शिक्षा…


परवाच भरत नावाचा एक  मित्र भेटला होता.दिड -दोन वर्षे वापी इथे सनफ़ार्मामध्ये काम केल्यानंतर दोन महिन्यापुर्वीच त्याने मुबंइ मधील सिपला हया फ़ार्मा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीत अगदि भरभक्कम पॅकेजसह प्रवेश केला होता.त्यासंदर्भात त्याच्याशी बोलणी चालु असतांना त्याने पुढे जी माहिती दिली ती निदान माझ्यासाठी तरी धक्कादायक होती.तो म्हणाला आमच्या इथे जर आमच्या हातुन काही चुका झाल्या तर तो कोणीही असो त्याला पायाची बोट पकडुन ऒणव उभ रहाव लागत किंवा जर एखाद्या कॄतीत चुक केली असेल तर ती कृती पंचवीस वेळा लिहावी लागते.हि दुसरी शिक्षा तर ठिक कारण त्यामुळे ती कॄती त्या व्यक्तीच्या कायमस्वरुपी लक्षात राहील.पण ओणव उभ रहायची शिक्षा तरी मला पटली नाही.त्यात त्याने सांगीतल अगदि जुन्या वयस्कर लोकांना सुदधा ही शिक्षा दिली जाते.कस वाटत असेल कंपनीत सगळ्यांसमोर अस ओणव उभ रहायला….

आंतरजालावरुन साभार...

शिस्त,शिक्षा हव्यात पण खरच त्यांच स्वरुप अस नसाव.चुका दुरुस्त करण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत.आमच्या इथे अस काही नसल्याने मला कदाचित हा प्रकार जास्तच गडद वाटत असेल किंवा इतर ठिकाणी याहुनही वेगळ्या विचित्र शिक्षाही होत असतील.पण शिक्षा हया अश्या बालिश अन नकारात्मक नक्कीच नसाव्यात.याउलट त्या चुक करणार्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढवणारया असाव्यात.सुसंवादाने त्या चुकेमागील नक्की कारण शोधायला हवे.कारण कोणाच्या आत काय चालु आहे हे आपण सांगु शकत नाही.एखाद्या अप्रिय घटनेमुळे व्यक्तीची मानसिक स्थिती ठिक नसल्यासही त्या व्यकतीकडुन चुक होवु शकते.अश्या वेळी त्याला हयासारख्या शिक्षा केल्यास ते कंपनीसाठी निश्चितेच हितकारक ठरणार नाही.वाळु किंवा माती जेवढी हातात घट्ट धरतो तितकीच ती हातातुन निसटत असते हे लक्षात घ्यायला हवे.याउलट कंपनी आपली आहे अशी भावना जर कर्मचार्यात रुजली गेली तर अश्या चुकांना आपोआपच आळा बसेल असे मला तरी वाटते.

आता तो कितपत खर सांगत होता हे मला सुदधा माहित नाही पण हे सांगण्यात तरी त्याला काही फ़ायदा न्वहता तेव्हा हे इथे ब्लॉगमध्ये मांडावस वाटल म्हणुन ही पोस्ट.त्याला नोकरी सोडत का नाही विचारल्यावर एवढ पॅकेज सध्यातरी कोणी देत नाहिये अस तो म्ह णाला.पण अश्या प्रकारे पैश्याने किती दिवस लोकांना बांधुन ठेवता येइल.असो या शिस्त आणि शिक्षेमुळे योग्य संधी आल्यास कर्मचारयांनी शि-पळा म्हणत दुसरीकडॆ धाव घेतली नाही कि मिळवल….

Advertisements

17 thoughts on “शिक्षा…

 1. अशी शिक्षा? कठीण आहे…मला वाटायाच आमच्या ऑफीसचे रूल्स सगळ्यात स्ट्रिक्ट आहेत पण…
  काही गोष्टी आहेत जिथे माझापण नाईलाज होतो, असा वाटत विकत घेतला आहे मला माझ्या कंपनीने 😦

 2. माझ्या मते तुमचा मित्र खोट बोलत आहे कारण अश्या प्रकारच्या शिक्षा कंपनी मधे एखाद्या कंपनी मधे होत असतील तर ते कामगार कायद्याचे उल्लघन आहे आणि कोणी तक्रार केल्यास जबरदस्त शिक्षा होऊ शकते अगदी कैदे पर्यंत !! so अस कोणी करेल अस वाटत नाही… तुमच्या मित्राने नुसते photo जरी पाठवून दिले तरी लगेच करवाई होऊ शकते !! शारीरिक शिक्षा ही देणे चुकच आहे अणि शारीरिक शिक्षेचे पुरावे सहज पणे देणे शक्य असते. आणि कामगार कायदा हा फक्त कामगारा साठी नसून तो काम करणारा अणि काम करवून घेणारा ह्या तत्वावर आधारभूत आहे.

  • महोदय आपले म्हणणे मला पटते आहे किंबहुना त्यामुळेच मला हे ऐकुन धक्का बसला होता…त्याला यासाठीच मी दोन-तीन वेळा् परत विचारल होत तरीही तो खरच हे असच आहे म्हणाला…बाकी तो अस खोट बोलण्यामागे काहीही कारण वाटत नाही त्यामुळेच ही पोस्ट टाकावीशी वाटली..

 3. शाळेत अश्या स्वरूपाच्या शिक्षा ठीक आहेत पण प्रोफेशनल लाइफ मध्ये अस काही होऊ शकेन यावर विश्वास नाही वाटत!! विक्रम यांच्याशी सहमत आहे. कामगार कायद्या नुसार यावर कारवाई होऊ शकते….

  • माझही तेच म्हणण आहे….तो परत भेटला कि त्याच्याकडुन एकुणच सखोल माहिती घेतो याबाबत..मुंबईमधील सिपला मध्ये तुमच्या किंव तुमच्या परिचयातील व्यक्तीच्या ओळखीचे कोणी असल्यास त्यांना याबद्दल विचारुन पहावे…

 4. देवेंद्र, फार्मा मध्ये माझाही मित्र आहे, त्यांना सेल्स प्रेशर भरपुर असते, प्रसंगी घालुनपाडुन देखिल बोलण्यात येते पण अश्या बालीश शिक्षा माझ्यातरी ऐकिवात नाहीत. आणि असे जर होत असेल तर त्याविरुद्ध कंपनी वर कार्यवाही व्हायला हवी…

  • माझे इतरही अनेक मित्र आहेत फ़ार्मामध्ये त्यांची दमछाक पहिली आहे मी नेहमी कसला ना कसल्या तरी ऑडीटची तयारी चालु असते…आम्ही काहीही प्लॅन आखला हयांच ऑडीट मध्ये येत असते…पण हे प्रकरण थोड वेगळच आहे…

 5. बाप रे. हे अविश्वसनीय आहे. पण अर्थात तू म्हणतोस त्याप्रमाणे या मित्रालाही खोटं बोलायचं काय कारण म्हणा. पण हे असं कॉर्पोरेट लाईफमध्ये होत असेल तर भयंकर आहे. त्याला लेबर कोर्ट मध्ये तक्रार करायला सांग..

  • ते सुदधा छोट्या मोठ्या नाही तर आजच्या घडीला फ़ार्माक्षेत्रात भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी असलेल्या ठिकाणी हे होत आहे…त्याच्याशी सविस्तर बोलायच आहे परत एकदा…

टिप्पण्या बंद आहेत.