अनोखी देशसेवा…मानो या न मानो


काल माझिया मना वरील माउंट हुड पाहुन मला गेल्या वर्षी फ़ेब्रुवारी मध्ये गंगटोक येथे पाहिलेल्या हिमालयाच्या बर्फ़ाच्छादीत सोनेरी मुकुटाची आठवण झाली.त्याबरोबरच तिथे असलेल्या बाबा हरभजनसिंग यांच्या मंदिराची आठवण झाली.गेल्या वर्षी ब्लॉग लिहत असतो तर त्यांच्याबद्दल तेथे जी माहिती मिळाली ती आवर्जुन लिहली गेली असती.असो उशिरा का होइना ती माहिती आता इथे सादर करतो.खरतर कालच हे लिहणार होतो पण बीएसएनएल ब्रॉंडबॅंडची कृपा, काल सकाळी जे बंद झाल ते आज सकाळीच चालु झाल.आजकाल खुपच खराब होत चालली आहे बीएसएनएल ची सेवा.त्यामुळेच ’बीएसएनएल वर्स्ट है मेरे लिए ’ अस सध्यातरी म्हणाव लागते आहे.असो तर गेल्यावर्षी फ़ेब्रुवारीमध्ये अगदी सहकुटूंब सहपरिवार गंगटोक-दार्जीलिंग-नेपाळ दौरा करण्याचा योग आमच्या नशिबात आला होता.ब्रम्हदेवाने तिथे अगदी मुक्त हस्ताने निसर्गसौंदर्याची उधळण केली आहे.तिथे घालवलेले ते दिवस नुसते आठवले तरी मन प्रसन्न होते.तर तिथे गंगटोकला असतांना १७ फ़ेब्रुवारीला आम्हाला बाबा हरभजनसिंग मंदिरात जायच होत.तेव्हा मला तर वाटल होत कि आपल्याकडॆ जसे बाबा असतात तसाच कोणीतरी बाबा असेल.

तर चांगु तलाव आणि आजुबाजुचा मनोहारी निसर्ग पाहत बाबा मंदिरात आम्ही सुमारे १२ च्या आसपास पोहोचलो.गंगटोक पासुन जवळपास ६० किमी अंतरावर १२००० फूट उंचीवर बाबा मंदिर असले तरी दुर्गम पर्वतीय रस्ते असल्याने तिथे जायला सुमारे अडीच तास लागतात.मंदिरात तीन खोल्या आहेत एका मधल्या खोलीत बाबांचे फ़ोटो ठेवले आहेत जिथे पुजा केली जाते.उजव्या बाजुच्या खोलीत बाबांच्या दैनंदिन वापराच्या वस्तु ,कपडे अगदी इस्त्री करुन,बुट, एक खाट हे सगळ अगदि व्यवस्थित ठेवलेले आहे.तर तिसरया खोलीत पाण्याच्या भरलेल्या बाटल्या आढळुन येतात.आपण मंदिराच्या मागे दगडातुन येणारे पाणी तिथे बाटलीत भरुन तिथे ठेवु शकतो.१५ दिवसांनी ती बाटली तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोहोचवली जाते.हे पाणी १५ दिवस त्या मंदिरात राहुन अगदी पवित्र होते.त्याच्या सेवनाने अनेक रोग दुर पळतात अस मानल जाते.प्रत्येक रविवारी व मंगळवारी इथे मोफ़त जेवण दिले जाते.इथे येणारे सर्वधर्मीय पर्यटक आपोआपच बाबांसमोर नतमस्तक हो्तात.

मंदिरात बांबा हरभजनसिंग यांची काही माहिती वाचायला मिळाली.ती वाचुन त्यांच्या विषयीची उत्सुकता चाळवली गेली होती त्यातच आमच्या गाडीचा चालक ’निमा’ ने आम्हाला ’ये तो कुछ भी नही’ च्या आविर्भावात आम्हाला सांगीतल कि हे तर मंदिर आहे बाबांची खरी समाधी तर अजुन वरती आहे,एक तास लागेल आणि काही वेगळे पैसे लागतील .(आमच्या कार्यक्रमात फ़क्त हे बाबामंदिरच होत.)शिवाय तिथे जातांना एका ठिकाणी बर्फ़ाच्छादीत हिमालयाचा एक मस्त नजाराही पाहयला मिळेल असे त्याने सांगीतले.आम्हीही हिमालयाच्या आकर्षणाने त्याला होकार दिला.हा निमा एकदम ज्वाली माणुस होता.त्याने रस्त्यात आमच नेपाळी गाणी-वेगवेगळे किस्से सांगत मस्त मनोरंजन केल.सुरुवातीला शांत शांत वाटलेला तो नंतर इतका बोलत होता कि विचारुच नका.त्याच्या हसतमुख-मनमिळाउ व्यक्तिमत्वामुळे हळुहळु तो आमच्यातलाच एक होवुन गेला होता.असो माझ्या मेंदुच्या ’ न विसरता येणारी भेटलेली माणस ’ या फ़ोल्डरमध्ये त्या निमाच नाव कायमस्वरुपी ’सेव’ केल आहे.

तिथे रस्त्यावर एका ठिकाणी थांबुन आम्ही हिमालयाच्या बर्फ़ाच्छादीत रांगाच मनोहारी दॄश्य डोळ्यात साठवुन घेतल.दुपारी एक वाजता १३२०० फ़ुट उंचीवरील बाबांच्या समाधीजवळ पोहोचलो.इथेच त्यांची बंकर आहे.तिथे त्यांच सर्व सामान आजही तसच श्रद्धापूर्वक जपुन ठेवल आहे.बंकरमध्येच एक वही ठेवलेली आहे.त्या वहीत तुम्ही तुमची मनातील इच्छा लिहुन ठेवु शकता.बरयाच लोकांच्या इच्छा अश्या प्रकारे पुर्ण झाल्या आहेत असे सांगीतले जाते.तिथे वातावरणाचा प्रभाव होता कि कसला माहित नाही पण तिथे ऑक्सीजनची कमी असुन सुद्धा मनाला विलक्षण प्रसन्नता वाटत होती.तिथे आम्हाला मोफ़त चहा आणि हवी तेवढी बिस्किट खायला देण्यात आली.बरेच लोक हि बिस्कीट सुदधा बाबांचा प्रसाद म्हणुन घरी घेउन जातात.चहा पिल्यावर तिथल्या एका जवानाशी बोलायला सुरुवात केली.त्याला विचारल हा सगळा प्रकार नक्की काय आहे.तेव्हा तो अगदी आत्मीयतेने हया जगावेगळ्या बाबांबद्दल माहिती सांगु लागला.तो ज्या उत्कटतेने बोलत होता कि जणु काही तो ही माहिती सांगण्यासाठीच तेथे आला होता.

पंजाब रेजिमेंटच्या २३ व्या बटालियनचा एक शूर जवान म्हणजेच हे बाबा हरभजनसिंग.४ ऑक्टोंबर १९६८ ला भारतीय जवानांच्या एका पथकाला टेकुला ते डेंगचुकला या दुर्गम मार्गावर मार्गदर्शन व संरक्षण करताना हरभजनसिंग एका वाहत्या प्रवाहात कोसळले.खुप शोध करुनही त्यांचा मृतदेह सापडला नाही.त्यानंतर पाचव्या दिवशी त्यांच्याच बटालियनमधील प्रितमसिंग नावाच्या जवानाच्या स्वप्नात बाबा आले त्यांनी झालेल्या अपघाताबाबत तसेच त्यांची समाधी बांधावी असे सांगीतले.पहिला प्रितमसंग यांनी हया गोष्टीकडे दुर्लक्ष केले पण जेव्हा शोध-पथकाला त्यांनी सांगीतलेल्या जागेवर हरभजन सिंग यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांनी हे सगळ वरील अधिकारयांना सांगीतल.तेव्हा बाबांची समाधी बांधण्यात आली व त्यांना कॅप्टनपदाची बढती मिळाली.

लष्करातर्फे दररोज त्यांच्यासाठी जेवण आणून ठेवले जाते.रोज सकाळी त्याला ऑफिसमध्ये नेण्यासाठी गाडीही पाठवली जाते. दरवर्षी १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेबर या काळात हरभजनसिंग वार्षिक रजेवर जातात.तेव्हा इथे हाय अलर्ट जाहिर केला जातो व नेहमीपेक्षा तिप्पट सैनिक इथे नेमले जातात.त्यांच्या नावाच रेल्वेचं तिकीट आरक्षित केलं जातं.त्यांच्या साठी स्टेशनपर्यंत गाडी दिली जाते.पुढे रेल्वेत दोन अटेंडंट दिले जातात.त्यांच सामान त्यांच्या घरी पोहोचवल जात.दोन महिन्यानी परत हे सामान परत आणल जात.सगळेच सैनिक तसेच वरिष्ठ अधिकारी बाबांना खुपच मानतात.ते आज तीन दशकानंतरही सैनिकांच्या स्वप्नात येऊन सीमेवर जे काही घडणार आहे ते सांगतात.पलिकडील चिनच्या अनेक सैनिकांनी सुदधा बाबांना सीमेलगत रात्री गस्त घालतांना पाहिल असल्याचा दावा केला आहे.

खर काय ते देवालाच माहित पण घरापासून दूर राहुन त्या दुर्गम सीमा प्रदेशात अगदी कठीण परिस्थितीत खडा पहारा देणार्‍या जवानांची मानसिक इच्छाशक्ती वाढण्यासाठी तरी हया बाबांचा उपयोग निश्चितच होतो आहे.मरणोत्तर अशी आगळीवेगळी देशसेवा करणार्या हरभजन सिंग यांना मनापासुन सलाम….

Advertisements

14 thoughts on “अनोखी देशसेवा…मानो या न मानो

 1. जबरदस्त. जाम इंटरेस्टिंग प्रकार वाटतोय हा.. आणि तू लिहीलायस पण मस्त. त्याला दोन महिने सुट्टी, गाडीचं आरक्षण हे सगळं वाचून मी पुन्हा एकदा वर जाऊन वाचलं की बाबाचा मृतदेह मिळाला होता ना की माझी वाचण्यात चूक झाली. 🙂

  पण सहीये.. श्रद्धाच माणसाला तरते म्हणतात ते असं.

  • धन्यवाद.हो खुपच इंटरेस्टिंग आहे हा प्रकार.हे थोड अति वाटत असल तरी तिथे गेल्यावर आपल्या भारतभुमीचे संरक्षण करणार्या सैनिकांची बांबा प्रति असलेली श्रदधा पाहुन आपणही नकळतच त्यांच्या समोर नतमस्तक होतो.असो लवकरच तुमच्या डोस्याची चव चाखायची आहे.

 2. देवेन्द्र महोदय हे सगळ्च अजब आहे. आम्ही फक्त खाली बाबा ह.सिंग यांच्या मंदिरात त्यांच दर्शन घेऊन परतलॊ.श्रद्धा माणसाला प्रचंड उर्जा पुरवते जगण्यासाठी,लढण्यासाठी. देवाला रिटायर करा म्हणणार्‍याना हे कोण सांगणार?
  माझा देवदर्शन हा लेख वाचला का ?
  savadhan.wordpress.com

  • आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद…
   त्या निमाच्या कॄपेमुळे वरती जाण झाल आणि एका जवानाकडुन वरील माहिती मिळाली.बाबा मंदिरात जाणार्यानी वरील समाधीकडे आवर्जुन जायला हव कारण तिथे रस्त्यात तुपली म्ह णुन एक जागा आहे तिथुन हिमालयाच्या पर्वत रांगाचा विहंगम दॄश्य पाहावयास मिळते.नक्कीच श्रदधा हवीच आपले मनोबल वाढवणारी…पण ती असेल माझा हरी तर देइल खाटल्यावरी अशी आंधळी नसावी…गेल्या आठवडाभर खुप कमी ब्लॉग्स वाचले आहेत.वेळ काढुन सावधान नक्कीच भेट देइन….

 3. देव या जागेविषयी आधि माहिती होतीच पण आज तू पुन्हा आठवण करून दिलीस…..
  माहिती खुप सूंदर दिली आहेस……..

 4. खरंच वेगळी माहिती आहे…मला कल्पनाच नव्हती अशी काही जागा आहे…तुम्हाला तो जवान अगदी योग्य वेळी भेटला..

 5. देव अगदी अविश्वसनीय प्रकार आहे हा. पण श्रद्धा काय असते हेच यातून दिसून येते. आणि मरणोत्तर देश सेवा करणे ह्यात बाबांची देशभक्ती दिसून येते. धन्य ते बाबा व धन्य त्यांचे भक्त.

  • अगदि बरोबर बोललात…इतर बाबतीत एखादी व्यक्ती कितिही मजबुत असली तरी मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी श्रदधा आवश्यक असते मग ती कोणत्याही गोष्टीची असो….खरच धन्य ते बाबा व धन्य त्यांचे भक्त….

 6. DearSir,
  I like ur all writeups & exclusive fotos of “Bhatkanti”. Me d Editor of Marathi magazine : ” Vishwa Leader” published from Mumbai. I would like to to print such kind of articles in our magazine so d youngsters may encourage & motivate by such kind of writeup. Is it pssible to make d permission for publish d writeup? Awaiting for u r reply.
  With warm regards.

  Dasu Bhagat

टिप्पण्या बंद आहेत.