावुन संपल्या तरी त्या लालचुटूक स्ट्रॉबेरींची ती चव अजुनही जिभेवर रेंगाळते आहे.

Advertisements

21 thoughts on “स्ट्रॉबेरीच्या दुनियेत…

 1. अहाहा झक्कास. तोंडाला स्ट्रॉबेरी पेय सुटलंय..

  आणि कं ची बाधा होऊनही त्याच्यावर मात करून मस्त लिहिलं आहेस. 🙂 .. अरे आणि सगळ्यांना कं पिडायला लागला तर कसं चालेल?? (कोण कोणास म्हणाले.. look who is talking च्या तालावर 🙂 )

  • धन्यवाद…
   माझ्या ब्लॉगमित्रांना कं ची बाधा झालेली असतांना ..मी कसा मागे राहीन.. 🙂
   काहितरी उपाय करावा लागेल हया कं वर…

 2. स्ट्रॉबेरीचा फ़ोटो खूपच छान आहे….आणि काय लिहायचं….जिथे खादाडी छान तिथे सगळंच छान….

 3. मस्तच रे…… अजुन काहि लिहीत नाही …हे स्ट्रॉबेरीज चे फोटो पाहून या सुट्टीत महाबळेश्वरचे प्लॅन करतोय माझा लेक….

टिप्पण्या बंद आहेत.