आनंदाचा ॠतु…


थोडा तु विचार कर,थोडा मी करतो..

मग आनंदाचा ॠतु येइल..

एकट एकट कोण जगलय,

राहुन एकटा जीव घाबरतो

ये ना आपण मिळुन, नात हे जोडु

नियमांना बदलु,रुढींना तोडु

याच्या आधी की हे जग आपल्याला आजमावेल…

.

.

आनंदाचा निरोप घेउन,वसंत हा आला

हा क्षण आहे आपला, क्षणात हया ये ना

नशीब आपल सावरुया..

खाली खाली हया जीवनात,

प्रेम भरुया आपण दोघे

दिवाणे जे करतात नेहमी,

तेच करुया आपण दोघे

हया दुराव्याला आपण संपवु

एकमेकात स्वत:ला लपवु

याच्या आधी की हे जग आपल्याला आजमावेल..

.

.

जगाच्या रुढींना,प्रेमात मिसळु नको

ध्येय आपण आपल,  गाठुनच राहु

आता तु  कोणाला   नको भिउ

वेडया रुढी,जग हे वेडे

आणि थोडे आपण दोघे वेडे

नशिबात आपल्या काय लिहल आहे

विचार करतो हा प्रत्येक क्षणी

इच्छा आहे जी आपली,स्वप्न ते विणुया

तु मला पसंत कर,मी तुला पसंत करतो

याच्या आधी की हे जग आपल्याला आजमावेल..

सोनु निगमच्या दीवाना हया अल्बममधील मला खुप आवडणारया  ’कुछ तुम सोचो..’ या गाण्याचा मी केलेला हा अनुवाद आहे.खाली गाण्याचा विडियो दिला आहे जरुर बघा,खुप छान आहे.

Advertisements

9 thoughts on “आनंदाचा ॠतु…

  1. पिंगबॅक इमोसनल अत्याचार कंटीन्युज…. « दवबिंदु

टिप्पण्या बंद आहेत.